Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

20:28 (IST) 16 Sep 2025

Mumbai Local Train: लोकलमध्ये अनधिकृत जाहिरातीबाजी सुरू; जाहिरातींच्या फलकांमुळे लोकलचे डबे विद्रुप

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा-बुवांच्या जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे लावण्यात येत आहेत. …अधिक वाचा
20:16 (IST) 16 Sep 2025

प्रत्येक विभागात कबुतरखाना सुरू करावा; मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. …सविस्तर वाचा
20:03 (IST) 16 Sep 2025

New MBBS Seats: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशात ६८५० नवीन जागा; महाराष्ट्रात तीन नवीन महाविद्यालयांसह ६८० जागा वाढल्या

महाराष्ट्रामध्ये यंदा तीन नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेमुळे देशामध्ये २,७५० जागा वाढलेल्या असताना नवीन तुकड्यांना मान्यता दिल्याने देशात ४,१०० जागा वाढल्या आहेत. …अधिक वाचा
20:02 (IST) 16 Sep 2025

शहापूर : चार जणांकडून एकाची हत्या

क्षुल्लक कारणावरून चार जणांनी मिळून त्यांच्या मित्राची हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील कुकांबे परिसरात उघडकीस आली. …सविस्तर वाचा
19:51 (IST) 16 Sep 2025

गोंदिया ते इंदूर-बंगळुरू विमानसेवा सुरू, पहिल्याच दिवशी ४४ प्रवाशांनी घेतले उड्डाण

ही विमानसेवा आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी असेल. …अधिक वाचा
19:50 (IST) 16 Sep 2025

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीपूर्वी अतिवृष्टीची मदत, अजित पवार यांचे संकेत

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे दसऱ्यापर्यंत अतिवृष्टीची मदत देण्याच्या हालचाली सरकारदरबारी सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले. …सविस्तर वाचा
19:40 (IST) 16 Sep 2025

४५० चौरस फुटांची घरे द्या…हाजी नुरानी इमारतीतील बाधितांची एमएमआरडीएकडे मागणी

जुन्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असली तरी अद्याप बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दोन इमारतीतील एकूण ८३ रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. …सविस्तर बातमी
19:37 (IST) 16 Sep 2025

नागपूर : हरवलेल्यांचा आधार बनली नागपूर महामेट्रो

१३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता, १४ वर्षाचा एक मुलगा न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आला. तो गोंधळलेला होता. मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तो सहकार्य करीत नव्हता. …अधिक वाचा
19:31 (IST) 16 Sep 2025

राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकी स्वारावर हल्ला

राजापुरात तीन बिबट्यांसह तीन पिल्लांच्या मुक्त संचाराने दहशतीचे वातावरण पसरले आहे. …सविस्तर बातमी
19:28 (IST) 16 Sep 2025

Ajit Pawar: “तिकिट मागायला मला दिल्लीला जावे लागत नाही”, अजित पवार यांचा टोला नक्की कोणाला

तिकिट मागायला मला दिल्लीला जावे लागत नाही, त्यामुळे काळजी करु नका, तुमच्या सोबत न्याय होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी म्हटले. …सविस्तर वाचा
19:22 (IST) 16 Sep 2025

मिरा भाईंदरकरांची क्लस्टर मधून सुटका? स्वतंत्र इमारती पुनर्विकासाला परवानगी

मिरा-भाईंदर शहरासाठी तीन वर्षांपूर्वी क्लस्टर योजना मंजूर करण्यात आली होती. महापालिकेने २४ ठिकाणी क्लस्टर राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून अधिसूचना राजपत्रात प्रकाशित केली होती. …सविस्तर वाचा
19:17 (IST) 16 Sep 2025

लोढांना कबुतरखाने सुरू करण्यासाठी नेमलेले नाही; राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखान्याची कायदेशीर चौकशी करावी…

मराठी एकीकरण समितीनेही या कृत्याचा तीव्र विरोध केला असून संबंधित कबुतरखान्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे केली आहे. …सविस्तर वाचा
19:13 (IST) 16 Sep 2025

“घोडबंदरचा सेवा रस्ता विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला…”, राजन विचारेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा

राजन विचारे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून घोडबंदरची वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलीनीकरण याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. …अधिक वाचा
19:05 (IST) 16 Sep 2025

शिवसेनेत (शिंदे) खदखद; विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला विभागप्रमुखपद

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे वाटप आदी कामांना वेग आला आहे. …सविस्तर वाचा
18:56 (IST) 16 Sep 2025

Avinash Jadhav : ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसेचा येत्या शनिवारी लाँग मार्च

ठाण्यात मागील काही दिवसांपासून वाहतुक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. …सविस्तर बातमी
18:55 (IST) 16 Sep 2025

Chit Fund Scam: चिटफ़ंड घोटाळा – ३६ जणांची १ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फसवणूक झालेली रक्कम आणि फिर्यादी यांची संख्या वाढू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. …अधिक वाचा
18:46 (IST) 16 Sep 2025

मुंबई विद्यापीठाच्या उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारांसह आदर्श शिक्षक, प्राचार्य पुरस्कारांचे वितरण

स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते. …सविस्तर बातमी
18:39 (IST) 16 Sep 2025

इस्रायलचे पाहूणे ठाण्यातील या शाळेच्या पडले प्रेमात; चर्चेतून दोन देशाच्या संस्कृतीची देवाणघेवाण

ठाण्यातील एका शाळेच्या उपक्रमांवर आणि शिक्षणपद्धतीवर इस्रायलमधील तरुणांचा मोह पडला आहे. …वाचा सविस्तर
18:34 (IST) 16 Sep 2025

आक्सा समुद्री पदपथ बेकायदेशीर; दोन महिन्यांत समुद्री पदपथ हटविण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

सागरी मंडळाने आक्सा समुद्री किनाऱ्यालगत सुशोभिकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध कामे करण्यात येत असून कामाला स्थगिती असल्याने प्रकल्प पूर्ण झालेला नाही. …वाचा सविस्तर
18:25 (IST) 16 Sep 2025

पटापट मद्य प्राशन करण्यावरून झाले भांडण; चाकूचा वार करून हत्येचा प्रयत्न; संशयित दोघांना अटक 

शंभूदास सुराजूदास (वय ३४) आणि त्याचा भाऊ कैलासदास सुरज दास (वय २५) असे यातील अटक संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळ बिहारचे असून सध्या तुर्भे एमआयडीसी भागात मिळेल ते काम करून गुजराण करतात. …अधिक वाचा
18:19 (IST) 16 Sep 2025

सेंट झेविअर्स महाविद्यालयात स्मार्ट बाक; वायफायसह वायरलेस चार्जिंगची सोय

या स्मार्ट बाकांचे उद्घाटन रूट्स वर्ल्डवाईडचे रे मार्टिन, हंगेरीचे राजदूत फेरेंक जरी, माजी खासदार राहुल शेवाळे आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. …सविस्तर बातमी
18:16 (IST) 16 Sep 2025

पालकमंत्री उदय सामंत यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. …अधिक वाचा
18:05 (IST) 16 Sep 2025

बुलढाणा : जांभूळधाबा परिसरात १७५ मिमी पाऊस, ११ मंडळात अतिवृष्टी

बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात सोमवारी रात्री वरुण राजा कोपला. जिल्ह्यातील तब्बल ११ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. …अधिक वाचा
18:02 (IST) 16 Sep 2025

डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात माकडाचा संचार

घरातील कपडे, वस्तू बंगले, इमारतीच्या गच्ची वाळत ठेवले की तेथे माकडाचे आगमन होते. ठेवलेल्या वस्तूवर माकड ताव मारते. …अधिक वाचा
17:59 (IST) 16 Sep 2025

शासकीय भूखंडावरील तीन हजारपैकी फक्त ६८ संस्थांना आतापर्यंत मालकी हक्क! दर महाग असल्याची टीका

राज्यात शासकीय भूखंडावर २२ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक आहेत. त्या खालोखाल पुणे, ठाणे, नवी मुंबई तसेच इतर शहरांचा क्रमांक लागतो. …सविस्तर वाचा
17:45 (IST) 16 Sep 2025

अहमदनगरचे झाले ‘अहिल्यानगर’ रेल्वेस्थानक; रेल्वे प्रशासनाची अधिकृत घोषणा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. …वाचा सविस्तर
17:34 (IST) 16 Sep 2025

गावोगावात शाश्वत विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती या अभियानाचा आरंभ होणार असून पालघर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पूर्वतयारी व आखणी करण्यात आली आहे. …अधिक वाचा
17:18 (IST) 16 Sep 2025

श्वान दंश झालेल्या ६७ रुग्णांना उपचार करून घरी सोडले, वैद्यकीय प्रमुख डॉ. दीपा शुक्ल यांची माहिती

श्वानाने दंश केल्यानंतर ती कोणत्या ग्रेडची जखम आहे, त्याप्रमाणे रुग्णांना ॲन्टी रेबीज, इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन दिली जातात. …सविस्तर बातमी
17:14 (IST) 16 Sep 2025

Mumbai Monorail: मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद… एमएमआरडीएची घोषणा

एकीकडे प्रवासी संख्याच मिळत नसताना दुसरीकडे मोनोरेलमध्ये सातत्याने अपघात होत आहेत. काही ना काही कारणाने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे मोनोरेल प्रकल्प वादात अडकला आहे. …सविस्तर बातमी
17:09 (IST) 16 Sep 2025

दादर – रत्नागिरी रेल्वे सुरू करण्यासाठी ‘डीआरएम’ला साकडे; अन्यथा उपोषणाचा इशारा

मध्य रेल्वे प्रशासनाने दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद केल्याने मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. …अधिक वाचा

Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)

राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.