Mumbai Breaking News Updates Today 15 May 2025 : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. काही भागात आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. याचबरोबर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत शहर, तसेच उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या घडामोडी तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 15 May 2025

10:45 (IST) 16 May 2025

आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : पुष्पक बुलियनचे संचालक चंद्रकांत पटेल दोषमुक्त

पटेल आणि इतरांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, ईडीने या गुन्ह्याच्या आधारे पटेल आणि अन्य आरोपींविरोधात आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित चौकशी सुरू केली होती …अधिक वाचा
10:07 (IST) 16 May 2025

मेट्रो ३ : आरे ते वरळी नाका प्रवास गारेगार, मात्र मोबाईल सेवा ठप्प; नेटवर्क नसल्याने प्रवाशांची गैरसोय, कागदी तिकीट खरेदी करण्याची वेळ

मोबाइल सेवा बंद पडत असल्याने प्रवाशांनी ई – तिकीट घेता येत नसल्याचे, मेट्रो स्थानकात प्रवेश केल्याबरोबर मोबाइलवरील संभाषण बंद होत असल्याने प्रवाशांमधील नाराजी वाढत आहे …सविस्तर वाचा
21:26 (IST) 15 May 2025

महापालिका निवडणुकांत कशी असेल प्रभागरचना? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन ‘यशदा’ येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आले असता, शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. …सविस्तर वाचा
21:20 (IST) 15 May 2025

राज्यात महापालिका निवडणुका महायुतीत लढणार, की स्वतंत्रपणे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. …वाचा सविस्तर
20:21 (IST) 15 May 2025

काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल पाण्यात, वाशीम जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

वाशीम जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसात वाहून गेला. …सविस्तर वाचा
20:00 (IST) 15 May 2025

अद्भुत! ‘या’ ठिकाणी उद्यापासून सूर्य किरणोत्सव

लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात १६ मेपासून सूर्य किरणोत्सव सुरू होत आहे. या पाच दिवसांच्या काळात सूर्यकिरण भगवान दैत्यसूदन यांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. …सविस्तर बातमी
19:14 (IST) 15 May 2025

बँकेकडून शेतकऱ्यांची लूट, पीक कर्जासाठी विविध शुल्काच्या नावावर…

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी विविध शुल्काच्या नावाखाली आर्थिक लूट करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसने बँकेकडे वसूल केलेले शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
19:04 (IST) 15 May 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संतप्त जमाव पोलीस ठाणे परिसरात…

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आणि आरोपी बद्दलची संतप्त जनभावना लक्षात घेत तातडीने तपासाची सूत्रे हलविली. पिंपळगाव राजा पोलिसांनी दोन तपास पथक आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केली. …सविस्तर वाचा
18:47 (IST) 15 May 2025

सहपालकमंत्री जयस्वाल असक्षम, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला किमान दोन दिवस वेळ द्यावा, काँग्रेसने…

गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या व विकासकामांवरून काँग्रेसने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने फडणवीस यांनी महिन्यातून किमान दोन दिवस जिल्ह्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. …अधिक वाचा
18:06 (IST) 15 May 2025

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली

मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा एकदा सोनसाखळी चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून विलेपार्ले येथे इमारतीच्या आवारात शिरून एका चोराने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला.तक्रारदार सुशीला मालप (५५) या विलेपार्लेच्या राहतात. बुधवारी दुपारी त्या मालविय रोडवरील असलेल्या लक्ष्मी पॅलेस इमारतीच्या आवारात पायी चालत होत्या. दुपारी साडेबारा चालत असताना एक अज्ञात व्यक्त इमारतीच्या आवारात आली. त्याने मागून येऊन मालप यांना धक्का दिला आणि त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याची सोनसाखळी खेचून तो पसार झाला. ही सोनसाखळी ४० हजार रुपये किंमतीची होती. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये घबराट पसरली आहे.आरोपीने डोक्यात हेल्मेट परिधान केले होते. तो दुचाकीवरून आला होता. आम्ही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे तपास करीत असून लवकरच आरोपीचा शोध घेण्यात येईल, असे विलेपार्ले पोलिसानी सांगितले.

18:02 (IST) 15 May 2025

दहावीतील गुणवंतांच्या पाठीवर अतिरिक्त आयुक्तांची कौतुकाची थाप; पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. सैनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या …अधिक वाचा
17:55 (IST) 15 May 2025

पोलीस असल्याची बतावणी… तरुणाला पावणेतीन लाखाना ऑनलाईन गंडा…

भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार तरुण १९ वर्षांचा असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. …अधिक वाचा
17:30 (IST) 15 May 2025

बीडीडी वरळीतील ५५६ घरांचा ताबा रखडला; भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने ताबा देण्यास विलंब, १५ मेचा मुहूर्त चुकला

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. …वाचा सविस्तर
17:16 (IST) 15 May 2025

मोसमी पाऊस अरबी समुद्रात दाखल…

मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा भाग, तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग, तसेच अंदमान आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. …अधिक वाचा
16:03 (IST) 15 May 2025

कात्रजमध्ये टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कात्रज परिसरात मंगळवारी रात्री हा अपघात घडला. …सविस्तर बातमी
15:54 (IST) 15 May 2025

यवतमाळात पाऊस:निम्मे शहर चिंब, निम्मे कोरडे

आज गुरूवारी सकाळी तापमानात दररोजपेक्षा अधिक वाढ झाली. पारा चढला असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि उकाड्याने त्रासलेल्या यवतमाळकरांना पावसाने चिंब केले. निम्मे शहर पावसाने भिजले, निम्मे कोरडे होते. …सविस्तर वाचा
15:39 (IST) 15 May 2025

वसई-विरार अनधिकृत बांधकामांप्रकरणी ईडीचे १३ ठिकाणी छापे; नऊ कोटींची रोकड व २३ कोटींचे हिरेजडित दागिने, सोने जप्त

हे. ईडीने वसई – विरार परिसरात बेकायदेशीर राहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे …अधिक वाचा
15:26 (IST) 15 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी… नागपुरात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात मुलांच्या तुलनेत मुलीचा जन्मदर आणखी कमी झाला आहे. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे. …सविस्तर वाचा
15:15 (IST) 15 May 2025

हिंगणघाटच्या आजींची कमाल…वयाच्या ६८ व्या वर्षी नातवासह केली दहावीची परीक्षा उत्तीर्ण, इंदू सातपुते यांना ५१.०० टक्के गुण

आजी – नातूची ही जोडी अनेकांसाठी आदर्श बनली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. …सविस्तर बातमी
15:06 (IST) 15 May 2025

खळबळजनक! शिवसेनेच्या आमदाराने फिरवली तलवार; पोलिसांनी थेट…

बुलढाण्यातील मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लग्नाच्या वरातीत तलवार फिरविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. …सविस्तर वाचा
15:00 (IST) 15 May 2025

पाच वर्षीय मुलीचे कारमधून अपहरण; फोन खणखणला अन्

नागपूर पोलिसांनी धावपळ करीत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत अपहरणकर्त्याच्या कारचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा वापर करत सक्करदऱ्यातून त्या संशयित कारला अडविले. …सविस्तर वाचा
14:59 (IST) 15 May 2025

नऊ महिन्यांची गरोदर… पण माघार घेतली नाही…पेणच्या भाग्यश्री कांबळे यांनी दहावीत मिळवले ३९ टक्के गुण

पेणमधील भाग्यश्री कांबळे यांचे बालपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बापेरे या गावात गेले. भाग्यश्री कांबळे दीड वर्षांच्या असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि सातवीला असताना आईचे निधन झाले. …सविस्तर वाचा
14:42 (IST) 15 May 2025

कामाचे पैसे न दिल्याने बदला घेण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवले बनावट स्टॅम्प

आरोपींनी मालकाच्या हॉटेलमध्ये बोगस शासकीय स्टॅम्प ठेवून पोलिसांना माहिती दिली. अटकेत असताना हॉटेलमालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. …सविस्तर वाचा
14:15 (IST) 15 May 2025

हत्या प्रकरणात पोलिसांचा जलद तपास ; ६ दिवसांत आरोपपत्र

पोलिसांनी ६ दिवसांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. खुनाच्या प्रकरणात इतक्या कमी वेळात तपास पूर्ण करून आरोप पत्र दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. …अधिक वाचा
14:09 (IST) 15 May 2025

सुंदरीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा : निवृत्त पोलीस उपायुक्ताविरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द

एका हवाई सुंदरीचा विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी निवृत्त उपायुक्ताविरोधात गेल्या वर्षी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. …अधिक वाचा
14:08 (IST) 15 May 2025

पत्राचाळीतील इमारतीचा पुनर्विकासही सी अँड डी प्रारूपानुसार होणार, दोन-तीन महिन्यात निविदा, ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित

गोरेगाव पश्चिम येथे मोतीलाल नगरच्या विकाससाठी निधी नसल्याने मुंबई मंडळाने सी अँड डी प्रारुप आणले. खासगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास करण्याची ही संकल्पना आहे. …वाचा सविस्तर
13:55 (IST) 15 May 2025

राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे सावट

पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमा, तसेच मराठवाडा, कर्नाटक ते केरळ या संपूर्ण पट्टयात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्यामुळे राज्यभर पूर्वमोसमी पावसाचे सावट आहे. …अधिक वाचा
13:54 (IST) 15 May 2025

राज्यघटनेला ‘ए पीस ऑफ टॉयलेट पेपर’ म्हणणे भोवले – जहाल नक्षलवादी

अशी पोस्ट समाजमाध्यमांवर करणारा रेजाझ सिद्धीक हा जहाल नक्षलवादी असल्याचे व बंदी घातलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) सह जेकेएलएफशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर ‘यूएपीए’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
13:52 (IST) 15 May 2025

Video : “वॉचटॉवर” वर चढून वाघाने केली जंगलाची पाहणी

एका इमारतीच्या पायऱ्यांवरून तुम्हाला वाघ उतरताना दिसत असेल तर कसे वाटणार…? अगदी असाच प्रसंग मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पाच्या ताला कोअर झोनमध्ये वन्यजीवप्रेमी तेजस पाळंदे यांना आला. …वाचा सविस्तर
12:50 (IST) 15 May 2025

विलेपार्ले येथील जैन मंदिराचे प्रकरण : उर्वरित बांधकामाचे पावसाळ्यात नुकसान नको म्हणून छत बांधू द्या, ट्रस्टची उच्च न्यायालयात मागणी

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्याच्या (एमआरटीपी) कलम ५३ (१) आणि मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ४८८ अंतर्गत ट्रस्टला मंदिराचे बांधकाम पाडण्याबाबत नोटीस बजावली होती …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे