Maharashtra Local Body Elections 2025 / नागपूर : निवडणूक आयोगाने अखेर आज नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचाी घोषणा केली. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या या निवडणुकीने स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील सेमी अर्बन भागातील मतकौल निश्चित होणार आहे.

राजकीयदृष्ट्या अंत्यत महत्वाचा प्रदेश अशी ओळक असलेल्या विदर्भात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

विदर्भाची विभागणाी प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व विदर्भ अशी आहे. पश्चिम विदर्भात नगरपालिका आणि नगर पंचायती मिळून एकूण ४५ तर पूर्व विदर्भात ५५ ठिकाणी अशा एकूण १०० ठिकाणी निवडणुका होत आहेत. चार वर्षाहून अधिक काळ निवडणुका न झाल्याने याबाबत कमालीची उत्सूकता आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित आहे.

जिल्हा निहाय नगरपालिका व पंचायती पुढीाल प्रमाणे –

  • अमरावती – १२
  • अकोला – १६
  • बुलढाणा – ११
  • वाशीम – ०५
  • भंडारा-४
  • चंद्रपूर – ११
  • गडचिरोली – ३
  • गोंदिया – ४
  • नागपूर – २७
  • वर्धा – ६

विदर्भातील या पालिका/ नगर पंचायती

  • अकोला जिल्हा – अकोट, बाळापूर, बार्शी, टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा.
  • अमरावती जिल्हा – अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पंचा.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पंचा.), शेंदूरजनाघाट आणि वरुड.
  • बुलढाणा – बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा.
  • वाशीम जिल्हा – वाशीम, कारंजा, मालेगाव (न.पंचा), मंगरुळपीर, रिसोड आणि वाशीम.
  • यवतमाळ जिल्हा – यवतमाळ आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर- नबाबपूर आणि पांढरकवडा.
  • भंडारा जिल्हा – भंडारा पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा.
  • चंद्रपूर जिल्हा – बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा,
  • गडचिरोली जिल्हा – गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली.
  • गोंदिया – गोंदिया, गोरेगाव (न.पं.). सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा.
  • नागपूर जिल्हा – बहादुरा (न.पं.). बेसा पिपळा (न.पं.). भिवापूर (न.पं.). कांद्री कन्हान (न.पं.).कोंढाळी (न.पं.). महादुला (न.पं.),मौदा (न.पं.), निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), वानाडोंगरी, बिडगाव – तरोडी (खु)(न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.).येरखेडा (न.पं.). बुटीबोरी, डिगडोह, कळमेश्वर, ब्रह्मणी, कामठी, काटोल, खापा, मोहपा, नरखेड, रामटेक, सावनेर, उमरेड, कन्हान पिपरी, मोवाड, वाडी
  • वर्धा जिल्हा – वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.