Navi Mumbai International Airport Inauguration Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्धाटन होत आहे.
८ आणि ९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज (बुधवारी) त्यांनी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी बुधवारी दुपारी ३ वाजता नवी मुंबई येथे पोहोचले आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील.
Navi Mumbai Airport Launch 2025 Live Today | पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटन
Navi Mumbai Airport Inauguration 2025: मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर अवजड वाहनांच्या लांबच-लांब रांगा
Navi Mumbai Airport Inauguration 2025: अभिनेते शशांक केतकर यांची नवी मुंबई विमानतळावरील पोस्ट चर्चेत; स्वच्छतेच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: आजचा भारत घरात घुसून मारतो – पंतप्रधान मोदी
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आमच्यासाठी देश आणि देशातील लोकांच्या सुरक्षेपेक्षा मोठे काही नाही. आजचा भारत दमदार प्रत्युत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. हे जगाने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाहिले.
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, विदेशी दबावाच्या खाली कोण आले? कुणी मुंबई आणि देशाच्या भावनेशी खेळ केला, हे काँग्रेसला सांगावे लागेल. देशाला हे जाणून घेण्याचा हक्क आहे. काँग्रेसच्या कमजोरीमुळे दहशतवादाला बळ मिळाले. देशाची सुरक्षा कमजोर झाली, ज्याची किंमत देशाला पुन्हा पुन्हा अनेकांचे जीव गमावून मोजावी लागली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: दुसऱ्या देशाच्या दबावाखाली भारताने पाकिस्तानवर हल्ला केला नाही – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जे देशाचे माजी गृहमंत्री राहिले आहेत. त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, मुंबईवरील हल्ल्यानंतर आमचे सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते. संपूर्ण देशही हीच मागणी करत होता. पण काँग्रेसच्या नेत्याने सांगितल्यानुसार, दुसऱ्या देशाच्या दबावाखाली काँग्रेस सरकारने भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले.”
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: काँग्रेसने मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादासमोर गुडघे टेकण्याचा संदेश दिला – पंतप्रधान मोदी
मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहेच. त्याशिवाय सर्वात वायब्रंट शहर आहे. त्यामुळेच २००८ साली इथे दहशतवादी हल्ला झाला. पण तेव्हाच्या काँग्रेस सरकारने दहशतवादासमोर गुडघे टेकण्याचा संदेश दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: मविआ सरकारमुळे हजारो कोटींचे नुकसान झाले – पंतप्रधान मोदी
मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मी केले होते. पण त्यानंतर काही काळासाठी वेगळे सरकार आले. त्यांनी ते काम थांबवले. त्यांना सत्ता मिळाली. पण देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना असुविधा झाली. आता मुंबई मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईत एका एका मिनिटाचे महत्त्व आहे. तिथे मुंबईकरांना या प्रकल्पासाठी चार ते पाच वर्षांची वाट पाहावी लागली, हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच्या काळावर टीका केली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: राष्ट्रनीति हाच राजनीतिचा आधार – पंतप्रधान मोदी
आम्ही अशा वातावरणात वाढलो आहोत, जिथे राष्ट्रनीती हाच राजनितीचा आधार असतो. आम्ही यासाठी विकास प्रकल्पांना अधिक महत्त्व देत आलो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: भारताकडून १००० विमानांची ऑर्डर दिली गेली आहे – पंतप्रधान मोदी
भारताकडून १००० विमानांची ऑर्डर दिली आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात विमाने आयात केल्यामुळे वैमानिक, केबिन क्रू, ग्राऊंड वर्कर यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढतील. विमाने वाढली तर त्याच्या देखभालीसाठी तंत्रज्ञ लागतील. हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: हवाई चप्पल घालणाराही हवाई प्रवास करू शकतो, हे माझे स्वप्न होते – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले, २०१४ साली मी जेव्हा पंतप्रधान झालो, तेव्हा माझे स्वप्न होते की, हवाई चप्पल घालणारा सामान्य माणूसही हवाई प्रवास करू शकेल. यासाठी मी १० वर्षात अनेक विमानतळांना परवानग्या दिल्या. २०१४ साली देशात ७४ विमानतळ होते. त्याची संख्या वाढून आता १६० एवढी झाली आहे.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान मोदींनी दिबा पाटील यांचा केला उल्लेख; म्हणाले, “त्यांचे काम…”
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, दिबा पाटिल यांचे काम आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत आहे. उद्घाटनाचे भाषण करत असताना ते म्हणाले, विजयादशमी झाली, कोजागिरीही झाली. आता दहा दिवसांनी येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना आधीच शुभेच्छा देतो.
अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबईत तिसरी आणि वाढवण बंदर येथे चौथी मुंबई होईल – मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघरच्या वाढवण येथे बंदर प्रकल्प दिला आहे. काही वर्षांनी येथे ऑफशोर विमानतळही बांधले जाणार आहे. नवी मुबंई ही तिसरी मुंबई आणि वाढवण ही चौथी मुंबई होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: देशातील सर्वात मोठी जमिनीखालील मेट्रो आपण मुंबईत तयार करू शकलो – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईत देशातील सर्वात मोठी ४० किमी अंतर असलेली जमिनीखालील मेट्रो महायुती सरकारच्या काळात तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पात अनेक अडथळे निर्माण झाले. मात्र मोदी सरकारमुळे ही सर्व आव्हाने पार करण्यात आले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: महाराष्ट्राचा जीडीपी १ टक्क्यांनी वाढविण्याची क्षमता ठेवणारे विमानतळ – मुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्राचा जीडीपी १ टक्क्यांनी वाढविण्याची क्षमता ठेवतो, असेही उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ९ कोटी प्रवाशी हाताळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नव्या भारताचे प्रतीक आहे. या विमानतळाची संकल्पना १९९० च्या दशकातील होती. मात्र याचे काम वेगाने पुढे जात नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा हाती घेतल्यानंतर एका बैठकीत निर्णय घेतला ८ ना-हरकत प्रमाणपत्र दिले. ९ कोटी प्रवाशी हाताळणारा विशाल विमानतळ येथे बांधण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबा पाटील यांचा उल्लेख करत म्हटले…
भूमिपूत्रांच्या हक्काकरिता ज्यांनी लढा उभारला त्या लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देतो, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: विकासाला स्थगिती देणारे स्थगिती सरकार आम्ही हटवून लावले – एकनाथ शिंदे
“महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानंतर आलेल्या मविआ सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली. त्यानंतर २०२२ साली आलेल्या आपल्या सरकारने सर्व स्थगिती उठवून लावल्या आणि प्रकल्पांना पुन्हा गती दिली”, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर टीका केली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात विमानतळांची संख्या दुप्पट झाली – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “नवी मुंबई विमानतळावरून फक्त विमानच उड्डाण घेणार नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नांचेही उड्डाण होणार आहे. मोदींनी २०१४ साली जेव्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली तेव्हा देशात ७४ विमानतळ होते, मागच्या १० वर्षात ही संख्या वाढून दुप्पट झाली आहे. २०३० पर्यंत तिप्पट म्हणजे २२० करण्याचा मोदींचा निर्धार आहे.”
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाचे उड्डाण – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले होते, त्याचे आज लोकार्पण होत आहे. मोदींचा हात लागतो त्याचे सोने होते, हे आपण पाहतो. २०१४ मध्ये मोदींनी जो टेकऑफ केला तो भारताला महासत्ता करण्यासाठीच. उड्डाण म्हटले की, आम्हाला पंतप्रधान मोदी आठवतात.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबई विमानतळ उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांची शेरोशायरी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारकडून होणाऱ्या विकासकामांची प्रशंसा केली. ते म्हणाले…
आँखे में कई ख्वाब बाकी है
दिल में कई हसरतें बाकी है
मैं कैसे थक जाऊँ
अभी कई मंजिलें बाकी है…
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन: मुंबईला मिळाले नवीन विमानतळ – जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा विकास होण्यास मदत – अजित पवार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प सोपा नव्हता. अनेक अडथळे येऊनही विमानतळाचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे नवी मुंबईच्या स्थानिक भूमिपूत्रांचा विकास होणार आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ प्रकल्पाची घेतली माहिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा प्रकल्प खर्च १९,६५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर या प्रकल्पाची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
#WATCH | Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore.
— ANI (@ANI) October 8, 2025
(Source: DD News) pic.twitter.com/ff3z7MvhsH
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात येत आहे.
#WATCH | Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore.
— ANI (@ANI) October 8, 2025
(Source: DD News) pic.twitter.com/6kSxFSHNgB
दिबांचे नाव नाही, उद्घाटनाला जाणार नाही, खासदार बाळ्या मामांची भूमिका
“दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागतंय, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण – अतुल पाटील”
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फर्स्ट लूक पाहिलात का? पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडीओ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे थोड्या वेळातच उदघाटन होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच मी उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी निघालो असल्याचेही ते म्हणाले.
On the way to Navi Mumbai to take part in the programme marking the inauguration of Phase-1 of the Navi Mumbai International Airport. With this, the Mumbai Metropolitan Region will get its second major international airport, thus boosting commerce and connectivity. The final… pic.twitter.com/t6v82O6Een
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2025
“उद्घाटनाआधीच नवी मुंबई विमानतळावरील विमानं पाहण्यासाठी नागरिकांची महामार्गावर गर्दी”
Navi Mumbai Airport : सविस्तर : विमानतळाच्या नावाचा प्रवास आणि ‘दिबा’ नावाचा इतिहास
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा उल्लेख नाहीच ? पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून भूमीपुत्रांच्या अखेर अपेक्षा भंग (image credit – )
