-
‘सिंघम अगेन’च्या रिलीजबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि त्याच्या ट्रेलरने आधीच खळबळ उडवून दिली आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्यांच्या फीबाबतही चर्चा आहे. या चित्रपटासाठी ‘सिंघम अगेन’च्या स्टार्सनी किती मामधन घेतले आहे ते जाणून घेऊया. (Still From Film)
-
अजय देवगण
या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अजय देवगणने ‘सिंघम अगेन’साठी सर्वाधिक फी घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी जवळपास ३५ कोटी रुपये घेतले आहेत. (Still From Film) -
अक्षय कुमार
या चित्रपटात अक्षय कुमार त्याचा ‘सूर्यवंशी’ अवतार पुन्हा साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने २० कोटींची मोठी रक्कम घेतली आहे. (Still From Film) -
करीना कपूर
या चित्रपटात करीना कपूर ‘सिंघम’च्या पत्नीची मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी तिने १० कोटी रुपये घेतले आहेत, जे दीपिकापेक्षा जास्त आहे. (Still From Film) -
रणवीर सिंह
रणवीर सिंह या चित्रपटात त्याचे प्रसिद्ध पात्र ‘सिम्बा’ पुन्हा साकारताना दिसणार आहे. या कॅमिओसाठी रणवीर सिंहने १० कोटी रुपये घेतले आहेत. (Still From Film) -
दीपिका पदुकोण
या चित्रपटात दीपिका पदुकोणची छोटी भूमिका आहे, ज्यामध्ये ती ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी दीपिकाने ६ कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film) -
अर्जुन कपूर
अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकाची भूमिका करताना दिसणार असून दीपिकाप्रमाणे त्यानेही ६ कोटी रुपये घेतले आहेत. (Still From Film) -
टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ आणि त्याचे वडील जॅकी श्रॉफ देखील चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहेत. टायगर श्रॉफने त्याच्या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये घेतले. (Still From Film) -
जॅकी श्रॉफ
तर जॅकी श्रॉफ यांनी २ कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film)
(हे देखील वाचा: Lawrence Bishnoi : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर ‘लॉरेन्स बिश्नोई’ कोण आहे?)
Photos : अजय देवगणने ‘Singham Again’ साठी घेतले सर्वाधिक मानधन; इतर स्टार्सची फी किती?, जाणून घ्या
Sigham Again Starcast Fees : सिंघम अगेन १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता स्पष्टपणे दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.
Web Title: Singham again star cast fees ajay devgn commands highest fee among these actors spl