Maharashtra Local Body Elections 2025 : मराठवाड्यातील ४९ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १२, बीड व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी सहा, धाराशिवमधील आठ, जालना जिल्ह्यातील तीन, लातूरमधील चार, परभणीमधील सात नगरपालिका क्षेत्रात निवणूक होणार असून मरावड्यातील ही संख्या ४९ एवढी आहे. याशिवाय फुलंब्री, रेणापूर आणि हिमायतनगर या नगरपंचायतीमध्येही निवडणूक होणार आहे.

नगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पाणी पुरवठा हे वर्षानुवर्षाचे प्रश्न कायम असले तरी नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नवेच मुद्दे चर्चेत येण्याची येण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्षांनी आता या मतदारसंघात आपापले उमेदवार कोण असतील याची चाचपणी करण्यास सुरूवात केली होती. आता येत्या काही दिवसात प्रचाराला रंग चढेल.

मराठवाड्यात सर्वात महत्वाची निवडणूक परळीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर परळी शहरात नवे गणिते बसविताना मुंडे बंधु- भगिनींकडून काय रणनीती आखली जाते, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आपआपल्या मतदारसंघातील नगरपालिकेच्या क्षेत्रात पकड रहावी म्हणून आमदारांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नगरपालिकांमध्ये निवडणूक

  • बीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई, धारुर
  • छत्रपती संभाजीनगर : कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, सिल्लोड आणि फुलंब्रीची नगरपंचायत
  • धाराशिव : धाराशिव, भूम, परंडा, कळंब, मुरुम, नळदूर्ग, उमरगा, तुळजापूर
  • हिंगोली : वसमत, हिंगोली, कळमनुरी
  • जालना : अंबड, भोकरदन, परतूर
  • लातूर : उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा आणि रेणापूर नगरपंचायत
  • नांदेड : भोकर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, किनवट, लोहा आणि हिमायतनगर नगरपंचायत
  • परभणी : गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ