India Operation Sindoor Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.

Live Updates

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!

21:31 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : “तुमची माहिती तपासा!” जुने व्हिडिओ शेअर केल्याबद्दल भारताने चीनला फटकारले

जुन्या घटनेतील व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरचे असल्याचं सांगत चीनच्या माध्यमांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. …सविस्तर बातमी
21:11 (IST) 7 May 2025

Pakistan shelling near LoC: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून गोळीबार; जम्मूतील पूंछमध्ये ४ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

Pakistan shelling near LoC: पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू असून जम्मूतील पुंछ जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. …सविस्तर बातमी
20:41 (IST) 7 May 2025

ऑपरेशन सिंदूर… लष्करी कारवायांची नावे ठरतात कशी? संदेश आणि उद्दिष्टांचाही विचार कसा होतो? 

अनेक नावांवरूनच भारतीय लष्कराच्या यशस्वी मोहिमांचे स्मरण केले जाते. …अधिक वाचा
20:22 (IST) 7 May 2025
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात पूंछ जिल्ह्याच्या गुरुद्वारातील तिघांचा मृत्यू, अकाली दलाचा निषेध

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्याला मोठा फटका बसला असून येतील गुरुद्वारामधील तिघांचा मृत्यू झाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

20:19 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक कसा केला? भारतीय लष्करानं व्हिडीओ केले शेअर

Operation Sindoor Video: भारतीय लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम कशी पार पडली, याबाबतचे व्हिडीओ लष्कराच्या वतीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. …वाचा सविस्तर
19:36 (IST) 7 May 2025

Operation Sindoor Live Updates: मुंबईत ब्लॅकआऊट कधी आणि कोणकोणत्या ठिकाणी होणार?

आज देशभरातील २५९ ठिकाणी युद्धसराव केला जाणार आहे. मुंबईतही ८ वाजल्यापासून ब्लकआऊटची सुरुवात होईल. अणुशक्ती नगर, गोवंडी, तारापूर येथे ब्लकआऊट केला जाईल.

19:01 (IST) 7 May 2025

Rajnath Singh on Operation Sindoor: “हनुमानानं जे अशोक वाटिकेत केलं, तेच आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आम्ही फक्त त्यांनाच मारले, ज्यांनी निरपराधांना मारले होते. …सविस्तर वाचा
17:37 (IST) 7 May 2025

Rajnath Singh on Air Strike: राजनाथ सिंह यांनी एअर स्ट्राईकबाबत निवेदन केलं आहे.

“दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यावर प्रत्युत्तर देण्याचा अधिकार भारतानं वापरला आहे. दहशतवाद्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी या एअर स्ट्राईकमधून फक्त त्यांचे तळ आणि त्यांची यंत्रणा लक्ष्य करण्यात आले”, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

17:37 (IST) 7 May 2025

Rajnath Singh on Air Strike: राजनाथ सिंह यांनी एअर स्ट्राईकबाबत निवेदन केलं आहे.

“हनुमानानं अशोक वाटिकेत जे केलं, तेच भारतीय लष्करानं केलं. ज्यांनी आमच्या निरपराध नागरिकांना मारलं, त्यांनाच आम्ही मारलं”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

17:10 (IST) 7 May 2025

कसाब-हेडलीचा संदर्भ ते भारताचा जगाला संदेश… एअर स्ट्राईकबाबत भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेतले १० प्रमुख मुद्दे!

India Ari Strike in Pakistan: भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर लष्करानं ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली आहे. …वाचा सविस्तर
16:56 (IST) 7 May 2025

“आता लाहोर आणि कराचीमध्ये तिरंगा फडकवला पाहिजे”, Operation Sindoor वर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

India Airstrike Operation Sindoor : योगगुरू रामदेव बाबा यांनी पाकिस्तानावर केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. …अधिक वाचा
16:23 (IST) 7 May 2025

पाकिस्तानविरोधातील Operation Sindoor वर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “इतिहास साक्ष आहे…”

Congress on India Airstrike Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईवर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. …अधिक वाचा
15:06 (IST) 7 May 2025

Virender Sehwag post on Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर विरेंद्र सेहवागची खोचक पोस्ट…

ऑपरेशन सिंदूरदरम्यान एअर स्ट्राईकची कारवाई झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानला खिजवणारी प्रतिक्रिया दिली आहे. “अगर कोई आपपर पथ्थर फेंके, तो उसपर फूल फेंको, लेकिन गमले के साथ, जय हिंद..ऑपरेशन सिंदूर, कव्हॉट अॅन अॅप्ट नेम”, असं या पोस्टमध्ये सेहवागनं म्हटलं आहे.

14:43 (IST) 7 May 2025
Sharad Pawar Calles PM Narendra Modi: एअर स्ट्राईकनंतर शरद पवारांचा मोदींना फोन

शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन… स्वत: दिली सोशल मीडियावर माहिती…

“ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली.”

13:49 (IST) 7 May 2025

Raj Thackeray on Air Strike: राज ठाकरेंची ऑपरेशन सिंदूरबाबत वेगळी भूमिका!

“पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केले. त्यांनी दहशतवादी ठार मारले.”

13:45 (IST) 7 May 2025
PM Modi meets President Draupadi Murmu: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात येत आहे. या बैठकीत एअर स्ट्राईक आणि उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ याचीही माहिती मोदी राष्ट्रपतींना देणार आहेत.

13:44 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, गुरुवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीत संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये ही बैठक होईल. या बैठकीत सर्व पक्षांना आजच्या एअर स्ट्राईकबाबत व ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली जाईल.

13:42 (IST) 7 May 2025
Amit Shah Meeting: केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावली सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला सीमा लागून असलेल्या भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असून २ वाजता ते या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री तर जम्मू-काश्मीर व लडाख प्रांतांचे राज्यपाल यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.

12:53 (IST) 7 May 2025

Omar Abdullah : “सुरुवात पाकिस्तानने केली, आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर J&Kचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

India Airstrike Operation Sindoor : पाकिस्तानने त्यांच्या बंदुका शांत केल्या तर आम्हीही बंदुका उचलणार नाही, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले. …अधिक वाचा
12:49 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: मोदींची गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक संपली आहे. एअर स्ट्राईकनंतर आता पुढची रणनीती कशी आखायची, यासंदर्भात या बैठकीच चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

12:46 (IST) 7 May 2025

Air Strike on Pakistan: दिल्ली हज कमिटीकडून पंतप्रधानांचे मानले आभार

पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर दिल्ली हज कमिटीच्या चेअरपर्सन कौसर जहान यांची प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदींचे मानले आभार!

12:44 (IST) 7 May 2025

India Air Strike on Pakistan: एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला उपरती…

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.

12:40 (IST) 7 May 2025
PM Modi Postponed Foreign Tour: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी विदेश दौरा रद्द केला

भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे तीन देशांचे विदेश दौरे पुढे ढकलले आहेत. बुधवारी मोदी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँडच्या दौऱ्या जाणार होते. आता हे दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत.

12:33 (IST) 7 May 2025

Air Strike Terrorist Camp List: एअर स्ट्राईक केलेल्या दहशतवादी तळांची सविस्तर यादी…

मरकझ सुभानअल्लाह, बहावलपूर – जैश ए मोहम्मद

मरकझ तैयबा, मुरीदके – लष्कर ए तैयबा

सरजल, तेहरा कालान – जैश ए मोहम्मद

मेहमूना जोया, सियालकोट – हिजबुल मुजाहिद्दीन

मरकझ अहले हदिथ, बरनाला – लष्कर ए तैयबा

मरकझ अब्बास, कोटली – जैश ए मोहम्मद

मस्कार राहील शाहीद, कोटली – हिजबुल मुजाहिद्दीन

शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद – लष्कर ए तैयबा

सईदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद – जैश ए मोहम्मद

12:21 (IST) 7 May 2025

Air Strike on Pakistan: पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे भारतातील हवाई वाहतुकीवर परिणाम

कोणत्या विमानतळावरील वाहतूक झाली विस्कळीत? वाचा यादी

१. दिल्ली

२. धरमशाला

३. लेह

४. जम्मू

५. श्रीनगर

६. अमृतसर

७. चंदीगड

12:20 (IST) 7 May 2025

Air Strike on Pakistan: पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे भारतातील हवाई वाहतुकीवर परिणाम

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. काही विमानतळांवरून विमान उड्डाणे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. यात एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांचा समावेश आहे.

12:16 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुखांचं सूचक विधान!

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंचं एअर स्ट्राईकनंतर सूचक विधान, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “अभी पिक्चर बाकी है…”

12:08 (IST) 7 May 2025

“आम्ही संयम बाळगून आहोत पण…” भारतीय लष्कराचा पाकिस्तानला सज्जड इशारा; विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या…

Air Strike on Pakistan: पाकिस्तानसह पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतानं एअर स्ट्राईक केला असून पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. …वाचा सविस्तर
11:49 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : अजमल कसाब आणि डेविड हेडलीने प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त; हल्ल्याचा VIDEO आला समोर!

India Airstrike Operation Sindoor : कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज पत्रकार परिषदेत भारताची हवाई हल्ल्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जिथे जिथे हल्ला घडवून आणला तेथील व्हिडिओही फुटेजही जारी केले आहेत. …सविस्तर वाचा
11:10 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा पाकिस्तानला इशारा…

भारतानं या एअर स्ट्राईकमध्ये पूर्णपणे नियंत्रित कारवाई केली आहे. दहशतवाद्यांच्या तळांवर नियंत्रित हल्ले केले आहेत. पण पाकिस्ताननं जर काही आगळीक केली, तर भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. यातून परिस्थिती अधिक चिघळू शकते – विंग कमांडर व्योमिका सिंग

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!