Maharashtra Exit Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Live Updates, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? काय आहेत एक्झिट पोल?
Maharashtra Poll Percentage :दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३२.१८ टक्के मतदान
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्नी ईशा सिंह यांच्यासोबत आपला मताचा अधिकार बजावला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात मासुळकर कॉलनीतील एस. एस. अजमेरा शाळेत रांगेत उभे राहून त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. यावेळी सर्व मतदारांनी देखील आपला मताचा हक्क बजावावा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले आहे.
११३ वर्षे वय असलेल्या श्रीमती कांचनबेन नंदकिशोर बादशाह आणि वय वर्षे १०३ असलेले श्री. जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले.
नेपियन सी मार्ग येथील रहिवासी व ११३ वर्षे वय असलेल्या श्रीमती कांचनबेन नंदकिशोर बादशाह तसेच ग्रँट रोड येथील रहिवासी असणारे आणि वय वर्षे १०३ असलेले श्री. जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना शतायुषी मतदारांचा उत्साह तरुणांनाही मागे टाकेल, असा ठरतो आहे.
Mumbadevi Constituency : जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले; मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील घटना
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मतदान सुरू असून मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ही तरुणाईला प्रेरित करणारी ठरत असून बहुसंख्य वृद्ध मतदार मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. सविस्तर वाचा
वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; कोणी व्हिलचेअरवरून, तर कोणी वॉकर घेऊन मतदान केंद्रात दाखल
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मतदान सुरू असून मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ही तरुणाईला प्रेरित करणारी ठरत असून बहुसंख्य वृद्ध मतदार मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. सविस्तर वाचा
लातूर जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.55% मतदान
लातूर ग्रामीण- 20.78
लातूर शहर- 21.32
अहमदपूर- 15.09
उदगीर- 17.97
निलंगा- 18.23
औसा- 17.36
चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल
राज्याचे चारवेळा उपमुख्यमंत्री, अनेक वर्षे मंत्री आणि सगळी सत्ता त्यांच्याकडे असताना अन्याय कसा झाला, असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. आता युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : चंद्रकांत मोकेटे यांनी मतदानाचा हक्क बजाविला.
कोथरूडचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकेटे यांनी मतदानाचा हक्क बजाविला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेले मतदान
पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघा पैकी हडपसर मतदार संघात पहिल्या चार तासात सर्वात कमी मतदार झाले आहे. सकाळी सात ते अकरा या चार तासांमध्ये हडपसर मध्ये ११.४७ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत या मतदारसंघात ४.४५ टक्के मतदार झाले होते.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेले मतदान
वडगाव शेरी १५.४८%
शिवाजीनगर १३.२१%
पुणे कॅन्टोन्मेंट १४.१२%
पर्वती १५.९१%
कोथरूड १६.०५%
खडकवासला १७.०५%
कसबा १८.३३%
हडपसर ११.४७%
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : प्रसिद्ध नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी मतदान केले
प्रसिद्ध नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी निगडी, रूपीनगर येथील शाळेत मतदान केले. कायद्याने आपल्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण बजावलाच पाहिजे. मतदान केल्याचा मला आनंद व अभिमान आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : पर्वती मतदासंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
बिबवेवाडी येथील सर सेनापती हैबतराव शिळीमकर इंग्लिश मीडियम शाळेतील मतदान केंद्रावर पर्वती मतदासंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीचा उत्सव साजरा करूया, चला मतदान करूया ! पुण्याच्या आणि राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणही मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे आणि आपले अमुल्य मत देऊन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन मिसाळ यांनी केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : ९३ वर्षांच्या कमलताई देशमुख यांनी मतदान केले
९३ वर्षांच्या कमलताई देशमुख यांनी कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिर प्रशाला या शाळेतील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर जाऊन मतदान केले.
सांगली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी महापालिका शाळा क्र. सहा ओव्हरसिएर कॉलनी येथे मतदान केले.
Uran Assembly Constituency voting live: उरण मध्ये अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान; मतदान करण्यासाठी दोन दोन तासांची प्रतीक्षा
उरण : विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजे पर्यंत २९.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एका मतदान केंद्रात एक मशीन असल्याने जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्य दिले जात असल्याने अनेक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून मतदारांना मतदानासाठी दोन दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. उरणच्या ग्रामीण भागातील मतदार घरा बाहेर पडले आहेत. यात महिला आणि तरुणांची संख्या अधिक आहे.
Uran Poll Percentage उरण मध्ये 29.30 टक्के मतदान
Panvel Assembly Poll Percentage: पनवेल विधानसभा क्षेत्र सकाळी पहिल्या सत्रात ११ वाजेपर्यंत या दोन तासांत १६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडूणक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी दिली.
पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोंढावा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अझहर तांबोळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंबई : मतदार माहिती चिठ्ठी नसल्याने अनुक्रमांक घोळ
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. अनेक मतदार मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजता मतदान केंद्रांवर पोहोचले. मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदारांचा बराच वेळ जात होता.
मनोरमा नगर येथे डेमो मशीनद्वारे भाजप उमेदवार संजय केळकर यांचा प्रचार केला जात असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाने केळकर यांच्या कार्यालयात शिरून डेमो मशीन जप्त केल्या.
काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला; विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल
‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले. आज मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला.
Maharashtra Poll Percentage : ११ वाजेपर्यंत झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या दीडपट मतदान
Maharashtra Poll Percentage : सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात केवळ १८.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर झारखंडमध्ये ३१.३७ लोकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे.
31.37% voter turnout recorded till 11 am in the second and final phase of #JharkhandElection2024 18.14% recorded till 11 am in #MaharashtraElection2024 pic.twitter.com/krfUHJ9Pnd
— DD News (@DDNewslive) November 20, 2024
Panvel Assembly Elections Live Update:पनवेलमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी कुटूंबासोबत मतदान केले
पनवेल ः पनवेल विधानसभा निवडणूकीच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सकाळच्या सत्रात विविध मतदान केंद्रांवर कुटूंबासहीत मतदान केले. भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील गुजराथी शाळेतील मतदान केंद्रांवर कुटूंबासहित मतदान केले. यावेळी माजी खा. रामशेठ ठाकूर, रायगड जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला.
शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी पत्नी राजेश्री, मुलगा आदित्य आणि मुलगी दिप्ती हीच्यासह मतदानाचा हक्क प.जो. म्हात्रे विद्यालयाच्या मतदान केंद्रात बजावला. तसेच खारघर येथे राहणा-या उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या उमेदवार लीना गरड यांनी खारघर येथील मतदान केंद्रातील बुथ क्रमांक १२५ येथे मतदानाचा हक्क बजावला. गरड यांच्यासोबत त्यांचे पती पोलीस निरिक्षक अर्जुन गरड यांनी सुद्धा मतदान केले.
Nanded By eEection : नांदेड पोटनिवडणुकीत दुपारी ११ वाजेपर्यंत १२.५९ टक्के मतदान
12.59% voter turnout recorded till 11 am in the Lok Sabha by-elections to Nanded, Maharashtra. pic.twitter.com/mg4VjOr6Gi
— ANI (@ANI) November 20, 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना व्हीलचेअर सुविधा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मुंबईतील मतदान केंद्रांवर येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना व्हीलचेअर सुविधा पुरवण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांचे स्वयंसेवक मदत करत आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : महेश सावंत यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
दादर – माहीम विधानसभेतील महायुतीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला
अणुशक्तीनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन मतदारांना केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान
वडगाव शेरी ६.३७%
शिवाजीनगर ५.२९%
पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३%
पर्वती ६.३०%
कोथरूड ६.५०%
खडकवासला ५.४४%
कसबा ७.४४%
हडपसर ४.४५%
वडगाव शेरी उमेदवार बापू पठारे यांनी मतदान केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : निवारा वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांनी केले मतदान
निवारा वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील धर्मवीर संभाजी विद्यालयात मतदान केले.
यंदाची विधानसभा निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.
एका बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीन पक्ष, तर दुसऱ्या बाजूला भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे.