2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल – सातव्या फेरी अखेर भाजपचे प्रशांत ठाकूर यांना १०,७५५ मतांची आघाडी
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेलमध्ये एकुण मतदान ३ लाख ८२ हजार झाले असून आतापर्यंत पाचव्या फेरीपर्यंत ८१ हजार मतांची मोजणी झाली आहे
Maharashtra Assembly Election Results 2024 : बेलापूर -७ व्या फेरी अखेर भाजपच्या मंदा म्हात्रे ११०० मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : आतापर्यंत ७३९ मते नोटाला
शिवसेना भवन परिसरात शुकशुकाट
Maharashtra Assembly Election Results 2024 : शेकापचे बाळाराम पाटील यांना सहाव्या फेरी अखेर ३७,०२६ मते तर ठाकरे गट शिवसेनेच्या लीना गरड यांना १२,३४८ मते
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल – सहावी फेरी अखेर भाजपचे प्रशांत ठाकूर ४,८९२ आघाडीवर
मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्याने बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक मार्ग बंद केल्याने बस सेवा खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
धारावी आगाराच्या विभागामध्ये संत चनया मार्ग येथे मतमोजणी केंद्र असल्याने पोलिसांनी धारावी आगार ते धारावी कोळीवाडा जंक्शन दरम्यान दोन्ही दिशेने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पहिल्या बसपासूनच बस मार्ग क्रमांक सी ७२, ४६, ५२, ४११, २५ शीवमार्गे परावर्तित करण्यात आले आहेत. पोयसर आगाराच्या विभागामध्ये बजाज रोड, के. एन. रोड येथे शाळेमध्ये मतमोजणी केंद्र असल्याने पोलिसांनी दोन्ही दिशेमध्ये रस्ता बंद केला आहे. त्यामुळे बस मार्ग क्रमांक २७४, २८०, २८६, २८१, २४६, २४४, २३९, २७७ एस . व्ही. रोड मार्गे परावर्तित करण्यात आले आहेत.
प्रतीक्षा नगर आगाराच्या विभागामध्ये संगमनगर येथे मतमोजणी केंद्र असल्याने बस मार्ग क्रमांक १४, १५, ८८, १७२ अँटॉप हिल बस थांबा घेतल्यानंतर अप दिशेमध्ये वाल्मिकी चौक येथून उजवे वळण घेऊन शेख मिस्त्री दर्गा मार्गावरून वडाळा उड्डाणपुलावरून परावर्तन करण्यात आले आहेत. तसेच बस मार्ग क्रमांक ११० व ११७ या संगम नगरऐवजी गणेश नगर येथून चालविण्यात येत आहेत.
मरोळ आगाराच्या विभागात विशाल हॉल येथे निवडणूक मतमोजणी केंद्र असल्यामुळे चकाला जंक्शन येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरील बस मार्ग रिजन्सीवरून तेली गल्लीमार्गे आगरकर चौक असे परावर्तित करण्यात आले आहेत. मागाठाणे आगाराच्या विभागात अभिनव नगर येथे मतमोजणी केंद्र असल्यामुळे आप्पा शिधाये मार्गावरील बस मार्ग क्रमांक ४७७ श्रीकृष्ण नगर येथे खंडित करण्यात आला आहे.
वरळी आगाराच्या विभागात दादर पश्चिम जैन मंदिर येथे मतमोजणी असल्यामुळे मोशी जावळे मार्ग कबूतरखाना येथे वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ११८ कबूतरखाना येथे खंडित करण्यात आला आहे. मरोळ आगाराच्या विभागात जोगेश्वरी पूर्व युसूफ कॉलेज येथे मतमोजणी असल्यामुळे जोगेश्वरी स्थानक मार्ग बंद केला आहे. या मार्गावरील बस मार्ग क्रमांक ४४२, ४२८, २६४ अप दिशेने सुभाष रोड मार्गे परावर्तित करण्यात आले आहेत.
वरळी आगाराच्या विभागात जैन मंदिर गोल देऊळ येथे मतमोजणी केंद्र असल्याने एस. के. बोले मार्ग बंद केल्यामुळे या मार्गावरील बस मार्ग क्रमांक सी ५४, १६९, १७२, १६५, ३५४, ३५१, ३८५ डाऊन दिशेने एन. सी. केळकर मार्गाने परावर्तित करण्यात आले आहेत. मुलुंड आगाराच्या विभागात केळकर कॉलेज येथे मतमोजणी असल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३७० खेडेकर वाडी येथून चाफेकर बंधू मार्गाने परावर्तित करण्यात आला आहे. बॅकबे आगाराच्या विभागात विल्सन कॉलेज येथे मतमोजणी असल्यामुळे बँड स्टँड ते सुखसागरपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ६७, ८०, १०३, १२३ हे बाबुलनाथ पाटकर मार्गाने परावर्तित केले आहेत. मुलुंड आगाराच्या विभागात केळकर कॉलेज येथे मतमोजणी असल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३७० खेडेकर वाडी येथून चाफेकर बंधू मार्गाने परावर्तित करण्यात आला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून दिली.
वरळी विधानसभा
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे पिछाडीवर, आदित्य ठाकरे यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत ६५० मतांची आघाडी, वरळीत चुरस वाढली
पाचव्या फेरीनंतर राहुल नार्वेकरांची आघाडी कायम
कुलाब्यात भाजपाचे राहुल नार्वेकर १४ हजार मतांनी आघाडीवर
चेंबूर विधानसभा (पाचवी फेरी)
प्रकाश फातरपेकर- 12635
तुकाराम काते- 12048
माऊली थोरवे- 935
दीपक निकाळजे 4495
प्रकाश फातरपेकर आघाडीवर
मुंबईत सेनाभवनावर (ठाकरे) शुकशुकाट, बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल
निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुतीला बहुमत मिळेल असं दिसतंय. त्यामुळे भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट आहे. मुंबईत सेनाभवनावर (ठाकरे) शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान) दाखल झाले आहेत.
कुर्ला विधानसभा (चौथी फेरी)
मंगेश कुडाळकर ( शिंदे शिवसेना ): 18564
प्रविणा मोरजकर ( ठाकरे शिवसेना ) : 9377
स्वप्नील जवळघेकर ( VBA ) : 724
प्रदीप सावंत ( मनसे ) : 810
नोटा : 442
9187 मतांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर
वांद्रे पूर्व (पाचवी फेरी)
ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई 5052 मतांनी आघाडीवर
अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर
वरुण सरदेसाई -15445
झिशान सिद्दिकी – 10392
भांडुप पश्चिम (पाचवी फेरी)
रमेश कोरगावकर आघाडीवर १८२२
अशोक पाटील पिछाडीवर
अशोक पाटील (शिंदे गट) – १६८८१
रमेश कोरगावकर – (ठाकरे गट) – १८७०३
शिरीष सावंत (मनसे)- ३३६५
कुर्ला विधानसभा (तिसरी फेरी)
मंगेश कुडाळकर ( शिंदे शिवसेना ): 14535
प्रविणा मोरजकर ( ठाकरे शिवसेना ) : 7023
स्वप्नील जवळघेकर ( VBA ) : 508
प्रदीप सावंत ( मनसे ) : 581
नोटा : 367
7512 मतांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर
विक्रोळी विधानसभा (सहावी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर ४५९८
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – ६०७९
२) सुनील राऊत – २२०१६
३) सुवर्णा करंजे – १७४१८
४) नोटा – ५९३
एकूण मते – ४७५४८
Sawantwadi Assembly Election Results Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर नितेश राणे ४३९३ मताने आघाडीवर
नितेश राणे ८९२२
संदेश पारकर ४५२९
Sawantwadi Assembly Election Results Live Updates :सावंतवाडी मतदारसंघात तिसऱ्या फेरीत दिपक केसरकर ४ हजार ८८४ मतांनी आघाडीवर सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. या फेरीत दिपक केसरकर चार हजार ८८४ मतांनी आघाडीवर आहेत.
Vasai Assembly Election Results Live Updates : वसई विधानसभा (दुसरी फेरी)
१. हितेंद्र ठाकूर (बविआ) – ३,०८८
२. स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) – ३,७५३
३. विजय पाटील (कॅांग्रेस) – २,२५५
दुसऱ्या फेरीत हितेंद्र ठाकूर ६६५ मतानी पिछाडीवर
Assembly Election Results Live Updates : संगमनेर मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पहिल्या फेरी अखेर १२७५ मतांनी पिछाडीवर.
Nalasopara Assembly Election Results Live Updates : पहिल्या फेरीत भाजपा चे राजन नाईक आघाडीवर ५०० मताने
विद्यमान आ क्षितिज ठाकूर पिछाडीवर
राजन नाईक ( भाजपा) ८७८४
क्षितिज ठाकूर (बविआ) ८१९२
भाजपा ५०० मतांची आघाडी
Sawantwadi Assembly Election Results Live Updates : सावंतवाडी मतदारसंघात दुसऱ्या फेरीत दिपक केसरकर २ हजार ९४८ मतांनी आघाडीवर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. या फेरीत दिपक केसरकर दोन हजार ९४८ मतांनी आघाडीवर आहेत.
Kolhapur Assembly Election Results Live Updates : कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर ४२०० मतांनी आघाडीवर
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर २९९५ आघाडीवर
कागलमधून हसन मुश्रीफ २४०० मतांनी आघाडीवर
इचलकरंजी मधून राहुल आवाडे ६९२३ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक २६१२ आघाडीवर
शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर (पहिली फेरी)
शाहूवाडी सत्यजित पाटील आघाडीवर
चंदगडमधून शिवाजी पाटील १०२५ मतांनी आघाडीवर
करवीरमधून राहुल पाटील २०० मतांनी आघाडीवर (पहिली फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने मतांनी आघाडीवर (पहिली फेरी )
Assembly Election Results Live Updates : Ncp जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर आघाडीवर
माहिम (चौथी फेरी)
महेश सावंत – 9604
अमित ठाकरे – 4815
सदा सरवणकर – 6458
महेश सावंत 3336 मतांनी आघाडीवर
विर्ले पार्ले
भाजपचे पराग अळवणी -8527 मतांनी आघाडीवर
ठाकरे गटाचे संदीप नाईक पिछाडीवर
पराग अळवणी -211161
संदीप नाईक -12634
अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ (सातवी फेरी)
फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार – २०४१७
सना मलिक राष्ट्रवादी- १८८६६
नवीन आचार्य मनसे – १०४६६
सतीश राजगुरू वंचित २३१०
फहाद अहमद – १५५१ मतांनी आघाडीवर
वरुण सरदेसाई आघाडीवर
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत.
चेंबूर
प्रकाश फातरपेकर 9693
तुकाराम काते- 7765
माऊली थोरवे- 714
दीपक निकाळजे 4421
प्रकाश फातरपेकर आघाडीवर