IPL Auction 2024 Highlights (December 19): आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण पर्स रक्कम २६२.९५ कोटी रुपये होती. या पर्समधून ७२ खेळाडू खरेदी करण्यात आले. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहास मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

Live Updates

IPL Auction 2024 Highlights in Marathi: आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण पर्स रक्कम २६२.९५ कोटी रुपये होती. या पर्समधून ७२ खेळाडू खरेदी करण्यात आले.

17:34 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : मोहम्मद, सरफराज आणि राज राहिले अनसोल्ड

मोहम्मद अर्शद खान: 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या या खेळाडूला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

सरफराज खान: या खेळाडूवर कोणत्याही संघाने 20 लाखांची मूळ किंमत असताना बोली लावली नाही.

राज अंगद बावा: कोणत्याही संघाने 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या अष्टपैलू खेळाडूला खरेदी केले नाही.

17:21 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : राजस्थान रॉयल्सने शुभम दुबेला 5.80 कोटी खरेदी केले

राजस्थान रॉयल्सने अनकॅप्ड खेळाडू शुभम दुबेवर मोठी बोली लावत त्याला 5.80 कोटी रुपयांना खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737077351152775672

17:17 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 :ब्रेकनंतर पुन्हा लिलाव सुरू, शुभम दुबेवर लागली बोली

लिलावाची पुढील फेरी सुरू झाली आहे. ब्रेकनंतर पहिली बोली भारतीय खेळाडू शुभम दुबेवर लागली आहे. शुभमची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे.

https://twitter.com/IPL/status/1737075063357100227

16:56 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

मिचेल स्टार्क 24.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स

पॅट कमिन्स 20.05 कोटी सनरायझर्स हैदराबाद</p>

डॅरेल मिशेल 14.75 कोटी चेन्नई सुपर किंग्स

हर्षल पटेल 11.74 कोटी पंजाब किंग्ज</p>

16:07 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आता पाचवा सेट कॅप्ड फिरकी गोलंदाजांचा आहे

आता कॅप्ड खेळाडूंचे सेट संपले आहेत. जे खेळाडू येथे विकले गेले नाहीत ते पुन्हा बोलीमध्ये विकले जाऊ शकतात. मात्र, या सर्व खेळाडूंवर पुन्हा बोली लावली जाणार नाही. यापैकी ज्या खेळाडूंची नावे फ्रँचायझी देतील त्यांनाच पुन्हा लिलावासाठी आणले जाईल. पुढील सेटमध्ये ज्या खेळाडूंनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, त्यांच्यावर बोली लावली जाईल. यातील बहुतांश खेळाडू भारतीय अंडर-19 संघ आणि देशांतर्गत क्रिकेटमधील असतील.

16:03 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : तबरेझसोबत मुजीबलाही खरेदीदार मिळाला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेझ शम्सीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तो अनसोल्ड राहिला. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोधीही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रहमानची मूळ किंमत 2कोटी रुपये होती. तो पण अनसोल्ड राहिला.

https://twitter.com/IPL/status/1737057558513242453

16:01 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : इंग्लंडचा आदिल रशीद राहिला अनसोल्ड

अफगाणिस्तानचा गोलंदाज वकार सलामखेलची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. मात्र त्यांच्यावर कोणी बोली लावली नाही. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. वेस्ट इंडिजचा खेळाडू अकिल हुसेनही विकला गेला नाही.

https://twitter.com/IPL/status/1737056948527235085

15:58 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : मधुशंकाला मुंबईने विकत घेतले

श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकाची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. लखनौने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर मुंबईने बोली लावायला सुरुवात केली. अखेर मदुशंकाला मुंबईने 4.60 कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737056309202014469

15:56 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 :जयदेव उनाडकटला हैदराबादने खरेदी केले

भारतीय खेळाडू जयदेव उनाडकटची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सही खेळात उतरली. पण शेवटी हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने जयदेवला 1.60 कोटींना खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737055323947401708

15:50 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : स्टार्कने कमिन्सचा मोडला विक्रम , आयपीएल इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मुंबई आणि दिल्ली दरम्यान 9.60 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागली. यानंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावायला सुरुवात केली. अखेर कोलकाताने स्टार्कला २४.७५ कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/cricbuzz/status/1737054346083512645

15:35 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : लखनऊ सुपर जायंट्सने शिवम मावीला खरेदी केले

भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 6.40 कोटींना विकत घेतले. शिवम मावीला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6.20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण लखनऊ सुपर जायंट्सने शिवम मावीला खरेदी केले.

https://twitter.com/code_with_ssn/status/1737051541054562369

15:30 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : गुजरात टायटन्सने उमेश यादवला 5.80 कोटींना खरेदी केले

भारतीय गोलंदाज उमेश यादवची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. यानंतर दिल्ली कॅपिटल्सही खेळात उतरली. पण गुजरात जिंकला. उमेश यादवला गुजरातने 5.80 कोटींना खरेदी केले.

https://twitter.com/techind34820937/status/1737050098142437671

15:24 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले

1 कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. लखनऊ सुपर जायंट्सने जोसेफला खरेदी करण्यासाठी 11.25 कोटी रुपये पर्यंत बोली लावली. पण शेवटी आरसीबीचा विजय झाला.

https://twitter.com/IPL/status/1737046849360417175

15:23 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड राहिला

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजावर कोणत्याही संघाने बाजी मारली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

https://twitter.com/IPL/status/1737046349609136218

15:19 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : कोलकाताने चेतन साकारियाला विकत घेतले

भारतीय वेगवान गोलंदाज चेतन साकारियाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने मूळ किमतीत विकत घेतले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. फर्ग्युसन न विकले गेले.

https://twitter.com/nipplow/status/1737046887734345905

15:17 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : कुसल मेंडिस इंग्लिशसह अनसोल्ड राहिला

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिश अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

https://twitter.com/IPL/status/1737045891570110652

15:14 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : केएस भरत आणि स्टब्स यांना मिळाली आधारभूत किंमत

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला आधारभूत किमतीत खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737045429508800899

15:11 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : फिलिप सॉल्ट अनसोल्ड राहिला

पुढील फेरीची बोली सुरू झाली आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज फिलिप सॉल्टवर बोली लावली जात आहे. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे. पण त्यांना कोणीही विकत घेतले नाही.

https://twitter.com/IPL/status/1737044781035934046

15:07 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : तिसरा सेट कॅप्ड वेगवान गोलंदाजांचा आहे

हा संच अशा वेगवान गोलंदाजांचा आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे. या सेटमध्ये सर्वांच्या नजरा मिचेल स्टार्क आणि उमेश यादव या खेळाडूंवर असतील.

15:03 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2024 मधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू –

पॅट कमिन्स – 20.05 कोटी – सनरायझर्स हैदराबाद</p>

डॅरेल मिशेल – 14.75 कोटी – चेन्नई सुपर किंग्ज</p>

हर्षल पटेल -11.74 कोटी -पंजाब किंग्स

15:01 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : चेन्नई आणि हैदराबादने प्रत्येकी तीन खेळाडू विकत घेतले, राजस्थानने पॉवेलवर लावली मोठी बोली

आतापर्यंतच्या लिलावावर नजर टाकली तर चेन्नईने तीन खेळाडू विकत घेतले आहेत. त्याने डॅरिल मिशेलला 14 कोटी रुपयांना खरेदी केले. रचिन रवींद्रला 1.80 कोटींना विकत घेतले. शार्दुल ठाकूरला 4 कोटींना विकत घेतले. हैदराबादने तीन खेळाडू विकत घेतले. पॅट कमिन्सला 20.50 कोटींना विकत घेतले. ट्रॅव्हिस हेडला 6.80 कोटी रुपयांना खरेदी केले. तर वानिंदू हसरंगाला 1.50 कोटींना विकत घेतले. पंजाबने ख्रिस वोक्स आणि हर्षल पटेलला विकत घेतले. हर्षलला 11.75 कोटींना विकले गेले. राजस्थानने रोव्हमन पॉवेलवर मोठी बोली लावली. दिल्लीने हॅरी ब्रूकला तर मुंबईने जेराल्ड कोएत्झीला विकत घेतले आहे.

14:51 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : दुसऱ्या सेटमध्ये एकूण नऊ खेळाडूंवर लागली बोली

या सेटमधील एकूण नऊ खेळाडू लिलावासाठी आले आणि सर्व विकले गेले. पॅट कमिन्स 20.5 कोटी रुपयांची किंमत मिळवून आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. हर्षल पटेल आणि डॅरिल मिशेलवरही 10 कोटींहून अधिकची बोली लावण्यात आली होती.

14:49 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : पंजाबने ख्रिस वोक्सला 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर कोलकाता नाईट रायडर्सने पहिली बोली लावली. पण शेवटी पंजाब किंग्जने बाजी मारली. पंजाबने ख्रिस वोक्सला 4.20 कोटी रुपयांना खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737038107944337766

14:46 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : सीएसकेने डॅरिल मिशेलला 14 कोटींना खरेदी केले

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर पंजाब किंग्जने बोली लावायला सुरुवात केली. यानंतर सीएसकेने बोली लावण्यास सुरुवात केली. शेवटी चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आणि मिशेलला विकत घेतले. सीएसकेने मिशेलला 14 कोटींना खरेदी केले.

https://twitter.com/cricbuzz/status/1737037940386406692

14:28 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : हर्षल पटेलला पंजाब किंग्सने 11.75 कोटींना खरेदी केले

भारतीय खेळाडू हर्षल पटेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने त्याच्यावर पहिली बोली लावली. गुजरातपाठोपाठ पंजाब किंग्जही खेळात उतरले. गुजरात आणि पंजाब यांच्यातील लढत शेवटपर्यंत कायम राहिली. यानंतर लखनौ सुपर जायंट्सनेही बोली लावायला सुरुवात केली. पण शेवटी पंजाब किंग्जने बाजी मारली. पंजाबने हर्षल पटेलला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले.

https://twitter.com/cricbuzz/status/1737034014920458647

14:26 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने त्याला 5 कोटी रुपयांना खरेदी केले

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोएत्झीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मुंबई इंडियन्सने त्याला 5 कोटी रुपयांना खरेदी केले. आता टीम इंडियाचा खेळाडू हर्षल पटेलवर बोली लावली जात आहे.

https://twitter.com/Thejus_tv/status/1737032906441408956

14:18 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : पॅट कमिन्सने रचला विक्रम, आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू

ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने कमिन्सवर पहिली बोली लावली. यानंतर मुंबई इंडियन्सने बोली लावायला सुरुवात केली. या दोघांमध्ये 4.80 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली. यानंतर आरसीबी खेळात आला. चेन्नई 7.60 कोटी रुपयांपर्यंत बोलीत राहिले. यानंतर सनरायझर्स हैदराबादने स्पर्धा सुरू केली. शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली.

कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. हैदराबादने त्याला 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले.

https://twitter.com/shuaibakhtar113/status/1737032034839879685

14:09 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : ओमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले

अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737028391780384917

14:08 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : सीएसकेने शार्दुल ठाकूरला 4 कोटींना विकत घेतले

चेन्नई आणि हैदराबादने शार्दुल ठाकूरला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला. अखेर चेन्नईने त्याला 4 कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/IPL/status/1737027607873409190

14:01 (IST) 19 Dec 2023
IPL Auction 2024 : चेन्नईने रचिन रवींद्रला 1.8 कोटींना खरेदी केले

चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रवींद्रला 50 लाखांची मूळ किंमत घेऊन खरेदी करण्याची शर्यत होती. चेन्नईने त्याला 1.8 कोटींना खरेदी केले. रवींद्रने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी चेंडू आणि बॅटने चमत्कार केला.

https://twitter.com/IPL/status/1737026312437383250

IPL Auction 2024 Highlights in Marathi: या लिलावात एकूण ७२ खेळाडूंची विक्री झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महागडा ठरला. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटींना विकत घेतले.