Maharashtra News Today: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर आज तारखेनुसार राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते विधिवत पूजा केली जात असताना दुसरीकडे पुण्यात लाल किल्ल्यामध्येही विविध संघटनांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:59 (IST) 6 Jun 2023
वर्धा: देशात सर्वात लहान पण कमाईत अव्वल! जाणून घ्या कुठे आहे हा व्याघ्र प्रकल्प…

वर्धा : देशात सर्वात छोटा म्हणून नोंद असलेला बोर व्याघ्र प्रकल्प उत्पन्नात मात्र अव्वल ठरला आहे. देशात सर्वात छोटा पण विमानतळापासून सर्वात जवळचा म्हणून हा प्रकल्प वैशिष्ट्य राखून आहे.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 6 Jun 2023
मुंबई: कीटकनाशक विभागातील पदे १५ जूनपर्यंत न भरल्यास कामगारांचा आंदोलनाचा इशारा

किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त असलेली १२१ पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत, याबाबत दि म्युनिसिपल युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

सविस्तर वाचा

12:58 (IST) 6 Jun 2023
कल्याण: पर्यावरणदिनानिमित्त आदिवासी भागात मुलांकडून बिजारोपण

कल्याण- पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील शबरी सेवा समितीच्या माध्यमातून आदिवासी, दुर्गम भागातील शाळकरी मुलांनी गाव परिसरातील डोंगर, माळरान, रस्त्यांच्याकडेला विविध झाडांच्या बियांचे रोपण केले.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: खोके सरकार लवकरच दरीत पडणार – अमोल मिटकरी

खातेवाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटातील अस्वस्थ नेत्यांना मान्य नाही – अमोल मिटकरी

12:51 (IST) 6 Jun 2023
गडचिरोली : बायकोच्या बदलीसाठी त्याने चक्क पाठवला गृहसचिवांच्या नावे बनावट आदेश; असे फुटले बिंग…

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता. यात पोलीस मदत केंद्र धोडराज येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल व पोलीस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

पर्यटनाची एकही संधी आपलं सरकार सोडणार नाही. त्यासाठी जे जे काही आवश्यक असेल, ते आपण करणार आहोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंधुदुर्गात बोलताना विधान

12:46 (IST) 6 Jun 2023
अमरावती : पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून तरुणाची हत्या

पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून उद्भवलेल्या वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मिल चाळ परिसरात सोमवारी घडली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

12:44 (IST) 6 Jun 2023
वर्धा नगरपालिकेला महापालिका करण्यास ग्रामपंचायतींचा कराडून विरोध

वर्धा: वर्धा नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच समाविष्ट होणाऱ्या २७ ग्रामपंचायतींमध्ये विरोधाचे वातावरण सुरू झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा. कोकणात आपण योजनांच्या माध्यमातून असे अनेक हात निर्माण करू शकतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

12:43 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

आपल्या सरकारने यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी सिंधुदुर्गात दिला – एकनाथ शिंदे

12:42 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी म्हणजे कोकण – एकनाथ शिंदे

12:20 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: विलास लांडे अजूनही शिरूरमधून खासदारकीसाठी इच्छुक?

शरद पवारांनी जर काम करायची संधी दिली, तर काम करायला आवडेल. पण मी विरोध करायचा म्हणून करणार नाही. अमोल कोल्हे चांगले अभिनेते आहेत. ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. पण जर मला शरद पवारांनी कुठेही संधी दिली, तरी काम करायची तयारी आहे. त्यांनी संधी नाही दिली तरी काम करायची माझी तयारी आहे – विलास लांडे

12:19 (IST) 6 Jun 2023
नागपूर: युवकाचा विधवा महिलेवर बलात्कार

नागपूर: एका विधवा महिलेशी जवळीक साधून एका युवकाने बलात्कार केला. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. विधवेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद साठवणे (गारळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त नाही – दानवे

मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही हे मी सांगतोय. विस्ताराला कोणताही मुहुर्त लागणार नाही – अंबादास दानवे</p>

11:55 (IST) 6 Jun 2023
आमच्या मर्जीने बिहारची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात; कथित तस्करी प्रकरणात पालकांचा दावा

मनमाड: बिहारमधून मुलांच्या तस्करीप्रकरणी या मुलांचे पालक मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांचे जाब -जबाब नोंदविले जात आहेत. या मुलांना आम्ही आमच्या मर्जीने शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवले.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 6 Jun 2023
जळगाव: वायू प्रदुषणाचा शेतीवर परिणाम; दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

जळगाव: दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळसह परिसरात जल आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यात आता भुसावळ तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 6 Jun 2023
‘मान्सून’चा मुहूर्त हुकला! आगमनाबाबत साशंकता; प्रवेश लांबणीवर!

राज्यात नऊ जूनला मान्सूनचा प्रवेश होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता मान्सूनच्या आगमनाबाबत कोणतीही घोषणा हवामान खात्याने केली नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त हुकल्याच्या चर्चेला वेग आला आहे. भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये देखील मान्सून दाखल होण्याच्या अंदाज सोमवारी दिला नाही.

सविस्तर वाचा

11:34 (IST) 6 Jun 2023
गोदाकाठी स्वच्छता मोहीम; प्लास्टिक संकलन, तपोवनात ३०० किलो कचरा जमा

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर विशेष स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा तसेच नदीपात्रात वाहून आलेला व साठून राहिलेला कचरा संकलित करण्यात आला.

सविस्तर वाचा

11:33 (IST) 6 Jun 2023
जळगाव जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक मंदिरांत आता वस्त्रसंहिता, पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर, पारोळा येथील बालाजी मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत पुढील आठवड्यात ती लागू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 6 Jun 2023
Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स

Apple वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Apple WWDC 2023 पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. इव्हेंटची सुरूवात सीईओ टीम कूक यांनी केली. Apple एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना अ‍ॅडॉप्टिव्ह मोड मिळणार आहे. यामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हॉइस कॅन्सल लेव्हल सेट करणार आहे. जाणून घ्या सगळे अपडेट्स. वाचा सविस्तर बातमी

11:05 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

छत्रपतींचा एकच प्रयत्न होता की शेवटच्या माणसाला लागेल ते देण्यासाठी सत्ता. हे छत्रपतींचं सूत्र होतं. त्यांनी कष्टानं, त्यागानं राज्य उभं केलं – लाल महालातून शरद पवारांनी छत्रपती शिवरायांविषयी व्यक्त केल्या भावना.

11:04 (IST) 6 Jun 2023
नागपूर: रेल्वेला प्रवाशांच्या झोपेची काळजी, नियमात केले बदल, काय आहेत ते?

नागपूर: जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ते रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत आहेत.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 6 Jun 2023
शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

नाशिक: शहर आणि ग्रामीण भागात अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला नव्याने उभारी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी आपली ताकद वाढवित असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अनेक वर्षांपासून निरव शांतता अनुभवण्यास येत होती.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

पुरातत्त्व खात्याला वाटतं की त्यांचा किल्ली आहे ठीक आहे. पण जर आम्हाला वाटलं तर आम्ही तो किल्ला आमच्या ताब्यातही घेऊ शकतो – संभाजीराजे छत्रपती

11:02 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

तारखेनुसार का सुरू केला कारण माझी इच्छा होती की हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा जगभरात पोहोचू शकतो. २००७ ला जेव्हा मी हा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा काही हजार मावळे गडावर होते. आज ४ लाख मावळे आहेत. ही तुमची ताकद आहे – संभाजीराजे छत्रपती

10:57 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

रायगडावरची शिवाजी महाराजांची ८०० किलोची मूर्ती मावळ्यांनी बसवली आहे. मलाही शिवभक्त म्हणून ही संधी मिळाली आहे – संभाजीराजे छत्रपती

10:56 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

मी राज सदरेवरून बोलतोय. नाही सगळे किल्ले रायगड मॉडेलप्रमाणे केले, तर बघा. आम्हाला ५० किल्ले दत्तक द्या – संभाजीराजे छत्रपती

10:55 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

मला सरकारला सूचना द्यायच्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, १५-२० मंत्री, अनेक आमदार-खासदार तिथीच्या वेळी इथे आले होते. चांगले भाषणं झाले. देवेंद्र फडणवीसांनी माझं कौतुक केलं की रायगड प्राधिकरणाचं काम चांगलं चाललंय. ठीक आहे. त्यांनी घोषणा केली की ५० कोटी शिवसृष्टीला देऊ. पाचाडला आपण ८८ एकर जमीन संपादित केली आहे. पण माझं सरकारला आव्हान आहे. २० वर्षं मी दमलोय सरकारला सांगून. आपली जिवंत स्मारकं कुठली असतील, तर हे आपले गडकोट किल्ले आहेत. इथल्या दगडा-दगडात इतिहास आहे. तुम्ही प्रतापगडाचं प्राधिकरण केलं हे ठीक आहे. पण तुम्ही छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवर बोलणार केव्हा? मी म्हटलं ५० किल्ले आम्हाला दत्तक द्या. आम्हाला एक रुपयाही सरकारचा नकोय – संभाजीराजे छत्रपती

10:53 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

मी स्वत: म्हणतोय की मी दोन टक्के जरी शिवाजी महाराजांसारखा झालो, तर माझं जीवन सार्थक आहे. त्यासाठी तुम्ही सुसंस्कृत नेतृत्व शोधलं पाहिजे. जो शिवाजी महाराजांच्या मार्गाने जातो, त्याच्यामागे जा, काही हरकत नाही – संभाजीराजे छत्रपती

10:50 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या…

शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. ते धर्मांध नव्हते. आदिलशाही धर्मांध होती. औरंग्या धर्मांध होता. दुसऱ्यंच्या धर्मावर अत्याचार करून ते आपला धर्म पुढे घेऊन जात होते. शिवाजी महाराज रुढी-परंपरा जपायचे म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी कधीच दुसऱ्याच्या धर्मावर अत्याचार केला नाही. पण आपल्या धर्मावर कुणी आडवं आलं, तर त्याची गयही केली नाही – संभाजीराजे छत्रपती

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर