Maharashtra Politics Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात होता, असा आरोप भुजबळांनी केला आहे. त्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राहुल गांधींनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे. दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
Maharashtra News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
साताऱ्यातील गरवारे युवा विकास केंद्रातर्फे कौशल्यविकास उपक्रम; ग्रामीण युवकांना रोजगारसंधी
पश्चिम नदी वळविण्याच्या पाणी आणण्यासाठी मिश्र वित्तीय तरतुदीची चाचपणी
सांगलीच्या जत भागात पावसाचा धुमाकूळ; शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली
पनवेल महापालिकेत टक्केवारी? भाजपा आमदाराच्या आरोपामुळे खळबळ…
कर्नाटकातून आलेल्या हत्तींमुळे महाराष्ट्र आणि गोव्यात दहशत; ओंकार हत्तीला पकडण्याचा वन विभागाने घेतला निर्णय
पिंपरी- चिंचवड: वृद्ध महिला प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; १३ तोळे सोन्याचे दागिने
Video: नालासोपाऱ्यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली; घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद
सांगोल्यात ढगफुटीसदृश पाऊस; घरे, शेतात पाणी शिरले; मका, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान
शिर्डीतील प्रसादालयात भाविकांना मराठमोळ्या साई आमटीचा प्रसाद
वाहनचालकांवर आता अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर वाहनांची’ नजर; स्पीडगन, ई-चलन ब्रेथ अॅनालायजर आणि इतर यंत्रणांचा समावेश
नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचेच नाव मिळाला हवे… अन्यथा…. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला हा इशारा
सोनसाखळीच्या लोभापायी वृध्देची हत्या; केशकर्तनालयात हत्या करून मृतदेह नाल्यात
थेऊरमधील पूरस्थितीस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
कल्याण-डोंबिवलीत पाय ठेवू देणार नाही; संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या विरोधात कल्याण-डोंबिवली येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कल्याण-डोंबिवलीत संजय राऊतांना पाय ठेऊ देणार नाही. अशा इशारा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा दिला आहे.
चतुःशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
पालघर मध्ये हिट अँड रन केस; विरारच्या दुचाकी चालकाचा मृत्यू
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून चिमुकल्याचा मृत्यू
पत्नीकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा पती ताब्यात
‘जीएसटी’ दर कपातीने मोदी सरकारला बघा किती नुकसान…
नांदेड: किवळा तलावात बुडून दोघांचा मृत्यू
कारेगाव फाटा येथे शेतकर्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न ! शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा तीव्र निषेध
सांगली-पेठ महामार्ग भूसंपादन; भरपाई न मिळाल्यास आंदोलन
कोल्हापुरातील उद्योजकांना इंडोनेशियात निर्यातीची व्यापक संधी – एडी वार्डोयो; इंडोनेशिया – कोल्हापूर व्यापारी, औद्योगिक संबंध विषयक बैठक
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणापूर्वी दि.बां.च्या नावावर पडदा
ड्रग्समुळे केवळ शरीरच नव्हे, तर देशाची राष्ट्रीय घडीही उद्ध्वस्त होत आहे – समीर वानखेडे
हेवी डिपॉझिट देत घर घेताय ? सावधगिरी बाळगा…. एकच सदनिका अनेकांना देतो सांगत पाच जणांची ३६ लाखांची फावणूक
Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग
नांदेडच्या १६ मंडळांमध्ये १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
Supriya Sule : छगन भुजबळांच्या ‘त्या’ आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? पुरावे…”
‘वनवासा’वर खा.चव्हाण यांची सारवासारव !
लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक. ई केवायसी केल्यानंतरच महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)