Maharashtra Breaking News Updates, 17 October 2025: राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही महत्त्वाची पदे आणि अधिक जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.
याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Maharashtra Marathi News Live Updates
पुरंदर विमानतळासाठीच्या मोबदल्याचा प्रस्ताव दिवाळीनंतर; सात गावांतील ड्रोन सर्वेक्षण पूर्ण
दिवाळीपूर्वी आनंदवार्ता : मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मेट्रोला सर्वाधिक २४६१ कोटी, तर पुणे मेट्रोसाठी ५०८ कोटी..
दिवाळीचे पडघम…
जमीन मालकाची फसवणूक प्रकरणात बंडू आंदेकरसह तिघांविरुद्ध गुन्हा
दिवाळीनिमित्त पुणे विमानतळावर नवीन प्रणाली… हवाई प्रवाशांना दिलासा
राज्य शासनाकडून अधिकारीच मिळेना… पीएमआरडीएचा डीपी रद्द झाल्यानंतर विकास कामे प्रलंबित
‘कोणत्याही क्षेत्रात आत्मनिर्भरता शक्य…’ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असे का म्हणाले?
पुण्यातील रस्ते खोदाई आत होणार ‘मार्किंग’ने काय आहे कारण !
पुण्यात दिवाळीत चार वर्षांत आगीच्या १३५ घटना, यंदा महापालिकेने घेतला निर्णय !
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संरक्षणमंत्र्यांचे भाष्य… म्हणाले, ‘त्यांचा धर्म पाहून नाही, कर्म पाहून मारले…’
दिवाळी फराळ दरात वाढ, मागणी कायम
दिवाळीत यंदा नवीन काय ? दिवाळी खरेदीत नवे ट्रेंड्स; लक्ष्मीपूजन साहित्य, आकाशकंदिल व माळांमध्ये नवा जलवा
एचएएल नाशिक प्रकल्पातील स्मार्ट टाउनशिपचे महत्व काय ?…संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन
Banana Market : आवक कमी मागणी जास्त… तरी केळी भावात घसरण !
Nashik Crime : धक्कादायक… ग्राहकाच्या रोकडवर दरोड्याचा प्रयत्न ; कटात बँक कॅशियरचा सहभाग
Gold Silver Price : धनत्रयोदशीच्या आधी सोन्याचा विक्रम… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर
Mangesh Chavan : चाळीसगावच्या भाजप आमदाराचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा व्हायरल !
अश्वत्थामा आजही दऱ्याखोऱ्यात…सातपुड्यातील अस्तंभा पर्वताचे दिवाळीतील महत्व काय ?
घरोघरी दीपज्योती
पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर – ठाणे विस्तार प्रकल्प : ३२० झाडांची कत्तल, तर ३८६ झाडांचे पुनर्रोपण करणार
राज्य निवडणूक आयोगाने ‘नगरविकास’कडून अहवाल मागवला; अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यातील दिरंगाई
रस्त्याच्या दुरुस्ती अभावी पालघरमध्ये ‘धुळीचा डोंगर’; खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे श्वास घेणही कठीण
सर्वोच्च न्यायालयाचा अनिलकुमार पवार यांना दिलासा… ईडीला फटकारले
मुंबई महानगर प्रदेशाचा २०४७ पर्यंत कायापालट – डॉ. संजय मुखर्जी
उरणची हवा प्रदूषित; धूलिकण, तापमानातही वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभेच्या प्रचारात; बेगूसरायमधील रोड शोमध्ये लावली हजेरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बेगुसराय येथे भाजपा उमेदवार कुंदन कुमार यांच्या रोड शोला हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, “बिहारमध्ये एनडीएचा विजय होईल. लोकांना नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. जनता प्रचंड मोठा विजय मिळवून देण्यास तयार आहे.”
‘गोकुळ’ ची चीज, गुलाबजाम उत्पादने बाजारात; वसुबारस कार्यक्रमात घोषणा
MHADA : ‘आधी या आणि घर घ्या’… सोडतीविना विक्री! म्हाडाची पुणे, सांगली, सोलापूरमधील रिक्त ३११ घरे विक्रीला
“आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू”, छगन भुजबळ यांचे वक्तव्य
मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “मागच्या सप्टेंबर पासून जे सुरू आहे ते आपण बघत आहात. आरक्षण जाणार या भीतीने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. माझे या सर्वांना आवाहन आहे की, अे करू नका. आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. ज्या बीड मध्ये जरांगेंच्या लोकांनी धुडगूस घातला, आमदारांची घरे जाळली, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले, त्याच बीडमध्ये आम्ही ओबीसी एल्गार मेळावा घेणार आहे.