Marathwada Rain News Highlights: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

नुकसान किती झाले याची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज (बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

Live Updates

Marathi News Live Today | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

16:32 (IST) 24 Sep 2025

बच्चू कडू कडाडले, ‘शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा नेपाळसारखे…’ आठ वर्ष लूट केल्यावर जीएसटी कमी

‘शेतकऱ्यांची लूट थांबवा’ आणि ‘सातबारा कोरा करा’ अन्यथा नेपाळ सारखे घरात घुसू असा इशारा शेतकरी नेते बच्चू कडू यांनी खांबाडा येथील शेतकरी आंदोलनात दिला …सविस्तर बातमी
16:16 (IST) 24 Sep 2025

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाची झडप…

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिट परिसरात शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. …सविस्तर वाचा
16:05 (IST) 24 Sep 2025

निम्न पैनगंगा धरण विरोधी लढाई पुन्हा जोमाने सुरू करणार; शेतकऱ्यांचा एकमताने निर्णय

विदर्भ- मराठवाडा धरण विरोधी संघर्ष समितीने घेतलेल्या बैठकीत निम्न पैनगंगा धरण विरोधी लढा पुन्हा जोमाने सुरू करण्याचा निर्धार केला. …सविस्तर वाचा
15:54 (IST) 24 Sep 2025

संतप्त शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात फेकले कुजलेले सोयाबीन, मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा…

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक आंदोलन केले. …सविस्तर बातमी
15:49 (IST) 24 Sep 2025

गडकरींच्या शहरात आधी उड्डाणपुलाचे बांधकाम, आता एका घराचे पाडकाम…

शहरातील जुन्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधून महामार्ग प्राधिकरण एनएच-३५३डी वरील ८.९ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे. …अधिक वाचा
15:39 (IST) 24 Sep 2025

“आम्ही कीड काढली…” जळगावात माजी आमदाराचे भाजप प्रवेशानंतर वक्तव्य

जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) जेमतेम सावरली होती. …सविस्तर वाचा
15:35 (IST) 24 Sep 2025

बाळासाहेब ठाकरे नाव पुसणारी ठाण्यातील “गद्दार” कंपनी अखेर आली ताळ्यावर.., राजन विचारेंनी शिंदेंच्या सेनेवर टीका

यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ” बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील गद्दार कंपनी अखेर आली ताळ्यावर” असे म्हटले आहे. …अधिक वाचा
15:31 (IST) 24 Sep 2025

पालघरमधील ‘खड्डे भरणे’ दिखावाच? नागरिकांच्या टीकेनंतर प्रशासनाला जाग, मात्र उपयोग शून्य, नागरिकांचा आरोप

शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. …सविस्तर बातमी
15:23 (IST) 24 Sep 2025

Maharashtra News Live: पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या कीटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो, रोहित पवारांनी केली टीका

मराठवाड्यात पूरग्रस्तांना वाटल्या जात असलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. यानंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर मा. एकनाथ शिंदे साहेब आणि ‘रॅपिडो’फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोची साईज खूप लहान असून यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत. म्हणजे लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबतील आणि लोकं फोटो बघून आनंदाने हसतील.”

14:57 (IST) 24 Sep 2025

दहिसर पथकर नाका स्थलांतराचा चेंडू केंद्राकडे! राष्ट्रीय महामार्गावर परवानगी देण्याची मागणी

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला दहिसर पथकर नाका वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. …अधिक वाचा
14:51 (IST) 24 Sep 2025

MPSC State Services Prelims 2025 Exam: एमपीएससी : २८ सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर विघ्न; पूर परिस्थितीमुळे परीक्षा…

येत्या २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. …सविस्तर वाचा
14:25 (IST) 24 Sep 2025

सौरऊर्जेची समृद्धी… समृद्धी महामार्गातील कांरजालाड आणि मेहकर येथे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे विणण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) आहे. …अधिक वाचा
14:16 (IST) 24 Sep 2025

Maharashtra News Live: मराठवाड्यानंतर आता विदर्भावर संकट? वारे, विजांसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितले आहे. या काळात विदर्भातील तापमान आणखी कमी होणार आहे. दरम्यान नागपूरसाठी पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.

13:38 (IST) 24 Sep 2025

उरण : राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या शंकर मंदिराचा स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जासई उड्डाणपूलाची मुख्य व सेवा मार्गाची मार्गिका येथील मार्गात येणाऱ्या शंकर मंदीरामुळे रखडली आहे. …सविस्तर वाचा
13:31 (IST) 24 Sep 2025

मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक तातडीने घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक तातडीने घेण्यात यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. …सविस्तर वाचा
13:17 (IST) 24 Sep 2025

झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे ठरले

त्रिस्तरीय निवडणुकीत ३२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाईल. …सविस्तर वाचा
13:12 (IST) 24 Sep 2025

Maharashtra News Live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्तांना दिलासा; म्हणाले, दिवाळीआधीच संपूर्ण मदत मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील सीना दारफळ येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली. नियम शिथिल करून शेतकऱ्यांना मदत देऊ. दिवाळीआधीच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. तसेच ज्यांच्या घरांचे, अन्न-धान्याचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत दिली जाईल. कुठलेही अधिकचे निकष न लावता. नागरीककेंद्रीत मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

12:48 (IST) 24 Sep 2025

कल्याणमध्ये रात्री रागात घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाला अज्ञाताने फूस लावून पळविले

पंधरा वर्षाचा हा अल्पवयीन मुलगा कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील रामबागेतील मसालेवाले चाळ भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतो. …वाचा सविस्तर
12:31 (IST) 24 Sep 2025

नवी मुंबईतील विना भोगवटा इमारतींचे दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन 

या कारवाईतून बेकायदेशीर दस्त नोंदणी करणा-या अधिका-यांना महसूल विभागाकडून हा एका प्रकारचा दणकाच आहे.  …सविस्तर बातमी
12:05 (IST) 24 Sep 2025

Marathwada Flood Live Updates: “राज्याला दोन दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री, पण…”, संजय राऊत यांचा मोठा आरोप

“मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही; जनतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षनेता करत असतो राज्याला दोन दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही! ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केली.

12:05 (IST) 24 Sep 2025

अपहरण प्रकरणी निलंबित सनदी अधिकाऱ्याच्या आई वडिलांच्या विरोधात लूक आउट नोटीस; खेडेकर दाम्पत्याच्या अडचणीत वाढ

मुलुंड ऐरोली मार्गावर गाडीला गाडी घासून किरकोळ अपघात झाला होता. यात सिमेंट मिक्सर गाडी चालकाचे अपहरण निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडेकर आणि वाहन चालक प्रफुल्ल साळुंके यांनी केले होते. …वाचा सविस्तर
12:03 (IST) 24 Sep 2025

लोकलवर दगडफेकीच्या घटनांमुळे महिला प्रवासी भयभीत, सुरक्षेच्या उपायांबरोबरच संरक्षक भींत उभारणार

लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या दोन घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावऱण पसरले आहे. …सविस्तर बातमी
11:59 (IST) 24 Sep 2025

Marathwada Flood Live Updates: नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे पाण्यात बसून आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीवर असलेले येळगाव धरणाचे गेट हे स्वयंचलित असल्याने धरण भरले की हे गेट उघडतात. त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान होते. ते गेट मानवनिर्मित करावे तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शेतातच साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. 

11:57 (IST) 24 Sep 2025

सीबीडी बेलापूर स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा, प्रवासी, व्यापारी त्रस्त; तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सीबीडी-बेलापूर या परिसरात अनेक लहान-मोठी कार्यालये आणि सिडको मुख्यालय असल्याने हे स्थानक नेहमीच प्रवाशांनी गाजबजलेले असते. …अधिक वाचा
11:44 (IST) 24 Sep 2025

Marathwada Rain Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरु केला. शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला. तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली.

11:42 (IST) 24 Sep 2025

पुण्यात पुन्हा जुने दिवस येणार, आठ ‘ डबल डेकर’ बस शहरात धावणार !

पुण्यात पीएमपी आठ डबल डेकर बस सेवा सुरू करणार असून, ट्रायल रन यशस्वी झाला आहे आणि मार्गांचे सुसूत्रीकरण तसेच नवीन बस खरेदीवरही चर्चा झाली आहे. …अधिक वाचा
11:31 (IST) 24 Sep 2025

‘आयआयएम’च्या उपकेंद्रांमुळे काय होणार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक शिक्षण संस्थांद्वारे व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम राबवण्यात येतात. त्याशिवाय अनेक खासगी विद्यापीठांचेही व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम आहेत. …अधिक वाचा
11:30 (IST) 24 Sep 2025

वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ; दोनदा पक्ष प्रवेश हुकल्याने खेडकर यांच्यासह समर्थक कार्यकर्ते नाराज

रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांची काही दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वैभव खेडेकर यांचे भाजप नेत्यांशी वाढलेल्या जवळकीमुळे त्यांना पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. …वाचा सविस्तर
11:30 (IST) 24 Sep 2025

महावितरणच्या वीज देयक वितरण व्यवस्थेचा बोजवारा…चार महिने झाले तरी रायगडमध्ये वीज देयके मिळेनात….

वीज ग्राहकांना दर महिन्याला साधारणपणे दरमहिन्याच्या १५ तारखेला वीज देयके प्राप्त होत होती. ज्या वीज देयकांचा भरणा साधारणपणे दरमहिन्याच्या ३० तारखेपर्यंत करणे अपेक्षित होते. …वाचा सविस्तर
11:30 (IST) 24 Sep 2025

अतिवृष्टीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी आणि विरोधकाचे दौरे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. …सविस्तर वाचा

अजित पवार सध्या पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. (PC : Ajit Pawar/FB)