Manoj Jarange LIVE Today: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकार कसा तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Reservation Protest Live Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Maratha Reservation Protest Mumbai Police Notice : आझाद मैदान रिकामे करा… मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांची नोटीस
Maratha Reservation Protest : मराठा समाजाचा निर्धार… जळगावमधून चार हजार कार्यकर्ते मुंबईत धडकणार
मराठा आरक्षण लागू असल्याने ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात अडथळा
मराठा आंदोलक रेल्वे रूळावर; मोटरमनच्या केबिनमध्ये शिरून, ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक झळकावले
न्यायालयाचे आदेश पाळा, मुंबईकरांना त्रास देऊ नका; गोंधळ करणाऱ्यांनी गावी निघून जावे; मनोज जरांगे यांचा आदेश
मनोज जरांगे यांना अशक्तपणा आणि कमी रक्तदाबाचा त्रास
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्यातच रविवारपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी १ वाजता डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम असली तर त्यांचा रक्तदाब कमी झाला असून अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे.
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत न्यायालयाच्या निर्देशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “निर्णयाचं पालन…”
मनोज जरांगे यांना अशक्तपणा आणि कमी रक्तदाबाचा त्रास
मुंबई आणि नवी मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलकांची नाकाबंदी सुरूच, जेवण नेणारी वाहने रोखल्याने मराठा आंदोलकांमध्ये संताप
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
बीएमसीने मराठा आंदोलनस्थळी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर नागरी सेवा पुरवण्यासाठी एक हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्वच्छता ट्रक, पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका मुक्तपणे फिरू शकतील यासाठी आंदोलकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डास आणि कीटकांची पैदास रोखण्यासाठी सहा पथके सतत धुरीकरण करत असल्याचेही महापालिकेने नमूद केले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: आम्ही जरांगे यांना संधी देतो: उच्च न्यायालय
आम्ही जरांगे यांना उद्या दुपारपर्यंत शहर आणि रस्ते रिकामे करण्याची संधी देतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: संपूर्ण मुंबई शहर ठप्प झाले आहे : उच्च न्यायालय
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फटकारले. जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन शांततेत नव्हते आणि त्यांनी परवानगी दिलेल्या सर्व अटींचे उल्लंघन केले होते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
न्यायालयाने असे नमूद केले की, संपूर्ण शहर ठप्प झाले आहे आणि दक्षिण मुंबईतील प्रमुख ठिकाणे आंदोलकांनी वेढली आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या विशेष खंडपीठाने एमी फाउंडेशनने आरक्षण आंदोलनाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची विशेष सुनावणी घेतली.
Mumbai Maratha Protest LIVE: सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांकडून कबड्डीचा खेळ
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या आतील भागात मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले आहे. येते हे आंदोलक कब्बडी खेळत असल्याचे दिसत आहे. (एक्सप्रेस फोटो/शंखदीप बॅनर्जी)
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: ‘मराठा आरक्षण’ आंदोलन शांततेत नव्हते; मुंबई उच्च न्यायालय
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘मराठा आरक्षण’ आंदोलन शांततेत नव्हते, त्यांनी सर्व अटींचे उल्लंघन केले आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको; मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने आज आदेश दिले की, आझाद मैदानावर ५ हजार आंदोलकांव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन करू नये. याचबरोबर सामान्य मुंबईकरांना त्रास होईल उसे कोणतेही कृत्य करू नये.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मुंबईमध्ये येणाऱ्या आंदोलकांना अडवा; उच्च न्यायालय
मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाल्याने, मुंबई ठप्प झाल्याचे चित्र आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना थांबण्यात यावे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मनोज जरांगे पाटील यांना उपचार द्या; मुंबई उच्च न्यायालय
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत बिघडली तर, त्यांना तत्काळ उपचार देण्यात यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार, मुंबई उच्च न्यायालय
मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाणी आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने तात्पूरती परवाणगी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्वांना आंदोलनाचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबईत ज्या ठिकाणी रस्ते आडवण्यात आले आहेत, त्याठिकाणाहून उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवण्याचे आदेश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचबरोबर आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी असे, न्यायालयाने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: आदेशाचे उल्लंघन: मुंबई उच्च न्यायालय
मनोज जरांगे पाटील यांना पाच हजार आंदोलकांसह एक दिवस आंदोलन करण्याची परवाणगी देण्यात आली होती. तरीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे, न्यायालयाने म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मराठा आंदोलक व रेल्वे प्रवाशामध्ये बाचाबाची
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यातील अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर आश्रय घेतला आहे. यावेळी मराठा आंदोलक व रेल्वे प्रवाशामध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटीवरून ३:०२ वाजताच्या बेलापूरला जाणाऱ्या लोकल मध्ये ही घटना घडली.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: सामन्य मुंबईकरांना त्रास होऊ नये: उच्च न्यायालय
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान हे आंदोलक गाड्या आणि रस्ते आडवत असल्याचे वृत्त आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने, मुंबईकरांना त्रास होईल असे काहीही करू नये असे म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: जरांगे यांनी रस्ते आडवायला सांगितले नाही: मराठा आंदोलकांचे वकील
मराठा आंदोलकांचे वकील पिंगळे यांनी उच्च न्यायालयाला माहिती दिली की, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना रस्ते आडवायला सांगितले नाही.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मराठा आंदोलनाप्रकरणी उद्याही सुनावणी
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सध्या दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने ते उद्याही सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: “जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या मागण्या ऐकल्या नाहीत तर ५ कोटींहून अधिक लोक मुंबईत येतील”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला की, “जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या मागण्या ऐकल्या नाहीत तर ५ कोटींहून अधिक लोक मुंबईत येतील.” यापूर्वी पाटील यांनी आंदोलन तीव्र करण्याची आणि आजपासून पाणी सोडण्याची घोषणा केली.
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मराठा आंदोलकांना मदत करायला सुरूवात केली आहे: अमित ठाकरे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, “मी ज्या आंदोलनाचा साक्षीदार आहे ते आमचे मराठा बंधू आणि भगिनी फक्त एक-दोन दिवसांची तयारी करून येथे आले आहेत. त्यांचे अन्न, पाणी आणि औषधे संपली आहेत. मला वाटते की, ते कुठून जरी आले असले तरी ते आपले आहेत. ते मुंबईत आले आहेत, त्यांना एकटे वाटू नये. ही आमची भावना आहे. आम्ही आजपासून त्यांना मदत करायला सुरुवात केली आहे.”
VIDEO : मराठा आंदोलकांनी जहाँगीर आर्ट गॅलरीतील कलावंतांचे स्वप्न उधळले!
Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी जेवण घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखली..,आंदोलकांनी निषेध नोंदविताच वाहने सोडली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसाहेब मराठा समाजाचा आपल्याला खूपच राग… मनसेच्या पदाधिकाऱ्याचे पत्र
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे प्रवाशांना सोमवारी आझाद मैदानावरून मराठा आरक्षण निदर्शकांचा जमाव रेल्वे स्थानकावर आल्यामुळे विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.
लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्या तरी, खरा त्रास सीएसएमटी येथे दिसून आला, जिथे लोकांना गर्दी असलेल्या गाड्यांमधून उतरण्यास तसेच स्टेशन सोडण्यास अडचणी येत होत्या, कारण आंदोलकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आश्रय घेतला होता, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. यामुळे अनेक खाजगी कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय दिला आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन लाईव्ह अपडेट्स.
जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.