Manoj Jarange LIVE Today: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकार कसा तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Reservation Protest Live Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे वाशी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चारचाकी वाहने आणि बसेसच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेले लोक रस्त्यावर अडकले आहेत. वाशी टोल नाक्यापासून वाशी गावापर्यंत सुमारे दीड किलोमीटरचा लांब जाम आहे.
Maratha Reservation: आझाद मैदानावरील घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; मराठा आंदोलकांबाबत म्हणाल्या, “त्यांचा एवढा हक्क…”
Manoj Jarange Patil Maratha reservation: शिवाजी महाराज ते शिंदे व्हाया शाहू महाराज- मराठा वर्चस्वाचा राजकीय इतिहास काय सांगतो?
मुंबई आपलीच आहे, फिरून घ्या ! मराठा आंदोलकांनी रविवारचे औचित्य साधत केले मुंबई पर्यटन
Amit Thackeray : मनोज जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतरही अमित ठाकरे मराठा आंदोलकांच्या मदतीला; म्हणाले, “जेव्हा गरज पडेल…”
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मुंबईत सीएसएमटी स्थानकाकडून हुतात्म चौकाकडे जाणारा रस्ता रोखला
मुंबईत सीएसएमटी स्थानकाकडून हुतात्म चौकाकडे जाणारा रस्ता मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे. याचबरोबर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी आंदोलकांनी डोक्यावरील केसांचे मुंडन सुरू केले आहे. दरम्यान आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
OBC Certificate Marathwada : मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप करा, मंत्रिमंडळ उपसमितीमधील सदस्यांचा आग्रह
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांकडून खो-खो
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान या आंदोलक सीएसएमटी स्थानकावर खो-खो खेळत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
Manoj Jarange : सरसकट शब्द काढा पण, आरक्षण द्या; मुंबईसह महाराष्ट्र बंद करण्याचा जरांगे यांचा इशारा
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मुख्यमंत्री म्हणून १० टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी केलं”, मंत्री जयकुमार गोरेंची टीका
मराठा आरक्षणावर बोलताना मंत्री जयकुमार गोरी म्हणाले की, “एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत जे झालं नाही ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणून १० टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी केलं. हॉस्टेल, मोफत शिक्षण अशा अनेक गोष्टी मराठा समाजासाठी केल्या आहेत.”
अग्रलेख : सरकारची शोभा
अग्रलेख : सरकारची शोभा
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: छगन भुजबळ आज मुंबईत घेणार ओबीसींची बैठक
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. अशात आता ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत ओबीसी नेत्यांची या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती; राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी, जरांगे मुंबईत का आले, हे एकनाथ शिंदेंना विचारा असं म्हटलं होतं. याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती, असे म्हटले आहे. आम्ही आधी दिलेले आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेल्या आरक्षण ते विरोधक सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत. असं तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी विचारायला हवं होतं.
मराठा समाजाची सरसकट कुणबी नोंद करून ओबीसी आरक्षण देण्यात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निकालांचा अडसर
मनोज जरांगेंचे आजपासून निर्जळी उपोषण; राज ठाकरे, नितेश राणे यांना सुनावले
सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निकाल बंधनकारक
मी संविधानाबाहेर जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : शशिकांत शिंदे
Maratha Reservation : फडणवीस, महायुती सरकार आरक्षण देण्याबाबत सकारात्मक : एकनाथ शिंदे
सरकार शांत, जरांगे ठाम; मंत्र्यांकडून अद्याप मनोज जरांगेंशी चर्चाच नाही
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: अंतरवाली सराटीत ओबीसी उपोषणास परवानगी नाकारली
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी या गावात ओबीसी आंदोलकांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांची परवानगी नाकारली आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत?” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल करावा असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेले आहे. याचबरोबर त्यांनी केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. मग इतक्या वर्षात त्यांनी हा विचार का केला नाही? हा माझा प्रश्न आहे. त्यांनी हा विचार करून हा निर्णय घ्यायला हवा होता. यापूर्वीदेखील काँग्रेसची सरकारे होती, हे आपल्याला माहिती आहे. इकडे वेगळी भूमिका तिकडे वेगळी भूमिका असेही कोणीही करू नये.”
मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन लाईव्ह अपडेट्स.
जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.