Maharashtra News Highlights 20 August 2025 : मुंबई-पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इतकेच नाही तर पाऊसामुळे सुमारे १४ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बुधवारी (२० ऑगस्ट) दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काल मुंबईत दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेकजण कार्यालयात पोहोचल्यानंतर सुट्टी जाहीर केल्यामुळे नंतर साचलेल्या पाण्यातून घर गाठावे लागले. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.

Live Updates

Mumbai Breaking News Live Update : राज्यभरातील पावसासंबंधी अपडेट्स वाचा एका क्लिकवर… 

 
19:03 (IST) 20 Aug 2025

२० लाख १२ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे २० लाख १२ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील १९ जिल्ह्यात २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाले आहे.

16:55 (IST) 20 Aug 2025

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? फडणवीस म्हणाले, “चार दिवसात अशा प्रकारे…”

“कालच हे जाहीर केलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल. १४ लाख एकरवरील पीके नष्ट झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला, काल-परवा आणि काही मागच्या आठवड्यात पाऊस पडला… चार दिवसात अशा प्रकारे मदत देता येत नाही. त्याची एक पद्धत असते. एनडीआरएफमध्ये अशी मदत देण्याकरिता पहिल्यांदा पंचनामे करावे लागतात, त्यानंतरच मदत देता येते. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल. सरकारने कोणीही मागणी न करता ही घोषणा केली आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

16:51 (IST) 20 Aug 2025

बंद पडलेल्या दोन मोनोरेल गाड्यांतून ११०० हून अधिक प्रवाशांची सुखरूप सुटका; एका गाडीचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाने प्रवाशांना बाहेर काढले

म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक अडकलेली गाडी दुसऱ्या मोनोरेल गाडीने खेचून नेण्यात महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादीतला (एमएमएमओसीएल) यश न आल्याने जवळपास दीड तास प्रवासी बंद गाडीत अडकले होते. …सविस्तर वाचा
16:34 (IST) 20 Aug 2025

१९५७, १९६० मध्ये कल्याण शहर महापुरामुळे झाले होते जलमय, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फिरत होत्या होड्या

इतिहासकालीन कल्याण शहराचा मूळ भौगोलिक भूभाग हा पारनाका, टिळक चौक, रामबाग परिसर हाच होता. विरळ वस्ती असे कल्याण शहराचे मूळ स्वरुप होते. …सविस्तर वाचा
16:16 (IST) 20 Aug 2025

उच्च न्यायालयाला आणखी १४ न्यायमूर्ती मिळणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची प्रस्तावाला मान्यता

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. …सविस्तर बातमी
16:02 (IST) 20 Aug 2025

“महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जे घडले, तो केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हता तर…”, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. …अधिक वाचा
16:00 (IST) 20 Aug 2025

नवसपूर्तीसाठी त्याने केला दुथडी वाहणाऱ्या कृष्णेतून तब्बल किलोमीटरचा प्रवास

सांगलीत कृष्णेची पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली. …सविस्तर वाचा
15:31 (IST) 20 Aug 2025

द म्युनिसिपल को-ऑप बँकेच्या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलावे, ‘बीएमसी सहकार पॅनल’ची मागणी

द म्युनिसिपल को-ऑपरेटिव बँक लि’चे पात्र मतदार हे महानगरपालिकेचे कामगार व कर्मचारी आहेत. …वाचा सविस्तर
14:50 (IST) 20 Aug 2025

जलमय रस्ता, मुसळधार पाऊस आणि शॉर्ट सर्किटमुळे तरुणाचा मृत्यू ; भांडूपमधील दुर्घटना

साचलेल्या पाण्यातून वाट काढत चालणाऱ्या दिपक पिल्लाई या तरुणाला विजेचा जबर धक्का बसला आणि तो खाली कोसळला. …वाचा सविस्तर
14:49 (IST) 20 Aug 2025

कल्याण : काळू नदीच्या पुरामुळे टिटवाळा जलमय

वाहन चालकांनी जलमय झालेल्या रस्त्यावरून वाहने चालवू नयेत यासाठी या भागात टिटवाळा, रायते भागात काही जागरूक नागरिक वाहन चालकांना सूचना करत आहेत. …वाचा सविस्तर
14:48 (IST) 20 Aug 2025

गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ

गोंदिया जिल्ह्याला आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात पाऊस येण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील 4 महत्त्वाच्या धरणांपैकी इटियाडोह हा धरण ओव्हर फ्लो झाला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील इतर धरण देखील तुडुंब भरलेली असून त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाच्या प्रश्न मिटलेला आहे. इटियाडोह धरण मध्ये 100% पाणीसाठा, शिरपूर धरण मध्ये 83% पाणीसाठा, कालीसराळ मध्ये 83% पाणीसाठा आणि पुजारीटोला धरणात 67 % पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे.

14:37 (IST) 20 Aug 2025

मुंबई : विहार तलाव भरल्यामुळे मिठी नदीची पातळी वाढली, सांडवा वळवण्याचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागणार

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मुंबईच्या लगत असलेला विहार तलाव सोमवारच्या पावसाने काठोकाठ भरून वाहू लागला. …सविस्तर वाचा
14:29 (IST) 20 Aug 2025

मुंबई: पर्युषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद राहणार, महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

पर्युंषण पर्वात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली गेली. न्यायालयाने मात्र ही मागणी मान्य केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. …वाचा सविस्तर
14:29 (IST) 20 Aug 2025

बदलापूर: उल्हास नदीची पाणीपातळी घटतेय, पण नदी इशारा पातळीवरच

कल्याण ग्रामीणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल, रस्ते खुले होण्याची प्रतिक्षा …सविस्तर बातमी
14:11 (IST) 20 Aug 2025

अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत –  मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. …वाचा सविस्तर
14:07 (IST) 20 Aug 2025

वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याला पुराचा फटका; पोलीस ठाण्यात शिरले पाणी

वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पोलीस ठाण्यात पुराचे पाणी शिरले आहे. …वाचा सविस्तर
13:34 (IST) 20 Aug 2025

Ulhas River News: उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डोंबिवली, कल्याणमधील रस्ते जलमय

उल्हास नदी पात्रातून उल्हास खोऱ्यातील पाण्याचा ओघ सुरू असताना बारवी धारणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. …वाचा सविस्तर
13:21 (IST) 20 Aug 2025

भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारदरा धरण परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. …सविस्तर बातमी
13:11 (IST) 20 Aug 2025

पूरग्रस्त भागात स्थलांतर सुरू. औदुंबरच्या दत्तमंदिरात पाणी, सांगली, मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली

बुधवारी ११ वाजता आयर्विन पूलाजवळ आणखी पातळी ३५ फूट ९ इंच झाली असून शहरातील सुर्यवंशी, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर परिसरात पूराचे पाणी शिरले असून येथील नागरिक स्थलांतर करत आहेत. …सविस्तर वाचा
12:36 (IST) 20 Aug 2025

राज्यात कुठल्या भागांना ‘रेड अलर्ट’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

सकाळी १० च्या पुढील माहितीनुसार, पाच जिल्हे, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड येथे हवामान विभागाकडून रेड अलर्ट दाखवण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाटमाथा या भागांना रेड अलर्ट सांगीतला आहे. काही भागातील धरणे १०० टक्के भरलेली असल्याने पाणी सोडावे लागले आहे. ते पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये मुळा आणि पवणा या नद्याच्या बाजूला पाणी यायला लागलं, त्यामुळे काही लोकांना तेथून स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अजित पवार म्हणाले.

12:35 (IST) 20 Aug 2025

ठाणे : आपत्तीग्रस्तांसाठी सरस्वती शाळेत तात्पुरता निवारा, व्यवस्थापनेचा अनोखा निर्णय

सरस्वती मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाच्या निर्णयाने पालकांना आणि नजिकच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. …वाचा सविस्तर
12:22 (IST) 20 Aug 2025

उल्हास नदी काठची कल्याण डोंबिवली पालिकेची पाणी पुरवठा केंद्र जलमय

उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून वाढ होत आहे. …वाचा सविस्तर
12:01 (IST) 20 Aug 2025

ठाणे जिल्ह्यात चोवीस तासांत झाला ‘इतका’ पाऊस !

ठाणे जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीने धोका पातळी ओलांडली आहे. …अधिक वाचा
11:55 (IST) 20 Aug 2025

VIDEO: ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू, तरीही ३० टक्के पाणी कपात; ‘या’ कारणामुळे ठाणेकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना

ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. …सविस्तर वाचा
11:54 (IST) 20 Aug 2025

माथेरानमध्ये चोवीस तासात ४३८ मिलीमीटर पावसाची नोंद

अतिवृष्टीमुळे माथेरानमधील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले, माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. …अधिक वाचा
11:20 (IST) 20 Aug 2025

ओला दुष्काळ जाहीर करा… जळगावात ठाकरे गट शेतकऱ्यांसाठी आक्रमक

जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पावसाचे आगमन झाले असले, तरी १२ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. …अधिक वाचा
10:52 (IST) 20 Aug 2025

अबब… पुणे जिल्ह्यात एकाच ठिकाणी एका दिवसात तब्बल ५७५ मिलिमीटर पाऊस…

आज सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत एकट्या ताम्हिणी येथे ५७५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. …सविस्तर बातमी
10:31 (IST) 20 Aug 2025

बदलापूरच्या ‘त्या’ उद्रेकाची वर्षपूर्ती, चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर पेटले होते शहर

बदलापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस पूर्वी एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. …सविस्तर बातमी
10:26 (IST) 20 Aug 2025

मुंबईसह महाराष्ट्रभरात गेल्या १२ तासात किती पाऊस झाला? हवामान विभागाने जारी केली आकडेवारी

राज्यात कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या १२ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी भारतीय हवमान विभागाने जारी केली आहे.

काल (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ ते आज (२० ऑगस्ट) सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

माथेरान (रायगड) – ३८९.५ मिमी

महाबळेश्वर (सातारा) – २७८ मिमी

विक्रोळी (मुंबई उपनगर) – २२९ मिमी

आयआयजीएतक्यू न्यू पनवेल (रायगड) – २१७ मिमी

कर्जत (रायगज) – २११.५ मिमी

मुंबई विमानतळ (मुंबई उपनगर) – २०८ मिमी

भायखळा मुंबई (मुंबई शहर) – १९३ मिमी

मुंबई- सांताक्रूझ (मुंबई शहर) – १७६ मिमी

जुहू विमानतळ (मुंबई उपनगर) – १४९.५ मिमी

वांद्रा (मुंबई उपनगर) – १३७ मिमी

चिपळून (रत्नागिरी) १२३.५ मिमी

भांयदर (ठाणे) – १०० मिमी

10:13 (IST) 20 Aug 2025

Mumbai Traffic Jam News: मुंबईत वाहतूक कोंडी, पावसामुळे ठिकठिकाणी वाहने बंद पडली

पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. …सविस्तर वाचा