Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. maharashtra
  3. maharashtra news live updates msbshse scc 10th results 2025 mumbai pune rain alert operation sindoor india pakistan tensions breaking news today 13 may aam
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2025 रोजी प्रकाशित

Maharashtra News Highlights: “अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते,” पंतप्रधानांच्या भाषणावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

Marathi Highlights: राज्यातील राजकीय घडामोडींसह विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: May 13, 2025 19:29 IST
Follow Us
Maharashtra Live News Updates
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स. (Photo: @VijayWadettiwar/X)

Mumbai Maharashtra News Highlights: दहशदवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत हे हल्ले परतावून लावले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर काल देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. या भाषणात नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना स्पष्ट भाषेत इशारा दिला आहे. पंतप्रधानांच्या या भाषणावर राज्यातूनही प्रतिक्रिया येत आहेत. यावर महायुतीतील नेते पंतप्रधानांच्या भाषणावर समाधन व्यक्त करत आहेत. तर, विरोधी पक्षातील काहींनी यावर टीका केली आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरही राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यासह राज्यातील विविध घडामोही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today 13 May 2025 : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स १३ मे २०२५.

19:29 (IST) 13 May 2025

आता भगवा फडकूनच थांबायाच : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना शहर आणि जिल्हा पदाधिकारी क्षमता बांधणी कार्यशाळेचे शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आयोजन करण्यात केले होते.एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत फोनद्वारे संवाद साधताना म्हणाले आता भगवा फडकूनच थांबायाच,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. …वाचा सविस्तर
18:44 (IST) 13 May 2025

विभागाची दहावी निकालात घसरण, राज्यात पाचवे स्थान

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात नाशिक विभाग राज्यात पाचव्या स्थानावर राहिले आहे. …वाचा सविस्तर
18:34 (IST) 13 May 2025

भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करा, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

“जागतिक बाजारपेठ आपल्या उत्पादनांसाठी उपलब्ध होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने भारतातच व्यवसाय कसा करता येईल याचा मध्यबिंदू शोधायला हवा,” असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. …वाचा सविस्तर
17:45 (IST) 13 May 2025

सिडकोत पाण्यासाठी आंदोलन

सिडकोतील नागरिकांना मिळणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी आणि सिडको मंडळ यांच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. …सविस्तर बातमी
17:03 (IST) 13 May 2025

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना : सामान्यांसाठी घरांच्या किमती कायम ठेवण्याचा म्हाडाकडून प्रस्ताव

सध्या या घरांपोटी विकासकांना रेडी रेकनरच्या १२५ टक्के दर आकारता येतो. यापैकी पाच टक्के रक्कम म्हाडाला सुपूर्द करणे बंधनकारक आहे. …सविस्तर बातमी
16:35 (IST) 13 May 2025

गोदावरीच्या पात्रातील नैसर्गिक जांभूळबेटाची पर्यटकांना नव्याने साद !

गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जांभूळबेट हे जिल्ह्यातील पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरणार असून चहूबाजूंनी अथांग जलाशय आणि गर्द झाडीत निरव शांतता जपणारे जांभुळबेट आता पर्यटकांना नव्याने साद घालणार आहे. …अधिक वाचा
16:17 (IST) 13 May 2025

India Pakistan Tension : एक वर्षाच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर, बीएसएफ जवान रेश्मा इंगळे म्हणाल्या, “देशासाठी…”

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात शस्त्रविराम झाला असला तरीही जवळपास सगळ्याच सैनिकांना सुट्टीवरुन परत बोलवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातल्या अमरावती येथील अचलपूरच्या जवान रेश्मा इंगळे यांनाही सुट्टी रद्द करुन अमृतसरला बोलवण्यात आलं आहे. त्या एक वर्षाच्या त्यांच्या मुलाला घरी ठेवून सीमेवर गेल्या आहेत. मुलाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मात्र त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या कुटुंबाने आणि अचलपूरच्या लोकांनी कौतुक केलं आहे. त्यांचे पती भारत इंगळे यांनी आपण आता नोकरी सोडणार असून मुलाचा सांभाळ करु असं सांगितलं आहे.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 13 May 2025

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार

पुण्याच्या एपीएमसी मार्केटमधील सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले की, “आम्ही तुर्कीकडून सफरचंद खरेदी करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे कारण ते पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्याऐवजी आम्ही हिमाचल आणि इतर भागातील सफरचंद खरेदी करत आहोत. भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत असताना तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवले.”

14:35 (IST) 13 May 2025

अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते: विजय वडेट्टीवार

भारत-पाकिस्तान संघर्षावर पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या भाषणाने लोकांचा आत्मविश्वास वाढला नाही. त्यांनी अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते, ते होताना दिसले नाही. मला ते आत्मविश्वासपूर्ण भाषण वाटले नाही.”

13:13 (IST) 13 May 2025

पोलीस बोटीची समुद्रात सतत गस्त ;भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी पोलीस सुरक्षा वाढवली

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. …अधिक वाचा
13:13 (IST) 13 May 2025

वसई: पर्यटकांची हुल्लडबाजी नागरिकांच्या जिवावर, नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसईच्या राजोडी गावातील वृध्दाचा पर्यटकाच्या दिलेल्या मोटारसायकलीने झालेल्या मृत्यूमुळे  हुल्लडबाज प्रवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. …अधिक वाचा
12:51 (IST) 13 May 2025

गिरीश महाजन यांच्याविरुद्धचे बदनामीकारक व्हिडिओ हटवण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने दोन युट्यूबर्सना महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध यूट्यूबवर अपलोड केलेले सहा व्हिडिओ “प्रथमदर्शनी बदनामीकारक” असल्याचे सांगत ते हटवण्याचे निर्देश दिले.

12:30 (IST) 13 May 2025

डोंबिवलीत कन्व्हेअन्स डीडच्या नावाखाली सोसायटी पदाधिकाऱ्यांची २४ लाखाची फसवणूक

डोंबिवली पूर्वेतील टंंडन रस्ता भागातील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तुमचा सरकारी जमिनीवरील सात बारा उतारा तुमच्या सोसायटीच्या नावे करून देतो. …सविस्तर बातमी
12:29 (IST) 13 May 2025

येऊरमध्ये ५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

येऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत. परंतु ते बंगले का तोडले नाहीत. येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात. …अधिक वाचा
12:28 (IST) 13 May 2025

“मला खात्री आहे की…”, संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीबाबत प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रतिक्रिया

भारत-पाकिस्तान मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “मला वाटत नाही की काँग्रेस प्रश्न उपस्थित करत आहे, परंतु ते यावर विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याचा सल्ला देत आहेत. मला खात्री आहे की, आणखी एक सर्वपक्षीय बैठक होईल ज्यामध्ये सर्व पक्षांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा का केली हे सांगितले जाईल.”

#WATCH | On Congress' demand for a special session of Parliament on the Pahalgam attack, Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says,"…I don't think Congress is raising a question, but a suggestion to have a special parliamentary session on this…I am sure there will be… pic.twitter.com/SZWrGepaEc

— ANI (@ANI) May 13, 2025
11:38 (IST) 13 May 2025

दरोडा टाकून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध परभणीत मकोका कायद्या अंतर्गत कारवाई

तालुक्यातील पारवा येथील शेत आखाड्यावर राहणाऱ्या कुटुंबावर दरोडा टाकून आखाड्यावरील महिलेवर अत्याचार करण्याची आणि दागिने लुटण्याची गंभीर घटना घडली होती. …अधिक वाचा
11:13 (IST) 13 May 2025
Sharad Pawar: भारत-पाकिस्तान मुद्द्यावर संसदेच्या विशेष अधिवेशनास शरद पवार यांचा विरोध

भारत-पाकिस्तान संघर्षावर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीबद्दल आपले मत व्यक्त करताना खासदार शरद पवार म्हणाले की, “हा एक संवेदनशील, गोपनीय मुद्दा आहे. पण जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा चर्चा होतात. काही गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत.”

VIDEO | Expressing his views of the demand for a Special Session of Parliament on India-Pakistan conflict, NCP (SP) chief Sharad Pawar (@PawarSpeaks) says, "We are against calling the special session of the Parliament, it is a sensitive, confidential issue, it is difficult. But… pic.twitter.com/8m7uYC7VYs

— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
10:46 (IST) 13 May 2025

सावंतवाडी बस स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले; प्रवाशांना धूळ खात एसटी प्रतीक्षेचे भोग

सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्य परिवहन (एसटी) बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. …अधिक वाचा
10:46 (IST) 13 May 2025

Raj Thackeray: “मुंबई महानगरपालिकेबाबत…” राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांचे महत्त्वाचे विधान

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री उद्य सामंत यांनी आज सकाळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, या भेटीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

10:24 (IST) 13 May 2025

Sharad Pawar: पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपल्या प्रकरणात हस्तक्षेप केला: शरद पवार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामावर घोषणा केल्याच्या मुद्द्यावर बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, “आतापर्यंत आपल्या देशाच्या अंतर्गत प्रकरणात तिसऱ्या देशाकडून कोणताही हस्तक्षेप झालेला नव्हता, पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपल्या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.”

VIDEO | On US President Donald Trump announcing ceasefire between India and Pakistan, NCP(SP) chief Sharad Pawar (@PawarSpeaks) says, "So far there has been no intervention from a third party in our country, first time a US President interfered in our matter."… pic.twitter.com/GlPDNALeNQ

— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
10:18 (IST) 13 May 2025

Maharashtra Live Updates: पंतप्रधानांच्या भाषणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी असे म्हटले आहे की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जर चर्चा होणार असेल तर ती फक्त पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरवरच होईल.”

#WATCH | Nagpur: On PM Modi's address to the nation on #OperationSindoor, Maharashtra CM Devendra Fadnavis says "PM Modi has also said that terror and talks cannot happen together. PM Modi said if there will be talks, it will be only on PoK, (Pakistan Occupied Kashmir). PM Modi… pic.twitter.com/sM1Np37ApS

— ANI (@ANI) May 12, 2025
09:58 (IST) 13 May 2025

“अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती,” भारत-पाकिस्तान प्रश्नी ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर रोहित पवारांची टीका

भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम आणि काश्मीर प्रश्नी अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

याबाबत एक्सवरील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, “शस्त्रविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि शस्त्रविराम केला, हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे.”

काल संध्याकाळी पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केले होते. या परिस्थितीत पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती. संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, परंतु अमेरिकेसारखा देश असली विधाने करत असताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र ट्रम्प यांच्या विधानाहून अधिक दुःखद आहे.”

“युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि युद्ध थांबवल्याचे,” डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. यामुळे… pic.twitter.com/CmaYtkGfGt

— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2025
1 of 1

Mumbai-Pune News Live Today 13 May 2025 : महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी संदर्भातील घडामोडींचा आढावा…

 

First published on: 13-05-2025 at 09:56 IST
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarआदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisराज ठाकरेRaj Thackerayशरद पवारSharad Pawarसंजय राऊतSanjay Rautसुप्रिया सुळेSupriya Sule
Web Title: Maharashtra news live updates msbshse scc 10th results 2025 mumbai pune rain alert operation sindoor india pakistan tensions breaking news today 13 may aam
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.