Shivsena MLA Disqualification Verdict Live: गेल्या ८ ते १० महिन्यांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाची अवघ्या राज्याला प्रतीक्षा होती. या निकालावरून शिंदे गट व ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या ८ महिन्यांत राजकीय सुंदोपसुंदी पराकोटीला पोहोचली. अखेर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या या सुनावणीचा निकाल राहुल नार्वेकरांनी सविस्तरपणे मांडला असून प्रामुख्याने ६ निर्णयांचा त्यांनी आपल्या निकालात अंतर्भाव केला आहे.
राहुल नार्वेकरांचा अंतिम निकाल…
१. शिंदे गट खरी शिवसेना आहे.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
४. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
५. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.
६. शिंदे गटानं दाखल केलेली ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणीही फेटाळली जात आहे.
Shivsena 16 MLA Disqualification Verdict Live Today, 10 January 2024: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला!
२०१८ साली शिवसेना पक्षाची निवडणूक आयोगासमोर सादर झालेलीच घटना स्वीकार करता येईल. त्यानंतर पक्षीय घटनेत करण्यात आलेले बदल निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यानंतर झालेले बदल मी निर्णय घेताना ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर फुटीच्या आधी सादर झालेली घटना ग्राह्य धरण्याचा विचार करण्यात आला – राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या निकालपत्रातील मुद्द्यांचा संदर्भ दिला. तसेच, निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या राज्यघटनेबाबतही टिप्पणी केली.
शिवसेनेच्या राज्यघटनेचा, पक्षीय संघटने, विधिमंडळ पक्षाचा विचार करून कोण मूळ राजकीय पक्ष आहे, याचा विचार करण्यात आला. समोरआलेल्या पुराव्यांनुसार निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या राज्यघटनेबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती नाही. त्यामुळे संदर्भासाठी योग्य ती पक्षाची घटना घेणं हा माझ्यासमोर पर्याय होता – राहुल नार्वेकर
मूळ शिवसेना पक्ष कोणता?
विधिमंडळ पक्षनेता कोण?
कोणत्या गटाचा व्हिप वैध?
कोणत्या गटाचे आमदार पात्र ठरतात?
देशभरात सर्वसामान्यांपुढे वाढले जाणारे ताटभर जेवण प्रत्यक्षात स्वस्त झाले आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अॅनालिटिक्सच्या अंदाजानुसार, शाकाहारी थाळीची किंमत महिना-दर-महिना आधारावर 3 टक्क्यांनी कमी झाली आहे.
मुंबई: पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना द्याव्या लागणाऱ्या बंधपत्रित सेवेच्या जागाचे वाटप केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतला आहे.
कोल्हापूर : आपल्या पक्षाबद्दल काय निष्ठा असते हे कोल्हापूरमधील राहुल माळी या शिवसैनिकाने दाखवून दिले. त्यांनी आपल्या रक्ताने युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र रेखाटले. शिवसेना पक्ष किती मजबूत आहे याची झलक यातून मिळाली. ते शिवसेना कोल्हापूर उपशहर प्रमुख आहेत. आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर सभेच्या वेळी ते स्वतः मांडी घालून रस्त्यावर बसून होते. असे कार्यकर्ते फक्त ठाकरे पक्षातच घडतात, अशा भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
नागपूर : बॅंक घोटाळ्यात शिक्षा झाल्यामुळे आमदारकी रद्द झालेले कॉंग्रेसचे नेते सुनील केदार यांची बुधवारी जामिनावर सुटका झाली. त्यांच्या समर्थकांनी भाजपा नेते आशीष देशमुख यांच्या घरासमोर फटाके फोडून केदार यांच्या सुटकेचा जल्लोष साजरा केला.
१६ आमदार अपात्र प्रकरणी येत्या काही वेळात निकाल येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करणार आहेत. दोन्ही पक्षकांनी आपल्या बाजूने निकाल लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दोन्ही बाजूच्या वकिलांसमवेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित असून निकाल देण्याच्या प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सुमारे तासभर निकालाचं वाचन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Rahul Narvekar Verdict on Shivsena 16 MLA Disqualification: “जर अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला चुकीचा वाटला तर अशा प्रकरणांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं!”
अमरावती : नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान आणि त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. नैसर्गिक कारणांमुळे घटलेली उत्पादकता, बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढीच्या परिणामी घसरलेले दर यामुळे हतबल झालेल्या जरूड येथील शेतकऱ्याने घराबाहेर पडत मजुरीचा निर्णय घेतला. परंतु तेथेही निराशाच हाती आल्याने हतबलतेतून चंद्रपूर जिल्ह्यातील एका विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविले.
मुंबई: गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारापासून वंचित असलेल्या सुमारे ५८ लाख बालकांना तसेच जवळपास १० लाख गर्भवती महिला व स्तनदा मातांना बसत आहे.
दहाव्या परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे दोनच शक्यता आहेत. एकतर दुसऱ्या पक्षात विलीन व्हा किंवा आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवा. त्यात एक नवीन पळवाट त्यांनी शोधली आहे ती म्हणजे आम्हीच पक्ष आहे असा दावा करणं. तेच एकनाथ शिंदेंनी केलं आणि तेच अजित पवारांनी केलं. हे कायद्याला धरूनच झालं आहे. पण हे रोखायचं असेल, तर आपल्याला घटनादुरुस्ती आणावी लागेल. आत्ता हे काही पक्षांच्या बाबतीत घडलंय, उद्या हेच दुसऱ्या पक्षांबाबतही होऊ शकेल – सिद्धार्थ शिंदे, सर्वोच्च न्यायालयातील वकील
आज तीन ते चार शक्यता आहेत. एक तर एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार अपात्र ठरतील किंवा उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील आमदार अपात्र ठरतील. किंवा एकही आमदार अपात्र ठरणार नाही. कारण निवडणूक आयोगानं जसं म्हटलंय की २०१८ ची शिवसेनेची घटनादुरुस्ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे राहुल नार्वेकरही तोच धागा उचलून म्हणू शकतात की मलाही नेमकं माहिती नाही की पक्ष म्हणून दोन्ही गटांचं व्यवस्थापन नेमकं कसं आहे. त्यामुळे सगळ्यांची आमदारकी कायम राहील. सर्व ५५ आमदार पात्र राहतील. त्याशिवाय आणखी एक शक्यता म्हणजे त्यातले काही आमदार अपात्र ठरतील. एकनाथ शिंदे अपात्र नाही झाले तर त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकेल, सरकार टिकेल. पण राहुल नार्वेकरांसमोर झालेल्या सुनावणीतील उत्तरांमध्ये काही तफावत जाणवली, तर त्या आधारावर ते काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात. – सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार प्रकरणातील दोन्ही पक्षाच्या वकिलांना संध्याकाळी साडेचार वाजता उपस्थित राहण्याची विनंती करणारं पत्र इमेलद्वारे पाठवलं आहे.
मुंबई : वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर आणि अभ्युदयनगर या वसाहतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी म्हाडाने राज्य शासनाकडे मागितली आहे. या पुनर्विकासातून म्हाडाला सामान्यांसाठी सोडतीत विक्रीसाठी ३०० चौरस फुटाची पाच हजार घरे तसेच नऊ हजार कोटींचा महसूल मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारनात “आमदार अपात्रतेच प्रकरण” हा गेल्या सहा दशकांत कधीही निर्माण न झालेला घटनात्मक पेच आहे.हा प्रश्न संवैधानिक तरतुदींशी निगडीत आहे.विधानसभा अध्यक्षांनी त्याकडे त्याच नजरेतून पाहिलं असेल ही आशा. आजचा निर्णय केवळ दोन गटांचा नसून,कोणते विषय पक्षांतर्गत आहेत?कोणते सभागृहाच्या,कायद्याच्या,तर कोणते निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत येतात..? या बाबी स्पष्ट करणारा देखील असणार आहे,ज्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अग्रणी ठरलेल्या महाराष्ट्राला मिळालेली ही आणखीन एक ऐतिहासिक संधी आहे. सध्याच्या एकाधिकरशाही होऊ घातलेल्या व्यवस्थेत विधानसभा अध्यक्षांना संवैधानिक मार्गाचा अवलंब करून निकाल देण्याची ही वेळ आहे.बहुमत हेच योग्य मत असतं हा गैरसमज खोडून काढण्याची आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायाच्या बाजूने उभं राहण्याची ही वेळ आहे…! – जितेंद्र आव्हाड</p>
महाराष्ट्राच्या राजकारनात "आमदार अपात्रतेच प्रकरण" हा गेल्या सहा दशकांत कधीही निर्माण न झालेला घटनात्मक पेच आहे.हा प्रश्न संवैधानिक तरतुदींशी निगडीत आहे.विधानसभा अध्यक्षांनी त्याकडे त्याच नजरेतून पाहिलं असेल ही आशा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2024
आजचा निर्णय केवळ दोन गटांचा नसून,कोणते विषय पक्षांतर्गत…
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या ग्रॅन्टरोड स्थानकाजवळील स्लेटर रोडवरील रेल्वेच्या इमारतीला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत काही मिनिटांतच ही आग विझवली.
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार यांना मुख्य आरोपी ठरविण्यात आले होते. त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आज (दि. १० जानेवारी) त्यांची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत त्यांचे स्वागत केले.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोटी विधाने केल्याच्या आरोपाप्रकरणी आपण अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जिल्ह्यात धामधूम सुरू असताना हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात टँकर चालकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू केले आहे.
नागपूर : नागपूर एम्समध्ये कार्यरत एका डॉक्टरने अयोध्येतील राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळ्यात वाटप केले. याबाबतची पोस्ट सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अमृत महोत्सवादरम्यान विद्यार्थिनींच्या झालेल्या रॅगिंग प्रकरणाची वैद्यकीय सचिव दिनेश वाघमारे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मेडिकल प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची माहिती देण्याची सूचना केली आहे.
गडचिरोली : विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच नातेसंबंधातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावाजवळील वळणावर मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०) सर्व राहणार गोविंदगाव अशी मृत तरुणांची नावे आहेत.
४ वाजता राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन करणार असून त्याआधी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना मुंबईत जमा होण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणेत दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांनाही तसेच आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
यवतमाळ : राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.
यवतमाळ : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात सरकारने अद्यापही ट्रकचालकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे यवतमाळ ट्रकचालक असोसिएशनने आज, बुधवारी सकाळी ११ वाजता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. शहराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे.
नागपूर: ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याची तूर्तास अंमलबजावणी होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतरही या कायद्याच्या विरोधात ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ट्रकचालकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, विदर्भातील १५ हजारांवर ट्रकची चाके थांबली. या आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
निकाल हाती येण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं असून “आमचा व्हिप आजही त्यांना (ठाकरे गट) लागू आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे जर शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले, तर त्यांच्या व्हिपचं उल्लंघन केलं म्हणून ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? असा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. (Loksatta Graphics)
Shivsena 16 MLA Disqualification Verdict Live Today, 10 January 2024: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष!