Mumbai Breaking News Updates, 06 august 2025 : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत सफाळा पश्चिमेला जलसार, टेंभीखोडावे व विराथन गावा दरम्यान असलेल्या डोंगरामध्ये बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या विस्फोटांमुळे जलसाल, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील २०० पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फारशीला तडे गेले आहेत. तर पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर आणि परिसरातील अशा महत्त्वाच्या आणि विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
कल्याण: चिकणघर येथील शांतीदूत सोसायटीचे प्रकरण निवळले; बेमुदत उपोषण स्थगित, विकासकाचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार
खोदलेले रस्ते, अपुरा पाणी पुरवठा या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना पनवेलमध्ये आक्रमक
‘आम्ही बदनाम होणार असेल तर…’ इशारा आणि जिल्हा प्रशासनात स्मशानशांतता
ठाणे : मेट्रो अपघाताप्रकरणी अखेर ठेकेदार, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर जखमी प्रवाशावर शस्त्रक्रिया
महापालिका अधिकाऱ्यांना मनसेने दिली कोंबड्यांची भेट
बदलापूर व्हाया पनवेल, नवी मुंबई ३४ किमी रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे सर्वेक्षण, कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी
कल्याणमध्ये प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालणाऱ्या रिक्षा मालकाला ‘आरटीओ’चा साडे सहा हजार दंड
वाढवण, तवा ते भरवीर द्रुतगती महामार्गासाठी १००० हेक्टर जागा आवश्यक; लवकरच ड्रोन सर्वेक्षण सुरू
मुंबई : पुनर्विकसित इमारतीतील १८ घरे लाटली! म्हाडाकडून गुन्हा दाखल
कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण ४७ लाचखोर, त्यातले तीन जण निलंबित
धक्कादायक! चक्क बनावट शिधापत्रिकांचे वाटप, दलालांच्या सुळसुळाटामुळे…
मुंबईत अडीच वर्षात ४२ हजार श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया
शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण उपक्रम हाती घेतला आहे.
उल्हासनगरकरांचे पाणी स्वस्त होणार, पालिकेचा दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मागे
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणा अनेकदा कुचकामी ठरते. एप्रिल, मे महिन्यात पाणी वितरणातील दोषामुळे शहरातील अनेक भागात टंचाई सदृश्य परिस्थिती होती.
‘एम – सँड’साठी जिल्हा प्रशासन आग्रही! पहिल्या ५० उद्योजकांना दिल्या जाणार सवलती
ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडी आणि नदी पात्रातून अनेकदा अधिकृत पद्धतीने वाळूचा उपसा करून त्याचा शासकीय लिलाव करण्यात येतो.
Ghodbunder Road: घोडबंदर मार्गावरून प्रवास करत आहात, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
गुजरात व वसई परिसरातून उरणमधील जेएनपीए बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतूक प्रामुख्याने याच मार्गावरून वाहतुक करतात.
“गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेचे शंभर रुपयांचे बजेट असते पण, प्रत्यक्ष खर्च…”, ठाण्यातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या आरोपाने खळबळ
ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो.
Jitendra Awhad : जेव्हा जितेंद्र आव्हाड शिट्ट्या वाजवून कार्यकर्त्यांसोबत नाचतात, म्हणाले, “सेलिब्रेशन तो बनता है…”
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे माध्यमांमध्ये त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात.
ठाण्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर होतंय यासाठी प्रसिद्ध… भक्तांच्या तर रांगा आणि अनेकांसाठी आकर्षणाचं ठिकाण का ठरतंय?
देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदीर ओळखले जाते.
पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना जामीन नाहीच
याचिकाकर्त्याने पोलीस ठाण्यात केलेले कृत्य धक्कादायक असून हे कायद्याच्या, राज्याच्या उद्दिष्टावर घाला घालण्यासारखे असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
Ganesh Utsav 2025 : ठाण्यात गणेशोत्सव मंडपासाठी ८८ मंडळानी केले अर्ज पण, परवानगी एकाच मंडळाला
ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो.
पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
पुणे : पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला.
शनिवार, रविवारची सुट्टी आणि सणानिमित्त या मार्गांवरील गर्दीमुळे… काय आहे नियोजन ?
पुणे : शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे गावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी कायम असते. त्यातच रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर (९ ऑगस्ट) आला असताना मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या ठिकाणी जादा बस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने केले आहे.
बनावट सीसी, ओसीचा गंडा; नवी मुंबईतही घर खरेदीदारांची बोगस प्रमाणपत्रे देऊन फसवणूक
नवी मुंबई</strong> : ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात बनावट रेरा प्रमाणपत्र सादर करत शेकडो खरेदीदारांच्या फसवणुकीची प्रकरणे ताजी असताना आता नवी मुंबईतही बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वीज वितरणाच्या परवानासाठी खासगी कंपन्यांनी शहरे वाटली; नागपुरात टोरेंट कंपनीला विरोध
नागपूर : राज्यात टोरंट पाॅवरसह इतरही कंपन्यांकडून विविध शहरात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केले. एका शहरात एकाच कंपनीचा अर्ज बघता खासगी कंपन्यांनी परवाना मिळवण्यासाठी शहरे वाटून घेतली, असा गंभीर आरोप राज्य वीज नियामक आयोगाच्या मंगळवारच्या ऑनलाईन सुनावणीत विविध संघटनांनी केला.
Jitendra Awhad : जेव्हा जितेंद्र आव्हाड शिट्ट्या वाजवून कार्यकर्त्यांसोबत नाचतात, म्हणाले, “सेलिब्रेशन तो बनता है…”
जितेंद्र कार्यकर्त्यांसोबत आव्हाड यांनी गाण्यांवर शिट्ट्या वाजवत, गाण्यांवर ठेक धरत वाढदिवस साजरा केला. आव्हाड यांनी यानंतर भावनिक पोस्ट करत सेलिब्रेशन तो बनता है… म्हणत कार्यकर्त्यांचे आभार देखील व्यक्त केले.
मुंबई : वाढवण बंदर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी भूसंपादनाला २ हजार ५२८ कोटींच्या प्रस्तावासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुंबई : कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या अडीचशे जणांवर कारवाई, महिनाभरात १ लाख २४ हजारांचा दंड वसूल
मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी एका महिन्यात तब्बल २४९ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण १ लाख २४ हजार ४०० रुपयांचा महसूल जमा झाला. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे.
पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना जामीन नाहीच
पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Dadar Kabutarkhana: दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा, जैन समाज आक्रमक; ताडपत्री काढली, आत घुसले आंदोलक!
मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही आंदोलकांनी आतमध्ये शिरून राडा घालायला सुरुवात केली.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ६ ऑगस्ट २०२५