Nagpur News Updates, 11 August 2025 : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करणाऱ्यांवर वन विभागाने गुरुवारी संयुक्त धाड टाकली. तसेच,राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, पुणे परिसरातील झपाट्याने झालेले नागरीकरण लक्षात घेता तीन नवीन महानगरपालिका वा हद्दवाढ ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
Video: ठाण्यातील रस्त्यावर डुप्लीकेट संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
ठाकरे गटाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सोमवारी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. …सविस्तर वाचा
काँग्रेस नेत्याविरोधात काँग्रेसच रस्त्यावर, माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा देण्याची मागणी
बुटीबोरी औद्योगिक नगरी असल्याने सर्व राजकीय पक्षासाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. येथे मुजीब पठाण प्रभाव राखून असल्याचे त्यांनी काढलेल्या मोर्चातून दिसून आले. या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता सहभागी झाली होती. …वाचा सविस्तर
Hasan Mushrif : शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून कपोलकल्पित गोष्टी सांगून मनोरंजनच – हसन मुश्रीफ
कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानाची खिल्ली उडवली. …सविस्तर वाचा
शिळफाटा कोंडीतील प्रवाशांनो त्रास होऊन द्या, पण तुम्ही धर्म भावनेच्या आधारेच मतदान करा; मनसे नेते राजू पाटील यांची उपरोधिक टीका
तीव्र नाराजी व्यक्त करत मनसेचे नेते राजू पाटील यांनी ‘प्रवाशांनो, शीळफाटा कोंडीचा त्रास होत असला तरी तुम्ही धर्म भावनेच्या आधारे मतदान करत चला, असा उपरोधिक, बोचरा सल्ला प्रवाशांना दिला आहे.
…अधिक वाचा
विद्यार्थ्यांनो आधी इकडे लक्ष द्या, तुमच्या अभ्यासक्रमात यंदापासून झाला आहे असा बदल; परीक्षेला सामोरे जाण्याआधी…
यात प्रामुख्याने, शिक्षण संरचनेत बदल, व्यावसायिक शिक्षणाला महत्व आणि अभ्यासक्रमात आधुनिक विषयांचा समावेश यांचा समावेश असेल. …वाचा सविस्तर
“कल्याण डोंबिवलीतील मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा…”, रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा
रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी यासंदर्भात एक निवेदन आयुक्तांना सोमवारी दिले. …सविस्तर बातमी
पुढच्या पिढीतील वैज्ञानिक घडवण्यासाठी आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम! आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना…
आयसीएमआरच्या अधिकृत माहितीनुसार, हा उपक्रम देशभरातील ९ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थी तसेच पदवीपूर्व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उद्दिष्ट मानून राबवला जाणार आहे. …सविस्तर बातमी
दहीहंडी सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; ६ व्या थरावरून कोसळून अपघात
दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (११) या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. …अधिक वाचा
सात वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जेएनपीए विद्यालयातील शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू
रुस्तमजी केरावाला फाउंडेशन (आर के एफ) या संस्थेच्या कारभाराला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर ११ ऑगस्टपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. …अधिक वाचा
मुंबई गोवा महामार्ग अगोदर सुरक्षित बनवा, नंतरच पथकर वसुलीचे स्वप्न पहा, कोकणवासियांची मागणी
मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न न केल्यास या महामार्गावरील प्रवास धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अगोदर महामार्ग सूरक्षित बनवा नंतरच टोलधाडीची तयारी करा अशी मागणी कोकणवासियांकडून होत आहे.
…वाचा सविस्तर
कल्याणमध्ये सिद्धेश्वर आळीत पादचारी वृद्धाला भुरळ घालून लुटले
मागील काही महिन्यांपासून रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचारी ज्येष्ठ, वृध्द महिला, पुरूषांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. …अधिक वाचा
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पंडित दिनदयाळ चौक सात दिवस वाहतुकीसाठी बंद
गेल्या एप्रिलमध्ये असेच तोडकाम या भागात करण्यात आले होते. त्यावेळीही या रस्त्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी वाहतूक विभागाच्या नियोजनाप्रमाणे बंद ठेवण्यात आली होती. …अधिक वाचा
Video : नेरुळ सुश्रुषा हॉस्पिटलला भीषण आग; २१ रुग्णांना सुखरूप बाहेर काढले
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व २१ रुग्णांना शेजारील स्वामीनारायण मंदिरात सुरक्षित हलवले. त्यावेळी रुग्णालयात ४२ कर्मचारीही उपस्थित होते. …सविस्तर बातमी
प्रतीक्षा संपणार…१५ आॅगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार; ३००० रुपयांत २०० फेर्यात राष्ट्रीय महामार्गावर विना पथकर करता येणार प्रवास
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिर केल्याप्रमाणे आता १५ आॅगस्टपासून राज्यभरासह देशभरातील एनएचएआयच्या अखत्यारीतील महामार्गावरील पथकर नाक्यांवरुन प्रवास करणार्यांसाठी वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.
…अधिक वाचा
घरची परिस्थिती बेताची…. शिक्षण आहे…. मात्र नोकरीं मिळत नाही… नैराश्यातून तरुणीची आत्महत्या….
पालकांनी पोटाला पीळ देत शिक्षण पूर्ण केले. नोकरीं मिळवून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपड नोकरीं न मिळाल्याने व्यर्थ ठरली. या मुळे आलेल्या नैराश्यातून एका २६ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
…वाचा सविस्तर
“काँग्रेसयुक्त भाजप कधी झाली, हे त्यांनाच कळले नाही”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हर्षवर्धन सपकाळांचा टोला
या सर्व घटना पाहिल्यावर लोक म्हणतात,तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहे की नाही.पण करणार तर काय साडे चार वर्ष तर सरकार काही जाऊ शकत नाही. …सविस्तर वाचा
अपहरण करून एक लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांकडून सुटका, दोन आरोपींना अटक
कांदिवलीतील २७ वर्षीय तरूणाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणीतल्याच्या आरोपाखाली समता नगर पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली. …सविस्तर वाचा
सीबीआयच्या छाप्याने इगतपुरीतील रिसॉर्ट्स पुन्हा चर्चेत…. रेव्ह, हुक्का पार्टीसह बरेच काही
सीबीआयने इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमधील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी, आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.
…सविस्तर बातमी
सलग सुट्ट्यांमध्ये गोव्यात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडी धावणार; १२ ऑगस्ट रोजी आरक्षण सुरू होणार
स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्याने, प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे.
…सविस्तर बातमी
पिंपरी- चिंचवड: दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; १५ दुचाकी जप्त
सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात दुचाकी चोरण्याच प्रमाण वाढलं होत. पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजवरून सराईत अशोक सोनवणेचा शोध घेण्यात आला. …अधिक वाचा
पुणे विमानतळावर सीआयएसएफचे जवान, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आले आणि…
अखेर बाॅम्ब नाशक पथकातील जवान सुरक्षात्मक कवच घालून सुसज्जतेने बाॅम्ब ठेवलेल्या दिशेने जातात. त्यांनी दहा मिनिटांनंतर बाॅम्ब निकामी झाल्याचे हात वर करून सांगताच सर्वाजण आनंद साजरा करतात. …वाचा सविस्तर
चेंबूरमधील बाटा शोरुमला भीषण आग; चपला बटांसह अन्य वस्तू जळून खाक
चेंबूर येथील मल्हार हॉटेलनजीकच्या शीव आशिष इमारतीतील २ हजार चौरस फूट जागेतील बाटाच्या दुकानाला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली.
…सविस्तर वाचा
सव्वा पाच कोटींच्या गांजासह मुंबई विमानतळावरून दोघांना अटक
सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर शनिवारी व रविवारी केलेल्या दोन कारवायांमध्ये पाच किलो २०० ग्रॅ्म हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला आहे.
…वाचा सविस्तर
पावसाळ्यात फुलणारं ‘सीतेचे पोहे’; तण नव्हे, तर परिसंस्थेचा पाया
पावसाळ्यात माळरानं, शेतकाठ, डोंगरउतार आणि पडीक जमिनीत सहज उगवणारं ‘सीतेचे पोहे’ (एराग्रोस्टिस युनिओलॉइड्स) हे देशी गवत फक्त दिसायला नाजूक नसून, निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
…अधिक वाचा
स्वारगेट परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवाशांकडील ऐवज लंपास
स्वारगेट परिसरात पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. …सविस्तर बातमी
राज्य सरकारला हवे आहेत हस्ताक्षर तज्ञ! साडे सहा हजार प्रकरणांची भिस्त
फसवणूक तसेच इतर तत्सम फौजदारी प्रकरणात हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल न्यायालयात दोषसिद्धीसाठी निर्णायक असतो. परंतु हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालासाठी दहा वर्षांची प्रतीक्षा यादी असल्यामुळे अनेक खटल्यांची सुनावणी रखडली आहे.
…अधिक वाचा
नव्याने ३१२ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिकांचे जाळे अन् मेट्रो लाईट मार्गिका! सर्वंकष गतिशीलता योजनेतील शिफारशी
पुणे महानगर प्रदेशासाठी (पीएमआर) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने ‘सर्वंकष गतिशीलता योजना’ (काॅम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार केली आहे. त्यामध्ये या शिफारशी करण्यात आल्या आहेत. …अधिक वाचा
मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमधून २२६ संरक्षित प्राणी जप्त, वनविभागाची कारवाई
दरवर्षी थायलंडमधील बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यंटक जात-येत असतात. त्याचाच फायदा घेऊन त्या मार्गावरून तस्करीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. …सविस्तर वाचा
कुलाब्यातील दोन शाळा बंद केल्यामुळे महापालिकेच्या विरोधात तक्रार; मकरंद नार्वेकर यांची बाल हक्क आयोगाकडे तक्रार
कुलाबा येथील ए एम सावंत मार्ग येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या संकुलातील दोन्ही इमारती धोकादायक घोषित करून रिकाम्या करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी मकरंद नार्वेकर यांनी एमएससीपीसीआरडे तक्रार करून महापालिकेला नोटीस बजावण्याची मागणी केली आहे.
…सविस्तर बातमी
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ ऑगस्ट २०२५