Mumbai Rain News Updates 26 May 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाने त्यात लक्ष घातल्याचे दिसले नाही.’, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबई व मुंबई उपनगर तसेच पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates
14:55 (IST) 26 May 2025

मध्य रेल्वे कोलमडली…, मुंबई महापालिकेवर फोडले खापर…

मध्य रेल्वेने रुळावर पाणी तुंबल्याचे खापर मुंबई महापालिका प्रशासनावर फोडले आहे. त्यामुळे पहिल्या पावसातच प्राधिकरणांमधील वाद रंगू लागला आहे. …अधिक वाचा
14:46 (IST) 26 May 2025

Thane Rain Latest Updates: रिमझिम पावसातही ठाणेकरांची रिक्षा कोंडी

शहरात सोमावरी सकाळपासून पावसामुळे आभाळ भरुन आले असून पावसाची रिपरीप सुरु आहे. …सविस्तर बातमी
14:39 (IST) 26 May 2025

Mumbai Rain Update: केईएम आणि जे. जे. रुग्णालयात पाणीच पाणी

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे परळ येथील केईएम व डोंगरीमधील जे. जे. रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. …वाचा सविस्तर
14:33 (IST) 26 May 2025

मध्य रेल्वेचे पालिकेकडे बोट

रेल्वे रुळांवर पाणी तुंबले आहे. त्यामुळे एकूणच पावसाळापूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेल्वेने या परिस्थितीबाबत मुंबई महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवले आहे. …सविस्तर बातमी
14:29 (IST) 26 May 2025

Mumbai Rain Latest Updates : मुंबईत नरीमन पॉईंट परिसरात सर्वाधिक पाऊस

मुंबईत रविवारी २५ मे रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर भागाला झोडपून काढले. …सविस्तर वाचा
14:20 (IST) 26 May 2025

Thane Railway Station Crowd: घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल; ठाणे, दिवा, कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी

मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने काही रेल्वेगाड्यांची वाहतुक स्थगित केल्या होत्या. …सविस्तर वाचा
14:19 (IST) 26 May 2025

Pune rain updates: मोसमी वाऱ्यांची वेगाने प्रगती… पुण्यात पोहोचला?

यंदा लवकर केरळात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी वेगाने प्रवास केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आता पुणे, मुंबईसह राज्याचा काही भाग व्यापला आहे. …सविस्तर बातमी
14:11 (IST) 26 May 2025

कल्याण डोंबिवलीत वातावरण मुसळधार पावसाचे, पडतो मात्र रिमझिम

कल्याण डोंबिवली परिसरात दोन दिवसांपासून गच्च पावसाच्या ढगांनी आभाळ भरून आहे. सूर्याचे दोन दिवस दर्शन नाही. वातावरण मुसळधार पावसाचे असले तरी पावसाची मात्र रिमझिम सुरू आहे. …सविस्तर वाचा
14:07 (IST) 26 May 2025

मध्य रेल्वेची सेवा ठप्प

मस्जिद आणि भायखळा दरम्यान पाणी साचल्याने, लोकल भायखळापर्यंत चालवून पुन्हा डाऊन मार्गावर धावत आहेत. …अधिक वाचा
13:41 (IST) 26 May 2025

Maharashtra Monsoon Rain Updates : पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता – हवामान विभाग

पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी व्यक्त केली आहे. …वाचा सविस्तर
13:33 (IST) 26 May 2025

आज लेटमार्क लागणार? छत्री घरी विसरले…, मुंबईकर नोकरदारवर्गाचा रेल्वे स्थानकांच्या छपराखाली आडोसा

अनेकजण जवळपास तासभर गाड्यांमध्ये अडकले आहेत. …वाचा सविस्तर
13:19 (IST) 26 May 2025

महिला सरपंचांनी अर्ध्यावरच गुंडाळली ग्रामसभा; ग्रामस्थांमध्ये रोष…

लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायत येथे शुक्रवार रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ सभेसाठी हजर होऊ लागले. …सविस्तर बातमी
13:14 (IST) 26 May 2025

मुसळधार की अतिवृष्टी? चक्रीवादळाची अचूक माहिती समजणार; IMD आता भारतीय बनावटीची ‘ही’ नवी यंत्रणा वापरणार!

“बीएफएस हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे हवामान मॉडेल आहे. ते एक निश्चित मॉडेल आहे, म्हणजेच ते एकल-मॉडेल आधारित आउटपुट असेल”, असे आयआयटीएमचे माजी वरिष्ठ हवामान मॉडेलर पार्थसारथी मुखोपाध्याय म्हणाले. …सविस्तर वाचा
13:10 (IST) 26 May 2025

मुंबईत मोसमी पावसाची दमदार सलामी, ६९ वर्षांत पहिल्यांदाच इतक्या लवकर

पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दैना केली आहे. …अधिक वाचा
13:05 (IST) 26 May 2025

पालघर : नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीची कारवाई, मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू, दुकानदारांकडून अल्प प्रतिसाद

नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. …सविस्तर वाचा
13:03 (IST) 26 May 2025

दहशतवादी हल्ला झाला तर तोंड कसे द्यायचे ? चंद्रपुरात पोलिसांची रंगीत तालीम

दहशतवादी हल्ला झाल्यास ओलीस ठेवलेल्या नागरीकांची सुटका कशी करावी याबाबत चंद्रपूर येथील महाकाली मंदीर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम व प्रात्यक्षिक घेण्यात आले. …अधिक वाचा
12:55 (IST) 26 May 2025

२६ जुलै नाही, २६ मेलाच बदलापुरात उल्हास नदी इशारा पातळीवर; बदलापुरच्या भुयारी मार्गात कार बुडाली, वांगणी रस्ताही पाण्याखाली

बदलापूर वांगणी रस्त्यावर पाणी आले होते. तर शहरातील महत्वाचा बेलवली भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने त्यात एक चारचाकी बुडाली होती. …अधिक वाचा
12:45 (IST) 26 May 2025

जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण: एसआयटीव्दारे चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. …सविस्तर वाचा
12:45 (IST) 26 May 2025

ऑनलाईन गोंधळ! अकरावी प्रवेशातील अडचणी व त्याची अशी उत्तरे

सध्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची जोरात चर्चा सूरू आहे. यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने अनेकांचा गोंधळ उडत असल्याचे म्हटल्या जाते. …सविस्तर वाचा
12:45 (IST) 26 May 2025

चिंचोटी कामण – भिवंडी  रस्त्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी सोमवारी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. …सविस्तर वाचा
12:43 (IST) 26 May 2025

सीएसएमटी यार्डमध्ये भरले पाणी, पावसामुळे लोकल सेवा खोळंबली

फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि १० ते १८ वरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. …सविस्तर बातमी
12:39 (IST) 26 May 2025

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगामपूर्व पावसामुळे भात रोपांचे नुकसान

पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकरी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी भात बियाणे पेरून रोपे तयार करतात. …सविस्तर बातमी
12:33 (IST) 26 May 2025

Lonavala Rain Updates: गेल्या २४ तासांत तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस कोसळला

मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये देखील गेल्या २४ तासात तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. …सविस्तर वाचा
12:21 (IST) 26 May 2025

Maharashtra Rain Updates : मोसमी पावसाचे आगमन, पण पेरणी कराल तर नुकसान…

हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. …अधिक वाचा
12:12 (IST) 26 May 2025

मुंबईत ‘या’ भागात अतिवृष्टीतासाभरात १०४ मिमी पाऊस

अवघ्या एका तासांत, सकाळी ९ ते १० या वेळेत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. …अधिक वाचा
12:10 (IST) 26 May 2025

अमित शाह नागपुरात मात्र, नितीन गडकरी शाहांच्या स्वागतापासून दूर, घरा शेजारच्या हॉटेलमध्ये राहूनही…

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. …सविस्तर वाचा
11:43 (IST) 26 May 2025

Uran Rain Updates : उरणमध्ये पहिल्या पावसाच्या जोरधारेने अनेकांचे संसार उघड्यावर, सारडे आदिवासी पाडा आणि कळबूसरे मधील घरांचे नुकसान

रविवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासहच्या पहिल्याच पावसाने उरणकरांची तर्धातीरपत उडाली आहे. …वाचा सविस्तर
11:39 (IST) 26 May 2025

सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद, पावसाने रेल्वेला झोडपले

मस्जिद, भायखळा, दादर, माटुंगा, बदलापूर येथील रेल्वे रूळावर पाणी साचले …सविस्तर बातमी
11:36 (IST) 26 May 2025

Panvel Rain News: पहिल्या पावसात कळंबोलीच्या बैठ्या घरात पाणी शिरले

पनवेलमध्ये मागील २४ तासात ८२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळी ९ वाजता पावसाचे पाणी कळंबोली उपनगरातील बैठ्या वसाहतींमध्ये शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. …सविस्तर वाचा
11:27 (IST) 26 May 2025

काँग्रेस खासदार – भाजप आमदारात श्रेयवादाची लढाई

भद्रावती येथील दुर्लक्षित लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. …अधिक वाचा

मुंबईत जोरदार पावसाचा इशारा