Central Railway Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ११ ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन, इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.

गेल्या काही दिवसांपासून कर्जत यार्ड येथे ब्लाॅक मालिका सुरू आहे. तर, आता ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२० ते १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२० पर्यंत ब्लाॅक असेल. हा ब्लाॅक पळसधरी – भिवपुरी – चौक दरम्यान असेल. ब्लाॅकमुळे मुंबई – पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आला असून काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. तर, नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसेल. या दिशेला जाणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लाॅकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत. दिवाळीनिमित्त मुंबईत खरेदीसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

या लोकल रद्द

दुपारी १.१५ ते रात्री ९.४२ दरम्यान सुटणाऱ्या कर्जत – खोपोली लोकल रद्द असतील.

दुपारी १२.४० ते रात्री ११.२० दरम्यान सुटणाऱ्या खोपोली – कर्जत लोकल रद्द असतील.

सायंकाळी ६.०२ वाजता सुटणारी खोपोली – सीएसएमटी लोकल रद्द असेल.

सायंकाळी ७.४३ आणि रात्री १०.०३ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल रद्द असतील.

या एक्स्प्रेस रद्द

सीएसएमटी – पुणे आणि पुणे – सीएसएमटी प्रगती, सीएसएमटी – पुणे आणि पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे – सीएसएमटी डेक्कन, पुणे – सीएसएमटी इंटरसिटी, पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द असतील.

या रेल्वेगाडीच्या मार्गात बदल

गाडी क्रमांक १७६१३ पनवेल नांदेड एक्स्प्रेस पनवेल-कल्याण-कर्जत मार्गे धावेल.

गाडी क्रमांक १७३१८ दादर – हुबळी एक्स्प्रेस ठाणे-दिवा-कल्याण-कर्जत मार्गे धावेल.

गाडी क्रमांक १७३३९ सीएसएमटी – नागरकोइल एक्स्प्रेस दिवा-पनवेल-रोहा-मडगाव-मंगलुरू-शोरुंदर-एर्नाकुलम-कोल्लम मार्गे धावेल.

या लोकल अंशत: रद्द

रात्री १०.२८ वाजताची सीएसएमटी – खोपोली लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात येईल.

रात्री ८.४१, रात्री ९.५८, रात्री ११.१८ वाजताच्या सीएसएमटी – खोपोली लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येतील.

रात्री ९.२६ वाजताची सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल.

सकाळी ०९.३०, दुपारी १.४०, ३.३५ आणि रात्री ११.३० वाजताच्या सीएसएमटी – कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येतील.

सायंकाळी ५.३३ वाजताची सीएसएमटी – खोपोली लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.

सकाळी ९.५७ ते दुपारी १.१९ वाजता, दुपारी २.४५ वाजता, दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.५० वाजता आणि रात्री १२.१२ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील.

दुपारी १२.०५ ते रात्री ९.१६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाणे – कर्जत लोकल आणि दुपारी ३.१० वाजताची सीएसएमटी – खोपोली लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील.

रात्री ११.२१ वाजताची खोपोली ते सीएसएमटी लोकल खोपोलीऐवजी अंबरनाथ येथून नियोजित वेळेनुसार चालवण्यात येईल.

दुपारी ४.३२, सायंकाळी ६.०५, ७.१२ वाजताच्या कर्जत – सीएसएमटी लोकल कर्जतऐवजी बदलापूर येथून नियोजित वेळेनुसार चालवण्यात येईल.

दुपारी २.४६ वाजताची खोपोली – सीएसएमटी लोकल खोपोलीऐवजी बदलापूर येथून नियोजित वेळेनुसार चालवण्यात येईल.

दुपारी १२.१६ ते दुपारी ३.१८ वाजता आणि सायंकाळी ६.१२ ते रात्री ९.५४ वाजेपर्यंत कर्जत – सीएसएमटी लोकल कर्जतऐवजी नेरळ येथून नियोजित वेळेनुसार चालवण्यात येईल.

दुपारी १.४३ वाजताची कर्जत – ठाणे लोकल कर्जतऐवजी नेरळ येथून आणि सायंकाळी ५.१३ वाजताची खोपोली – सीएसएमटी लोकल खोपोलीऐवजी नेरळ येथून चालवण्यात येईल.