Central Railway / जळगाव – मध्य रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये नाशिक रोड – नागपूर मेमू गाडीचाही समावेश आहे. या गाडीला जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा मंजूर आहे.
दिवाळी आणि छट पूजेच्या निमित्ताने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई व पुणे येथून नागपूरसाठी अनेक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नव्या अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या पुणे – नागपूर, नाशिक – नागपूर, मुंबई – नागपूर, नागपूर – अकोला, नागपूर – भुसावळ आणि सोलापूर – नागपूर या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांची मोठी सोय त्यामुळे होऊ शकणार आहे.
०१२१५ पुणे – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला पुणे येथून दुपारी ०२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२१६ विशेष गाडी दिनांक दोन ऑक्टोबरला रोजी नागपूर येथून रात्री ११.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पुणे येथे पोहोचेल.
०१२१७ नाशिक रोड – नागपूर मेमू विशेष गाडी एक, दोन आणि तीन ऑक्टोबरला नाशिक रोड येथून सायंकाळी ०६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२२४ विशेष गाडी दोन ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी ०४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.१५ वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल. ०१२२६ विशेष गाडी दिनांक तीन आणि चार ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहोचेल.
०१०१९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ०२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१०१२० विशेष गाडी दोन ऑक्टोबरला नागपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
०१२१३ भुसावळ ते नागपूर विशेष गाडी दोन, तीन आणि चार ऑक्टोबरला भुसावळ येथून दुपारी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२.२० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२१४ विशेष गाडी दिनांक एक, दोन आणि तीन ऑक्टोबरला नागपूर येथून ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळ येथे पोहचेल.
०१०२९ सोलापूर – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला सोलापूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता नागपूर येथे पोहचेल. ०१०३० विशेष गाडी दिनांक दोन ऑक्टोबरला नागपूर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता सोलापूर येथे पोहचेल. या सर्व गाड्या चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबणार आहेत.