Mumbai Live News Updates, 28 July 2025 : पुण्यातील खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi
भारतीय लष्कराचे ॲापरेशन ‘महादेव’…पहलगाम हल्ल्यातील मृत संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल लेले म्हणाले…
बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचे अमरावतीशी खास नाते….तिच्या आजाेबांनी जिल्हयात ऐतिहासिक….
एक कप चहाच्या किमतीत सिरमने लस दिली! सायरस पूनावाला यांची माहिती.
‘ जो जिंकणार असेल त्यालाच तिकीट मिळणार ‘ म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे, कारण काय….
बारमध्ये सरकारी फाईल्सवर स्वाक्षरी,पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश,म्हणाले ‘ ही बाब गांभीर्याने घेतली”
म्हाडाच्या मुंबईतील १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी आठवड्याभरात जाहिरात; विक्री होत नसलेल्या १२४ दुकानांच्या किंमती घटल्या
मढ-वर्सोवा पुलाचे काम नोव्हेंबर महिन्यापासून पूल सागरी किनारा मार्गालाही जोडणार
जळगावात शरद पवार गटाची पक्ष सोडून गेलेल्यांना चपराक; निष्ठावानांना संधी
निवडणुका येता दारी, भाजप पोहचणार घरोघरी.. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस खुश का ?
सर्पमित्रांची धोकादायक स्टंटबाजी; रिल्स, लाईक्ससाठी सापांचे…वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
टिटवाळ्यात बल्याणी, उंभार्ली भागात तीसहून अधिक जोती, चाळींची बांधकामे भुईसपाट
ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात…अनेक भागात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई
विद्यार्थ्यांसाठी घरे बांधणाऱ्या विकासकांना फक्त १५ टक्के चटईक्षेत्रफळ अधिमूल्य
शिव मंदिरात भक्तांचा पूर, सुविधांचा दुष्काळ; सुविधांअभावी भाविकांची पावसातच दर्शनरांग, पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव
कल्याणमध्ये महसुली दाखले मिळण्यास महिनाभराचा विलंब- विद्यार्थी, पालक, नागरिक त्रस्त
डोंबिवली पश्चिमेत रात्रीच्या वेळेत चायनिज हातगाड्यांचा सुळसुळाट
नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक पराक्रम; वुमेन्स वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत थरारक विजय…
भारतात ७६ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरत! व्हिटॅमिन डीअभावी अंधारात आरोग्य..
भावाची हत्या करून नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव; आरोपीला अटक
जयेश तन्ना यांची ३३ कोटींची मालमत्ता जप्त; लंडनमधील आलिशान बंगलाही सील
भांडुपमधील आणखी एक मराठी शाळा बंद! महापालिका अधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा आरोप ; शाळा पुन्हा सुरू करण्यावरून आमदार आक्रमक
आता मढ ते वर्सोवा प्रवास केवळ पाच मिनिटांत! २४०० कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्राची मंजुरी
खेळायला नेण्याच्या बहाण्याने १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
मुंबईत कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार अद्यापही सुरूच; राज्य सरकारच्या बंदीला वाकुल्या!
कल्याणमधील दूधनाका येथे मरियम टाॅवरवर बेकायदा मजले बांधणाऱ्या विकासकांवर गुन्हा
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग मंदावला
पवईत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे जीवघेणे
कल्याणच्या पर्यटन कंपनीची विमान तिकिटे काढणाऱ्या मध्यस्थाकडून फसवणूक, चेंबुरच्या महाविद्यालयीन प्रवाशांचा विमान प्रवास रखडला
भारतातील पहिली AI अंगणवाडी नागपुरात! बालशिक्षणात नवा अध्याय
भारताची पहिली एआय-सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हिआर हेडसेट्स, एआय-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
ताम्हिणी घाटातील खुनाचा उलगडा, लहान भावाचा खून करणारा आरोपी कर्वेनगरमधून अटक
पुणे : ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २८ जुलै २०२५
