Pune Maharashtra News Updates : ‘मी राजकारण करत नाही आणि लोकांनाही सांगतो की, राजकारण करू नका. चांगले काम केले, की लोक आपोआप मत देतात. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम हीच सगळ्यात मोठी पूंजी असते. राजकीय नेत्यांनी हे समजून घेत ‘शॉर्ट कट’ टाळायला हवेत,’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. तर मुंबईत भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात पंजाबी चाळ येथे २४ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता घराची भिंत नाल्यालगत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, ही विदर्भवासीयांची इच्छा केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तेव्हा मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्यामाध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Marathi News Updates

13:36 (IST) 24 Jun 2025

पिंपरी चिंचवड: फेरीवाला क्षेत्राचा न सुटलेला तिढा

पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपऱ्या, पथारीवाल्यांचे (हॉकर्स) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. फेरीवाल्यांची यादीही तयार आहे.

सविस्तर वाचा…

13:35 (IST) 24 Jun 2025

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पॅनल आघाडीवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब गटातून विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग गटाची मोजणी अंतिम टप्प्यात आली असून भोसले यांनी आघाडी घेतली आहे.

सविस्तर वाचा…

13:34 (IST) 24 Jun 2025

Mumbai Rain News: पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही सोमवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 24 Jun 2025

अबब…तब्बल २७५ ठिकाणी वीज चोरी, अनधिकृत वापरामुळे नियमित ग्राहकांचा…

वीज चोरीचे प्रकरण अकोला परिमंडळात मोठ्या प्रमाणात होत आहे. २५ दिवसात महावितरणकडून २७५ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. …सविस्तर वाचा
13:23 (IST) 24 Jun 2025

एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यातच, काँक्रीटीकरणानंतरही वाहनचालकांचा त्रास कायम

एवढ्या विकासकामांनंतरही पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यातून प्रवास आणि अचानक येणारे खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा त्रास कायम असल्याचे चित्र आहे. …वाचा सविस्तर
13:22 (IST) 24 Jun 2025

२४ हजार कचराकुंड्यांचे वाटप, नवी मुंबई महापालिकेच्या कचरा वाहतूक, संकलन कामाला अखेर मुहूर्त

महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात राबवण्यात येत असलेल्या स्पर्धेपासून नवी मुंबई महापालिका सातत्याने महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान पटकावत आहे. …अधिक वाचा
13:22 (IST) 24 Jun 2025

अतिधोकादायक कांदा-बटाटा मार्केटला बाजार समितीची नोटीस; इमारतीला तातडीने रिकामे करण्याचा महापालिकेचा इशारा

या इमारती १९७७ साली बांधण्यात आल्या असून, त्यांना चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात छत कोसळणे, भिंती उखडणे, पावसाळ्यात गळती यांसारख्या घटना वारंवार घडल्या आहेत. …सविस्तर वाचा
13:21 (IST) 24 Jun 2025

दिबांच्या नामकरणासाठी बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; नामकरणासाठी पुन्हा संघर्ष करण्याचा इशारा

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेला ठराव आज तीन वर्षे होऊन गेली तरी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. …सविस्तर वाचा
13:19 (IST) 24 Jun 2025

पनवेलमध्ये तापाच्या रुग्णसंख्येत वाढ

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रविवारीसुद्धा नागरी आरोग्य केंद्र सुरू ठेवले आहेत. …वाचा सविस्तर
13:19 (IST) 24 Jun 2025

पिंपरी : मेट्रो स्थानकांसाठी १६२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव

पिंपरी : पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिकेसाठी १७ झाडे तोडल्यानंतर आता चार मेट्राे स्थानकांना अडथळा ठरणारी १६२ झाडे ताेडण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव महामेट्राेने महापालिकेच्या उद्यान विभागाला सादर केला आहे.

सविस्तर बातमी…

13:12 (IST) 24 Jun 2025

राजकीय नेत्यांनी ‘शॉर्ट कट’ टाळावेत, नितीन गडकरी यांचा सल्ला

पुणे : ‘मी राजकारण करत नाही आणि लोकांनाही सांगतो की, राजकारण करू नका. चांगले काम केले, की लोक आपोआप मत देतात. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम हीच सगळ्यात मोठी पूंजी असते. राजकीय नेत्यांनी हे समजून घेत ‘शॉर्ट कट’ टाळायला हवेत,’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 24 Jun 2025

मुंबई : भांडुपमध्ये घराची भिंत कोसळून दोन बालकांसह तीन जखमी

मुंबई : भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात पंजाबी चाळ येथे २४ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता घराची भिंत नाल्यालगत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर बातमी…

13:11 (IST) 24 Jun 2025

विदर्भवासीयांना वंदे भारत एक्स्प्रेसची अजूनही प्रतीक्षाच; मुंबई, पुणे सेवा सुरू होणार?

अमरावती हून मुंबई आणि पुणे येथे जाण्यासाठी दोन नियतिम एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. पण, तरीही मुंबई आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही रेल्वेसेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

वाचा सविस्तर…