Mumbai News Today : देशभरात सध्या चर्चा आहे ती ऑपरेशन सिंदूर आणि त्याअनुषंगाने सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाची. महाराष्ट्रातूनही सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, आता या कारवाईतील काही मुद्द्यांवर विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे भारत-पाकिस्तान मुद्दा राज्यात चर्चेत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Mumbai-Pune News Live Today 12 May 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर
लवळेकर, मोहाडीकर यांना तळवलकर ट्रस्टचे पुरस्कार
पुणे: कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी मानसशास्त्र संस्थेच्या संचालक व ज्येष्ठ मानसशास्त्र संशोधिका डॉ. अनघा लवळेकर यांना समाजशिक्षक पुरस्कार आणि कंझ्युमर शॉपी या व्यवसाय प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांना अनुकरणीय उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात रविवारी (१८ मे) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे श्रीकांत कुलकर्णी आणि चारुदत्त आलेगावकर यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
आयुक्त निवासस्थानाबाहेर भाजपचे अनधिकृत कंटेनर कार्यालय!
ऐतिहासिक वसई किल्ल्याचा २८७ वा विजयोत्सव जल्लोषात
हिंदू देवीदेवतांची अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमावर, विकृताला महाराष्ट्र सायबर विभागाकडून अटक
तारापूर अणुशक्ती केंद्र परिसरात लोकसंख्या, औद्योगिकीकरण, अनधिकृत बांधकामांचे प्रश्न
नागपूरच्या ठकसेनाला अखेर अटक, कांदिवलीच्या व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक
कोल्हापुरात काँग्रेसच्या बैठकीला ३४ माजी नगरसेवकांची उपस्थिती
कोल्हापूर: कोल्हापूर काँग्रेसमधील एक गट शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीला मावळत्या सभागृहातील ३४ माजी नगरसेवकांनी हजेरी लावली. काँग्रेससोबत एकनिष्ठपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. तातडीने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची एक बैठक एका हॉटेलमध्ये आयोजित केली होती.
त्याला मावळत्या सभागृहातील ३४ सदस्यांनी उपस्थिती लावली. त्यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवून महापालिकेवर सत्ता मिळवली जाईल, असा निर्धार बोलून दाखवला.
या सदस्यांची भेट घेऊन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला.
या बैठकीस शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिलीप पोवार हे अनुपस्थित होते.
Aaditya Thackeray on Kashmir Conflict : “काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही”, मोदींच्या भाषणाआधीच आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत!
काजू उत्पादनात कोकण क्रांती करेल; पालकमंत्री डॉ. उदय सामंत
माजी आमदार रमेश कदम लवकरच शिवसेनेत दाखल होणार? पालकमंत्री उदय सामंत यांच्या ऑपरेशन टायगरचे पुढील टार्गेट रमेश कदम
Satara Prasad Kale News : लग्न लागलं, पूजा झाली, पण ओल्या हळदीच्या अंगानेच जवान सीमेवर दाखल; नववधू म्हणते, “मी स्वतःला…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar: संजय शिरसाट यांचं शरद पवारांबाबत सूचक विधान…
भविष्यात शरद पवार महायुतीत येतील का? अजित पवारांसोबत जातील का? अजित पवार राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील का? हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल. अजित पवार व शरद पवारांना आधी एकत्र येऊ द्या. नंतर ते काय समीकरण मांडतात ते बघू. पण भाजपा व शिवसेनेची युती पक्की आहे. त्यात कुठेही मतभेद नाहीत – संजय शिरसाट
उबाठा गटाच्या लोकांनी केलेली युती चुकीची होती याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहणार नाही हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो. त्यांचं भविष्य अंधकारमय होत चाललेलं असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट कौटुंबिक आहे. ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रकारचे संकेतही आहेत. गेल्या चार महिन्यांत काँग्रेस उद्धव ठाकरे गटासोबत नाहीये. त्यांची एकही बैठक झालेली नाही – संजय शिरसाट
वसईतील दांपत्याचा फिलीपिन्स येथील अपघातात मृत्यू, फादरांना जखमी अवस्थेत असताना फोन केल्याने घटना उघड
मुंबई नाशिक महामार्गालगत पान-टपऱ्या, दुकानांत अमली पदार्थांचा साठा
पालघर : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला, तलासरी भागात बिबट्याचा हल्ला
सिन्नर तालुक्यात तीन बिअर दुकानांमध्ये चोरी, सराईत गुन्हेगार ताब्यात
हेडगेवार रुग्णालयातील सांघिक भावनेचा ‘ एम्स’ साठीही उपयोग; अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांना विश्वास
“मुंबईला सातत्याने…” राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाची चर्चा!
महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
पुण्यात ‘आरपीआय’ मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची बैठकीनंतर प्रतिक्रिया
नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज एक बैठक घेण्यात आली. सध्याच्या युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती. पण सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांशी आपण बैठक घेतली नव्हती. आजच्या बैठकीत या दिवसांमध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आत्ताही आपण कसं सतर्क राहायला हवं यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतलं.
आपण जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे. त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आजची बैठक आम्ही घेतली.
DCM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी नागरी-लष्करी समन्वयासाठी बोलावलेली बैठक संपली
यापूर्वीदेखील राज्य सरकारच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसोबत बैठक झाली होती. पण आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. सिव्हिल डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड यांच्यासोबत या बैठकीत चर्चा झाली. समन्वयासंदर्भात चर्चा झाली. सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सरकारच्या वतीने आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डला हवी ती सर्व मदत दिली जाईल असं सरकारनं सांगितलं आहे – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
CMO Maharashtra Post: २०२३ पर्यंत ३८ गिगावॅट वीजनिर्मितीचं लक्ष्य
महाराष्ट्रात २०३० पर्यंत ३८ गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून त्यासाठी सरकारकडून ३.३ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून तब्बल ७ लाख नवे रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra’s Mega Energy Move:
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 12, 2025
38 GW Green Capacity, 7 Lakh Jobs!
Maharashtra is spearheading India's clean energy revolution under CM Devendra Fadnavis' leadership with an ambitious plan to add 38 GW of renewable capacity by 2030. Backed by ₹3.3 lakh crore in investments and…
कल्याण रेल्वे स्थानक भागात खाजा कोयता गुंडाची दहशत; महिलेसह नागरिक, दुकानदार यांना कोयत्याने मारण्याची धमकी
जलवाहिनी फुटल्याने कळवा, दिवा, मुंब्रा भागाचा पाणी पुरवठा बंद; ऐन उन्हाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईची समस्या
लग्न करण्याची तयारी दर्शवून कल्याणमधील तरूणाला तरूणीने घातला ३९ लाखाचा गंडा
“इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्यानंतरच…”, रोहित पवारांची पोस्ट; भारत पाकिस्तान शस्त्रविरामानंतर चर्चा!
वाळूवरून भाजप आमदरांमध्ये वाकयुद्ध
मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार आज एका व्यासपीठावर (File Photo)
Mumbai-Pune News Live Today 12 May 2025 : महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी संदर्भातील घडामोडींचा आढावा…