Mumbai Maharashtra Breaking Update : मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाणे-डोंबिवलीतील नागरिकांमधून रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली असून आज मनसे ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन असा धडक मोर्चा काढणार आहे. मुंब्र्यातील घटनेनंतर उमटणारे पडसाद व राजकीय प्रतिक्रियांकडे आपलं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय घडामोडींकडेही आपण लक्ष ठेवणार आहोत. जसे की आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यांवर गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची आज भेट घेणार आहेत याकडे आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या.

12:34 (IST) 10 Jun 2025

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य आरोपी कोण?, अहवाल ‘लोकसत्ता’च्या हाती

शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे अधिकारी रवींद्र पाटील यांनी उपसंचालक नरड यांच्या आदेशानुसार शालार्थ आयडीमध्ये गैरप्रकार होत असल्याची पोलीस तक्रार दिल्याचे प्राथमिक तपास अहवालानंतर समोर आले होते. …सविस्तर बातमी
12:03 (IST) 10 Jun 2025

ना श्रीमंतीचा बडेजाव ना इव्हेंट, हरिपाठाच्या गजरात पार पडले शुभमंगल

या विवाह सोहळ्याचे नियोजन अत्यंत सुबक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. वऱ्हाड्यांसाठी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची व्यवस्था होती. …वाचा सविस्तर
11:52 (IST) 10 Jun 2025

प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा ‘सोशल कनेक्ट’वर भर

प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस सत्तेपासून दूर जाताच भरकटलेल्या स्थितीत होती. तेच ते नेते, तेच ते कार्यकर्ते, गटबाजी यामुळे नागपुरातील काँग्रेस पोखरलेली होती. …अधिक वाचा
11:52 (IST) 10 Jun 2025

…तर प्रवेशोत्सव साजरा न करता शाळा बंद ठेवणार

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरणे, विकास निधी वाढवणे, व आरटीई शुल्काची थकबाकी अदा करणे या मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे. …वाचा सविस्तर
11:41 (IST) 10 Jun 2025

“प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा”, जयंत पाटलांची शरद पवारांकडे मागणी

राष्ट्रवदी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा”, अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे केली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पाटील यांनी सर्व नेते, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसमोर हे वक्तव्य केलं आहे.

11:38 (IST) 10 Jun 2025

गडकरींनी फटकारल्यानंतर ओसीडब्ल्यूला जाग, नागपुरात आणले ‘पुशकॅम’, ‘रोबोकॅम’ तंत्रज्ञान

गडकरी यांनी दोन आठवड्यापूर्वी बैठक घेतली आणि २४ तास पाणी पुरवठा करण्याची जवाबदारी असलेल्या आरेंज सिटी वॉटर वर्क कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर कंपनीने हालचाली सुरू केल्या. …अधिक वाचा
11:33 (IST) 10 Jun 2025

मुंब्रा रेल्वे दुर्घटने विरोधात ठाणे रेल्वे स्थानकात मनसेचा धडक मोर्चा

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेने मंगळवारी ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला, यावेळी मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासना विरोधात घोषणा बाजी केली. …सविस्तर वाचा
11:18 (IST) 10 Jun 2025

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एनबीईएमएसने नीट पीजी परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्याचा निर्णय घेऊन ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. …वाचा सविस्तर
11:17 (IST) 10 Jun 2025

सुपीक जमिनीवर पाणी अन् मोबदल्यासाठी ‘पाटबंधारे’च्या दारी! प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना…

त्वरित मोबदला न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. मोबदला देण्याच्या शासन निर्देशांकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पबाधितांनी केला. …सविस्तर वाचा
11:03 (IST) 10 Jun 2025

रेल्वे वाहतुक सुरु परंतु प्रवाशांचे हाल

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात काही तांत्रिक कारणामुळे येथील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. सकाळी ८.४७ नंतर येथील रेल्वे वाहतुक सुरळीत झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. …अधिक वाचा
10:57 (IST) 10 Jun 2025

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडे लाचेची मागणी; नाशिकमध्ये नामको रुग्णालयातील महिला डॉक्टरसह तीन जणींविरोधात गुन्हा

तक्रारदार हे पिवळे शिधापत्रिकाधारक असून त्यांच्या पत्नीवर पेठ रस्त्यावरील नामको कॅन्सर रुग्णालयात शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत शस्त्रक्रिया झाली होती. …वाचा सविस्तर
10:50 (IST) 10 Jun 2025

“रेल्वे स्थानकांवरील स्टॉल हटवा, अन्यथा…”, मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा

“रेल्वे स्थानकांवरील स्टॉल हटवा, अन्यथा आम्ही सगळे स्टॉल उद्ध्वस्त करू असा इशारा मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मनसेने अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक असा धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकांवरील वर्तमानपत्र व खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी उचित उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

10:44 (IST) 10 Jun 2025

शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा; फेरसर्वेक्षणाची माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांची मागणी

शक्तिपीठ महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्याला व्हायला हवा म्हणून फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे समृद्धी महामार्ग वाढवन बंदर ला जोडला तसाच शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदर व रेवस महामार्गाला जोडला पाहिजे असे त्यांनी सांगितले. …वाचा सविस्तर
10:40 (IST) 10 Jun 2025

“आपली बाजू खरी असली तरी अन्याय…”, सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचा अर्थ काय? स्वतः उत्तर देत म्हणाल्या…

Supriya Sule on Whatsapp Status : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे दाखल झाल्या आहेत. …वाचा सविस्तर
10:27 (IST) 10 Jun 2025

मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातातील मृत्यूदर ३८.०८ टक्के

पश्चिम रेल्वेवर २००५ पासून जुलै २०२४ पर्यंत २२,४८१ जणांना आपला जीव गमावला, तर २६,५७२ प्रवासी जखमी झाल्याची कबुली पश्चिम रेल्वेने दिली होती. दुसरीकडे, मध्य रेल्वेवर २००९ पासून जून २०२४ पर्यंत २९,२३१ प्रवाशांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. …सविस्तर वाचा
10:13 (IST) 10 Jun 2025

धरणांमध्ये २५ टक्के जलसाठा

सलग महिनाभरापासून पाऊस हजेरी लावत असताना हंगामाच्या प्रारंभी जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये १६ हजार १४४ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे २५ टक्के जलसाठा आहे. …वाचा सविस्तर
10:10 (IST) 10 Jun 2025

मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा

मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक झाली असून पक्षाचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने आज ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वेस्टेशन असा धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चावेळी मनसेने रेल्वे प्रशासनावरील संताप व्यक्त केला. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

10:07 (IST) 10 Jun 2025

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा

मनसेने ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरात फौजफाटा तैनात केला आहे. …वाचा सविस्तर
09:33 (IST) 10 Jun 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटांचे आज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात शरद पवार यांच्या गटाचा, तर बालेवाडी येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच हे मेळावे पार पडत असल्यामुळे सर्वांचं या मेळाव्यांकडे लक्ष लागलं आहे. आज दोन्ही पक्ष त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.

09:26 (IST) 10 Jun 2025
नेरुळमध्ये सिग्नल यंत्रणा बिघाडल्यामुळे हार्बर-ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत

नेरुळ रेल्वेस्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल रेल्वेसेवा ठप्प आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेने धावणाऱ्या गाड्या बंद आहेत. तसेच यामुळे हार्बर रेल्वेसह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सगळ्यामुळे प्रवशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.