Maharashtra Rain Updates : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.

Live Updates

IMD Weather Forecast Today LIVE News Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

21:48 (IST) 19 Aug 2025

अतिवृष्टीमुळे दुसऱ्या दिवशीही रुग्णालयांतील रुग्णसंख्येत घट; ६० ते ६५ टक्क्यांनी रुग्णांची संख्या कमी

मुंबईमध्ये सलग दोन दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. तर रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. …वाचा सविस्तर
21:32 (IST) 19 Aug 2025

मुसळधारांचा उच्च न्यायालयाच्या कामकाजाला फटका; अवघे दीड तासच कामकाज

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारीही पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. …सविस्तर बातमी
21:00 (IST) 19 Aug 2025

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. …सविस्तर बातमी
20:39 (IST) 19 Aug 2025

मुंबईच्या चेंबूर भक्ती पार्क दरम्यानची मोनोरेल बंद पडली, तब्बल एका तासानंतर प्रवाशांना बाहेर काढलं

Mumbai Monorail : मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसह मोनोरेललाही बसला आहे. मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा

20:21 (IST) 19 Aug 2025

राज्यात अनेक भागात पूरस्थिती; पुढील दोन दिवस मुसळधार, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. …वाचा सविस्तर
20:06 (IST) 19 Aug 2025

तांत्रिक कारणाने मोनोरेल मध्येच ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु…

या घटनेची माहिती मिळताच महा मुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिघाडाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. …सविस्तर बातमी
19:54 (IST) 19 Aug 2025

पावसाचे पाणी उपसा करणारे ५०० हून अधिक पंप बसवूनही मुंबई जलमय

मुंबईकरांची मात्र पावसाच्या पाण्यापासून सुटका झाली नाही. तर गरज पडल्यास आणखी पंप वाढवण्याचे निर्देश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. …सविस्तर वाचा
19:54 (IST) 19 Aug 2025

Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात पावसामुळे पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू; कोल्हापुरात सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोल्हापुरात सततच्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

19:21 (IST) 19 Aug 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बुधवारी आपत्कालीन कक्षाला भेट देऊन पावसाचा आढावा घेतला. …सविस्तर बातमी
19:09 (IST) 19 Aug 2025

कल्याण डोंबिवलीतील अतिवृष्टीचा आयुक्तांकडून आपत्कालीन नियंत्रण केंद्रातून आढावा; दिवसभरात ७४ मिमी पावसाची नोंद

मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात काय परिस्थिती आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या भागात पालिका कर्मचारी कसे काम करतात. …सविस्तर बातमी
19:04 (IST) 19 Aug 2025

व्ही. एन देसाई रुग्णालयाच्या इमारतीच्या छतातून गळती; काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या मजल्याचे करण्यात आले होते नूतनीकरण

पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. डागडुजीच्या कामासाठी कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. …सविस्तर बातमी
18:51 (IST) 19 Aug 2025

राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह; व्याख्याने, लोककलांच्या अविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला …वाचा सविस्तर
18:42 (IST) 19 Aug 2025

मुंबईतील रेल्वे सेवा पुन्हा हळू हळू पूर्वपदावर

मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेलाही बसला. रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी लोकलची सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईतील रेल्वे सेवा पुन्हा हळू हळू पूर्वपदावर येत आहे.

18:41 (IST) 19 Aug 2025

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील कार्यकर्ते भाजपमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाचा नवा अध्याय रचला जात आहे. भाजप सामान्य माणसापर्यंत पोचावा, ही अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली .   …अधिक वाचा
18:27 (IST) 19 Aug 2025

मुंबईला पावसाने झोडपले; वाहतूक कोंडी, सखलभाग पाणी, लोकल सेवा ठप्प, मुंबईकरांची त्रेधा

मुंबईत मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. सोमवारी कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांचे झालेले हाल लक्षात घेता महापालिकेने मंगळवारी शाळांना सुटी जाहीर केली होती. …सविस्तर वाचा
18:14 (IST) 19 Aug 2025

चार दिवसांत मुंबईतील रस्त्यांवर साचलेल्या दीड हजार कोटी लिटर पाण्याचा उपसा; पाच उदंचन केंद्रातील पंप ७६१ तास कार्यरत

तुळशी तलावातील पाण्याच्या तुलनेत दुप्पट पाणी मुंबईतील रस्त्यांवरून उपसून समुद्रात टाकण्यात आले. …अधिक वाचा
17:43 (IST) 19 Aug 2025

“घराघरात पाणी, रस्त्यावर तलाव, नालेसफाईशिवाय…” दिवा जलमय होताच ठाकरे गटाच्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया

मंगळवार सकाळपासून ठाणे महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. …सविस्तर बातमी
17:43 (IST) 19 Aug 2025

रेल्वेचा बोगदा जलमय झाल्याने निळजे-पलावाचा संपर्क तुटला; बोगद्यात वाहन अडकले

डोंबिवली जवळील शीळफाटा रस्त्यावरील निळजे गाव ते पलाव वसाहतीत जाण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने निळजे ग्रामस्थांशी चर्चा न करता परस्पर ग्रामस्थांच्या सोयासाठी रस्ते मार्गासाठी बोगदा बांधून दिला. …अधिक वाचा
17:32 (IST) 19 Aug 2025

मुंबईची दूध-भाजी कोंडी!

संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तरीदेखील राज्याच्या विविध भागातून दूध आणि भाजीपाल्याची आवक सुरू आहे. …सविस्तर वाचा
17:23 (IST) 19 Aug 2025

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची करताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला त्यांनी दिले. …सविस्तर वाचा
16:44 (IST) 19 Aug 2025

तीन दिवसांच्या पावसाने ऑगस्टची सरासरी ओलांडली

सांताक्रूझ येथे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, केवळ तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही सरासरी ओलांडली गेली आहे. …अधिक वाचा
16:28 (IST) 19 Aug 2025

प्रतीक्षानगरमधील म्हाडाचे संक्रमण शिबिर पाण्याखाली; रहिवाशांचे तातडीने नव्या गाळ्यात स्थलांतर

आवश्यक कारवाई करून दुरुस्ती मंडळाने पात्र रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर घुसखोरांबाबतही योग्य तो निर्णय घेऊन त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
16:04 (IST) 19 Aug 2025

छतावरील सौरऊर्जा प्रकल्प योजनेची नागपूरमध्येच गती, अन्य जिल्ह्यांत कासवगती

पुणे, जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हे पाच जिल्हे वगळता अन्य बहुतांश जिल्ह्यांत या योजनेची कासवगतीच आहे. …अधिक वाचा
15:57 (IST) 19 Aug 2025

मुठा नदी पात्रामध्ये कोणीही उतरू नये

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात दुपारी ४ वाजता २४ हजार ८२७ इतकी वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी -: मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे</p>

15:55 (IST) 19 Aug 2025

रेल्वे रूळ पाण्याखाली

15:53 (IST) 19 Aug 2025

कोल्हापुरातून गोवा, कोकणात जाण्यासाठी आंबोली एकच मार्ग उरला! वाहतूक व्यवस्थेवर पावसाचा गंभीर परिणाम

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळणावर परिणाम होऊ लागला आहे. …अधिक वाचा
15:47 (IST) 19 Aug 2025

सीएसएमटी-ठाणे लोकलसेवा पूर्णपणे बंद; हार्बर व पश्चिम मार्गावरील गाड्यांचा खोळंबा, रेल्वेस्थानकांवर प्रचंड गर्दी

सीएसएमटी-ठाणे मार्गावरील (मध्य) लोकलसेवा पूर्णपणे बंद झाली आहे. रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी व सिग्नल यंत्रणेतील अडथळ्यांमुळे मध्य रेल्वे ठप्प आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कासवगतीने लोकल सेवा चालू असली तरी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. पश्चिम मार्गावरील गाड्यांचा देखील खोळंबा झाला आहे. वसई ते विरार लोकल सेवा बंद आहे. तर उर्वरित पश्चिम रेल्वे मार्गावर अर्धा ते पाऊण तास उशिराने रेल्वे गाड्या धावत आहेत.

15:39 (IST) 19 Aug 2025

राज्यात २८ हजार नव्याने रोजगार निर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज मंत्रालयातील समिती कक्षात १० सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी ते गुंतवणूकदारांसमोर बोलत होते. …सविस्तर वाचा
15:01 (IST) 19 Aug 2025

नांदेड : हसनाळमध्ये निसर्गाने नव्हे; प्रशासनाने घडविली हानी! मृतांच्या नातेवाईकांचा आरोप, लेंडी धरण व घळ भरणीचा मुद्दा तापला

रविवारी मध्यरात्री मुक्रमाबाद महसूल मंडळात झालेल्या विक्रमी आणि तडाखेबंद पावसाचा सर्वाधिक फटका लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ९ गावांना बसला. …वाचा सविस्तर
14:46 (IST) 19 Aug 2025

Koyna Dam : कोयनेतून तब्बल ६८ हजार क्युसेकचा विसर्ग, कृष्णा- कोयना नद्यांना पूर; अनेक पूल, रस्ते पाण्याखाली

गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम घाट क्षेत्रासह कोयना पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. …सविस्तर बातमी