Mumbai Pune Nagpur Live News Updates, 05 November 2025 : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. या संदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला’, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai Live Updates Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

16:27 (IST) 5 Nov 2025

महाऊर्जामध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती! मात्र, बनावट उमेदवारांची…

खासगी क्षेत्रातील कुठल्या दर्जाच्या कंपन्यांमधला अनुभव असावा, याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये नाही. …सविस्तर बातमी
16:16 (IST) 5 Nov 2025

नितीन गडकरी म्हणाले, “देशाला आज निर्भीड व बेधडक पत्रकारांची गरज, अन्यथा लोकशाहीसाठी…”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा आपल्या भाषणात प्रसार माध्यमांविषयी बेधडक वक्तव्य केले आहे. …सविस्तर बातमी
16:10 (IST) 5 Nov 2025

बिलासपूर रेल्वे अपघात : अनेक गाड्या रद्द, काही उशिराने सुटणार

धडकेनंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स, सिग्नल प्रणाली आणि रुळांचे मोठे नुकसान झाले. …सविस्तर बातमी
16:06 (IST) 5 Nov 2025

विरोधी पक्षांकडून मतदार यादीवर आक्षेप… दोन ठिकाणी नोंद असलेला मतदार असे करणार मतदान… नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले…

विरोधी पक्षातील नेत्यांकडून नागपूरसह देशभरातील मतदार यादीतील घोळाबाबत सातत्याने वेगवेगळे आरोप केले जात आहे. …सविस्तर वाचा
15:49 (IST) 5 Nov 2025

रहिवाशांच्या इशाऱ्यानंतर कुलाब्यातील फेरीवाल्यावर महापालिकेची कारवाई

मुंबई महापालिकेत्या फेरीवाला धोरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुंबईत फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुलाबा कॉजवे परिसरात गेल्या काही महिन्यांत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. …अधिक वाचा
15:44 (IST) 5 Nov 2025

सांगलीत आघाडी धर्माला तिलांजली ?

जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे घुमशान आता चालू झाले असून सत्ता संपादनासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. …सविस्तर वाचा
15:03 (IST) 5 Nov 2025

मुंबई क्रिकेट असोसिएसनच्या निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात; उद्याच्या सुनावणीनंतर चित्र स्पष्ट होणार; पात्र उमेदवारांची यादी…

एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. …वाचा सविस्तर
14:22 (IST) 5 Nov 2025

TET : टीईटीच्या परीक्षा केंद्रांबाबत महत्त्वाचा निर्णय… कोणाला कुठे परीक्षा द्यावी लागणार?

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. यात पहिली ते पाचवी या इयत्तांसाठीची परीक्षा (एक) सकाळच्या सत्रात, तर सहावी ते आठवी या इयत्तांसाठीची परीक्षा (दोन) दुपारच्या सत्रात होणार आहे. …सविस्तर वाचा
14:06 (IST) 5 Nov 2025

राज्यातील चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या; पोलीस आयुक्तालयातही अंतर्गत फेरबदल

मंगळवारी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्या आधीच गृहविभागाने राज्यातील चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या. …अधिक वाचा
14:00 (IST) 5 Nov 2025

“राहुल गांधींचा डेमो बघून भाजपाचे डोळे उघडतील”, रोहित पवारांची भाजपावर टीका

“बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर २२ वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
13:54 (IST) 5 Nov 2025

गृहसेविकेची फास घेऊन आत्महत्या; चोरीचा आळ घेतल्याने नैराश्य आल्याची शक्यता

ॲन्टॉप हिल येथे घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुळची दार्जिलिंगमधील रहिवासी होती. …सविस्तर बातमी
13:49 (IST) 5 Nov 2025

उपनगरातील अडीच एकर भूखंड अतिक्रमण मुक्त; उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

मालवणी, अंबोजवाडी परिसरातील संरक्षित कांदळवन परिसराला लागून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ही अतिक्रमणे प्रामुख्याने २०११ नंतर असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. …वाचा सविस्तर
13:40 (IST) 5 Nov 2025

मुंबईकर गमावणार ‘गुलाबी झाडी अन् हिरवंगार रान…’; प्राणवायू देणाऱ्या पिंपळ, वडावरही गंडांतर

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर लावलेल्या ११०० झाडांवर गंडांतर; गुलाबी फुले येणाऱ्या झाडांचा विकासात धोका, काही झाडे वाचवण्याचे प्रयत्न सुरू. …अधिक वाचा
13:27 (IST) 5 Nov 2025

सहा वर्षांच्या मुलाने रागाने सोडले घर; दोन दिवस दादर फलाटावर काढले

नायगाव (पूर्व) येथील पाचोरीपाडा, चिंचोटी परिसरात वास्तव्यास असलेले अविनाश रतनलाल गिरी (४१) यांचा सहा वर्षांचा मुलगा २४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला. …वाचा सविस्तर
13:08 (IST) 5 Nov 2025

मानसिक आरोग्य प्राधिकरणे कागदावरच सक्रिय! कायद्याला आठ वर्षे उलटली तरी अनेक राज्यांत अजूनही अपूर्ण रचना…

२०१७ साली लागू झालेल्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार सर्व राज्यांनी स्वतंत्र प्राधिकरणे, निरीक्षण मंडळे आणि उपचार केंद्रांची नोंदणी व्यवस्था उभारायची होती. मात्र आठ वर्षांनंतरही बहुतांश राज्यांत ही यंत्रणा केवळ कागदावरच कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. …वाचा सविस्तर
13:08 (IST) 5 Nov 2025

धुमाकूळ घालणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला अखेर शार्प शूटरने टिपले

गेल्या १५ दिवसांत या परिसरातील रोहन बोंबे (वय १३), शिवन्या बोंबे (वय ५) यांच्यासह ज्येष्ठ महिला भागूबाई रंगनाथ जाधव (वय ८५) या तिघांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचे प्राण घेतल्याने या परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. …वाचा सविस्तर
12:49 (IST) 5 Nov 2025

“जर सरकार दगाबाज असेल तर त्यांच्याशी दगाच केला पाहिजे”, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

“जर सरकार दगाबाज असेल तर त्यांच्याशी दगाच केला पाहिजे. त्यांना सांगा आधी कर्जमुक्ती द्या मग आम्ही तुम्हाला मतं देऊ. माझा शेतकरी अन्नदाता आहे, कर्जमुक्ती केली तरच मतं देऊ. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ आहे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा आता कुठे गेलास रे चोरा? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

12:40 (IST) 5 Nov 2025

वाघोबापासून रक्षणासाठी तळवलीत साजरी झाली “वाघबारस” ग्रामीण भागात पारंपारिक सण जोपासण्याची प्रथा कायम

पशुधनाच्या रक्षणासाठी दिवाळी साजरा होणारा ‘वाघबारस’ हा अनोखा व काही ठिकाणी पारंपारिक साजरा होणारा हा सण मुक्या प्राण्यांविषयीचे ममत्व आणि त्याच्या जीविताच्या रक्षणाची काळजी वाहणारा म्हणून अनोख स्थान मिळवून आहे. …सविस्तर बातमी
12:17 (IST) 5 Nov 2025

पुणे महापालिकेने कर्करोगाच्या निदानासाठी घेतला मोठा निर्णय !

पुणे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांत सध्या ‘पेट स्कॅन’ची सुविधा नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. …सविस्तर वाचा
12:01 (IST) 5 Nov 2025

पिंपरीत प्रियकराचा खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप

सविता प्रकाश जाधव (वय ३०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. …अधिक वाचा
11:56 (IST) 5 Nov 2025

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीसाठी नव्याने जाहिरात…. १११ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठाने या पूर्वी डिसेंबर २०२३, सप्टेंबर २०२४ अशी दोनवेळा जाहिरात प्रसिद्ध केली होती. …सविस्तर बातमी
11:45 (IST) 5 Nov 2025

नागरी समस्यांमुळे विदर्भात सत्ताधाऱ्यांची कसोटी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील पहिल्या टप्प्याची घोषणा नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. …अधिक वाचा
11:40 (IST) 5 Nov 2025

पुणे पदवीधर मतदारसंघावरून भाजप, राष्ट्रवादीत आतापासूनच वाद

पुणे पदवीधर व शिक्षक या दोन्ही विधान परिषद निवडणुका पुढील वर्षीच्या अखेरीस होणार आहेत. मात्र या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुती अंतर्गत स्पर्धा आतापासूनच रंग धरू लागली आहे. …सविस्तर वाचा
11:36 (IST) 5 Nov 2025

Monorail Accident: मोनोरेल दुर्घटनांची मालिका सुरूच…चाचणीदरम्यान नव्या गाडीचा अपघात; गाडी दुसऱ्या रुळावरच्या बीमवर आदळली…

मोनोरेल मार्गिकेतील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. …सविस्तर वाचा
11:27 (IST) 5 Nov 2025

भिडे पूल ‘चालू-बंद-चालू’ या लपंडावामुळे संभ्रम वाढला… पुन्हा दहा दिवस

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) डेक्कन जिमखाना ते पेठ भाग जोडणाऱ्या भिडे पुलाच्या वर उन्नत पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या उन्नत पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. …वाचा सविस्तर
11:19 (IST) 5 Nov 2025

मुंबईतील वडाळा परिसरात मोनोरेलच्या चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाड? कोणतीही दुखापत झाली नाही

गेल्या काही दिवसांत मुंबईमधील मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. आज पुन्हा एकदा मुंबईमधील वडाळाजवळ एका मोनोरेलचा डबा रुळावरून घसरत बाजूला झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅक बदलताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. मोनोरेलच्या चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी नव्हता आणि कोणीही जखमी झाले नसल्याचं वृत्त आहे. याबाबत अद्याप प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

11:10 (IST) 5 Nov 2025

केंद्रप्रमुख भरती परीक्षेत पुन्हा विघ्न… नेमके झाले काय?

राज्यातील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांच्या (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदांसाठी राज्य परीक्षा परिषदेने ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. …सविस्तर बातमी
11:02 (IST) 5 Nov 2025

आयटीआयच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे पाऊल… नेमके होणार काय?

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पीएम सेतू या योजनेचे उद्घाटन केले. …अधिक वाचा
10:51 (IST) 5 Nov 2025

Metro Line 9 :‘मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी कारशेड लवकरच रद्द ? स्थानिकांच्या विरोधानंतर एमएमआरडीएचा विचार, लवकरच निर्णय

मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. या मार्गिकेतील कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. …सविस्तर बातमी
10:50 (IST) 5 Nov 2025

Maharashtra Municipal Elections 2025 : सविस्तर : नगरपालिकांवर वर्चस्व कुणाचे? आतापर्यंतची कामगिरी काय सांगते?

Maharashtra Local Body Elections 2025 : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पार पाडत आहेत. …वाचा सविस्तर

“हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडाचा हल्ला”; रवींद्र धंगेकरांचा मंत्री मोहोळांवर पुन्हा गंभीर आरोप, (फोटो-संग्रहित छायाचित्र)