Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Update: लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या असताना महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. त्याचवेळी विधानसबा निवडणुकांसाठीची रणनीती सर्वपक्षांकडून आखली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मनुस्मृतीविरोधातील आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी गट आव्हाडांना लक्ष्य करत असताना छगन भुजबळांनी मात्र आव्हाडांची बाजू घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणेला सुरुवात केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Marathi News Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा!
मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे येथे गुरुवारी मध्यरात्री १२.३० पासून सुरू झालेल्या ३६ तासांच्या जम्बो ब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३१ मे रोजी गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहून या दिवसाची भरपाई करावी लागणार आहे.
सविस्तर वाचा
मुंबई : रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होऊ लागले असून जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवरी मेट्रो ७’वर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
ठाणे : मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी शुक्रवार पासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्रास नोकरदार वर्गाला होऊ नये यासाठी पर्याय म्हणून ठाणे परिवहन विभागाच्या वतीने विशेष बस गाड्या सोडण्यात येत आहेत.
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिप्सी वर नियंत्रण ठेवणे ताडोबा व्यवस्थापनासाठी कठीण होऊन बसले आहे.वाघ दाखविण्यासाठी पर्यटक जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना अतिरिक्त पैसे देत असल्याने दररोज नियमांचे उल्लंघन होत आहे.
सविस्तर वाचा
पुणे : भरती प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन लेफ्टनंट कर्नलविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा आणि सुशांता नाहक यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (रातुम) कॅन्सर रुग्णालयात कर्करोग वा कर्करोगाच्या संशयित रुग्णांवर उपचार होतात.येथे २०२१-२२ मध्ये उपचाराला आलेल्या एकूण तोंडाच्या कर्करुग्णांपैकी ६८ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन होते.
“४६ सेकंदात २० अँगल… जगावेगळं “ध्यान” आहे हे “, शरद पवार गटाची मोदींच्या ध्यानधारणेवर खोचक टीका!
४६ सेकंदात २० अँगल…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 31, 2024
जगावेगळं "ध्यान" आहे हे ! pic.twitter.com/Q6NWVoRBrz
बुलढाणा: नात्याला काळिमा फासत मावस बहिणीला फुस लावून पळवले. तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.या प्रकरणातील आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
यवतमाळ : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील ३६ हजार १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात यावेळी अकरावीसह आयटीआय, तंत्रनिकेतन आदींसाठी ४६ हजारांवर जागा आहेत. जागा अधिक आणि विद्यार्थीसंख्या कमी असे चित्र असल्याने अकरावी व कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अडचण येणार नसल्याचे दिसते.
नंदुरबार : जिल्हा परिषदेतील कथीत अपंग युनिट घोटाळ्याप्रकरणी ७२ जणांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांच्या सेवा समाप्तीच्या आदेशाने खळबळ उडाली आहे. विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) अहवालात या ७२ जणांचे समावेशन हे शासनाच्या २०१० च्या शासन निर्णयाप्रमाणे झाले नसल्याचा निष्कर्ष काढला असून संबंधितांची नावे देखील शासनाकडील अपंग युनिटवरील विशेष शिक्षकांच्या मूळ यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे कार्य मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने आठ तासांमध्ये फलाट क्रमांक पाचवर पूर्वी रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले आहेत. या कामांसाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर, अभियंते, कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पॉर्शे कार अपघाताच्या निमित्ताने गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य किंवा वैद्यकीय खात्याची जी सगळी अब्रू चव्हाट्यावर आलीय ती आधी सांभाळा… आणि मग दावे ठोकण्याची भाषा करा. लोकशाहीमध्ये विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देणं सत्ताधाऱ्यांना बांधील असतं याचं भान असू द्या… – सुषमा अंधारे</p>
पॉर्शे कार अपघाताच्या निमित्ताने गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य किंवा वैद्यकीय खात्याची जी सगळी अब्रू चव्हाट्यावर आलीय ती आधी सांभाळा… आणि मग दावे ठोकण्याची भाषा करा. लोकशाहीमध्ये विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देणं सत्ताधाऱ्यांना बांधील असतं याचं भान असू द्या… @PTI_News pic.twitter.com/3cRlCQLtzj
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 30, 2024
“४६ सेकंदात २० अँगल… जगावेगळं “ध्यान” आहे हे “, शरद पवार गटाची मोदींच्या ध्यानधारणेवर खोचक टीका!
४६ सेकंदात २० अँगल…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 31, 2024
जगावेगळं "ध्यान" आहे हे ! pic.twitter.com/Q6NWVoRBrz
ठाणे स्थानकावर स्पेशल ब्लॉक…
#CRUpdate – Special Block for Infrastructure Upgradation Work.
— Central Railway (@Central_Railway) May 31, 2024
At Thane station, with 2 round tamping and bobyn unloading, track slewing permanent way work was completed at 09:55 hrs on the Down fast line. The Up Slow line work was cleared at 07:15 hrs. pic.twitter.com/9hIDpDFKVp
विनायक काळेंकडून ससून रुग्णालयाच्या डीन पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत म्हस्केंच्या कर्मचाऱ्यांना सूचना. नियमानुसार काम करण्याचे दिले आदेश.
मनमाड : मध्य रेल्वेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात रेल्वे फलाट दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी एक आणि दोन जून रोजी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या जवळपास २० मेल, एक्स्प्रेस महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पंचवटी, राज्यराणी, धुळे गाड्यांचाही समावेश आहे.
मुंबई : काही महिन्यांपूर्वी आरे दूध वसाहतीतील काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांच्या मधोमध उभ्या रेषेत खोदकाम केल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. तसेच, प्रवासादरम्यान रहिवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदणीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्या आहेत. तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिराने धावत आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे हाल होत आहे. काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचे चित्र होते.
पिंपरी : महापालिकेकडून शहरातील गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी सद्य:स्थितीत ते पाणी पुरत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच भागांतील गृहनिर्माण संस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
मुंबई : मुंबई पालिकेच्या विकास नियोजन विभागातून तब्बल १,४०१ नस्ती (फाइल्स) गायब झाल्याचे उघडकीस आले होते. या इमारतींच्या नस्ती पुनर्स्थापित करण्यात आल्या की नाही, तसेच या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला का, हे १२ वर्षांनंतरही गुलदस्त्यातच असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. “करोडो वेळा संभोग केल्यानंतर ज्या सुखाची प्राप्ती होईल, त्याहीपेक्षा अनंतपटीने सुख हवंय. ते सुख, तो आनंद म्हणजेच ईश्वर. कितीही अय्याशी करा, जगातल्या सगळ्या सुंदर बाया भोगून घ्या, स्वादिष्ट पदार्थ खा, शानदार कपडे घालून मिरवा, अद्भुत संगीत ऐका.. पण हे आनंद संपणारे आहेत”, असं कालीचरण महाराज यांनी म्हटल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४
Marathi News Live Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह सामाजिक-आर्थिक घटना जाणून घ्या एका क्लिकवर!