Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगतला आहे. ‘तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता’, असं संजय शिरसाट यांनी सांगिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Live Updates Today : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
गोगावले यांच्यावर टीका केली म्हणून महाडचे मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर हल्ला, सात जणांवर गुन्हा दाखल
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून चोरलेले सोने, चांदी सापडले… सीडी कुठे गेली ?
Jalgaon Crime: एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर चोरी… सव्वासहा लाखांच्या मुद्देमालासह तीन संशयित ताब्यात
धुळे: वर्गात पोहोचण्याआधी बालविद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून चालण्याचा धडा
“एकत्रित लढू आणि लोकशाही वाचवू”, रोहित पवार यांचा आशिष शेलार यांना टोला
“मतदार यादीत दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल मा. आशिष शेलार साहेब आपले मनापासून आभार! आता मी उद्या मुंबईत येत असून आपण संयुक्त पत्रकार परिषदेत संयुक्तपणे ही बाब लोकांसमोर मांडू…! एकत्रित लढू आणि लोकशाही वाचवू..!”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मतदारयादीत दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल मा. आशिष शेलार साहेब आपले मनापासून आभार! आता मी उद्या मुंबईत येत असून आपण संयुक्त पत्रकार परिषदेत संयुक्तपणे ही बाब लोकांसमोर मांडू…!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 3, 2025
एकत्रित लढू आणि लोकशाही वाचवू..!@ShelarAshish pic.twitter.com/X3Xp1Vfx9p
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद, नाशिकमध्ये ४०० डॉक्टरांचा ऑनलाईन बैठकांवर बहिष्कार
Hitendra Thakur: साधी निविदा काढण्याची पण सत्ताधाऱ्यांची कुवत नाही, हितेंद्र ठाकूरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
गिरीश महाजन यांचा नरहरी झिरवळ यांना इशारा… दिंडोरीत भाजपचा आमदार देण्याचे आवाहन
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंची सनद रद्द, नेमके नियम काय? कधी रद्द केली जाते?
कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवी संघटनेचे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार
Doctors Strike : डॉक्टरांच्या संपाचा रुग्ण सेवेवर फारसा परिणाम नाही
हेमंत गोडसे, डॉ. राजेराम घावटे यांचे मार्गदर्शन कोणाच्या कामाला ?
“हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही”, रोहित पवारांचा इशारा
“केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली, याची विस्तृत चिरफाड या अहवालात केलेली आहे. एकीकडं सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडं भिंतीना ग्रेनाइट चे कंपाऊंड? विशेष म्हणजे बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे. गतवर्षी मी हा मुद्दा मांडला असता मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का? दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 3, 2025
मंत्र्यांच्या… pic.twitter.com/FVGE1b1pBl
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
“महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतजी मान यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन आज दुपारपर्यंत आम्हाला कळविण्याचे आश्वासन दिले आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) यांचे पंजाबचे मुख्यमंत्री मा. भगवंत जी मान यांच्यासोबत बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन आज दुपारपर्यंत आम्हाला कळविण्याचे आश्वासन दिले आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2025
Regarding the…
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण : डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; रुग्णांची गैरसोय
खबर पीक पाण्याची : लांबलेला पाऊस अन् गायब झालेला हिवाळा
राज्यात रक्ततुटवडा! गर्भवती महिलांसाठी परजिल्ह्यातून आणावे लागते रक्त
विदर्भाच्या प्रश्नांसाठी साहित्यिकांचे ऐक्य, साहित्य संमेलनात पाच ठराव
“धुळेकर त्रस्त! अवकाळी पाऊस,अनियोजित ड्रेनेज प्रकरणी आयुक्तांना लेखी निवेदन
सिंधुदुर्ग : तिलारी धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
मुंबई पोलीस दलाला आता गुप्तचर संकलनाचे व्यावसायिक प्रशिक्षण!
मालेगाव: बनावट नोटा कशा चलनात आणल्या ? अटकेतील मौलानाच्या घरात घबाड
भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कोण? सिंधी समाजाचा संताप
उद्धव ठाकरे आणि बावनकुळेंमध्ये जुंपली! बावनकुळे म्हणाले, “ठाकरेंना हिंदू मतदारच दुबार दिसतात का? महाराष्ट्राचा पप्पू कोण हे…”
डॉ. विजयकुमार गावित, शिरीष नाईक यांच्या सूचनेला केराची टोपली, चरणमाळ घाट दुरुस्तीआधी निविदा दुरुस्ती
Gold-Silver Price : लग्नसराई सुरू होताच सोने, चांदीचा पुन्हा धमाका… जळगावमध्ये काय स्थिती ?
“डॉ. संपदा आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी”, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
मनोज जरांगे आता शेतकरी नेते ?
नवी मुंबईत पोलीस भरती प्रक्रिया सुरू, ५२७ पदांसाठी अर्जाला सुरुवात
आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
