Maharashtra News Updates, 26 August 2025 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते उद्या (२७ ऑगस्ट) जालन्यातील आंतरवाली-सराटी येथून निघणार आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला असून. यावेळी आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन करा. परंतु, गणेशोत्सवात विघ्न आणू नका. छत्रपती शिवाजी महाराज सण-उत्सात खोडा घालणाऱ्यांचा निःपात करायचे.” या वक्तव्यासह फडणवीसांनी जरांगे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
गेवराई येथील राड्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हाके हे नंबर एकचे आरोपी असून पोलिसांनी सुमोटोनुसार ही कारवाई केली आहे. दुसऱ्या बाजूला भंडाऱ्यातही मोठी उलथापालथ चालू आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयार हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांना या पदावरून हटवण्यात आलं आहे. भोयार यांच्याकडे वर्ध्यासह भंडाऱ्याची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. भंडाऱ्यासह राज्यात घडणाऱ्या इतर राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
‘वनतारा’ची एसआयटी चौकशी होणार
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र उत्सवाची तयारी चालू आहे. यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. वन्यजीव संरक्षण कायदा आणि देशविदेशातून वन्यप्राणी ताब्यात घेण्याच्या प्रकल्पाच्या विद्यमान प्रक्रियेबाबत चौकशी केली जाणार आहे. यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
Mumbai Breaking News Live Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात वाद्य कारागिरांचा ‘वाद्यांना’ नवीन साज
Ganeshotsav Decoration 2025 : वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिर…वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा
‘नैना’ च्या नियोजनावरून महसूलमंत्र्यांची नाराजी…
Video: शीव पनवेल महामार्गावर माती खडीतून खड्डे भरण
मराठा आंदोलनासाठी रायगडसह पनवेलमध्ये बैठकांचे सत्र सुरूच
Metro 6 project : मेट्रो-६ च्या बांधकामातील अडथळा दूर; प्रकल्पासाठी ३४ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी
Film On Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपट कात्री न लावताच प्रदर्शित होणार
Devendra Fadnavis: विकसित महाराष्ट्राच्या संकल्पचित्रात जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Prabhadevi Bridge Traffic Closed : प्रभादेवी पुलाचा वाद पुन्हा पेटणार… गणेशोत्सवानंतर प्रभादेवी पुलाचे पाडकाम; १० सप्टेंबरला रात्री पूल वाहतुकीसाठी बंद
Dhruva Sarja: कन्नड अभिनेता ध्रुव सर्जाला तीन कोटी जमा करण्याचे आदेश का?
पवना नदी प्रदूषणाबाबत शासकीय यंत्रणांचीच परस्परविरोधी मते, ‘एनजीटी’चे समिती स्थापन करण्याचे आदेश
भाजपा नेत्यांचं साकडं अन् मुख्यमंत्र्यांचे ओएसडी भेटल्यानंतर मनोज जरांगेंचा मुंबईतील आंदोलनाबाबत मोठा निर्णय
गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करू नये, अशी इच्छा अनेक भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. पाठोपाठ, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली-सराटी येथे जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. या भेटीनंतरही मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. ते म्हणाले, “मी ओएसडींना म्हणाले, आम्हाला मोर्चासाठी एक रस्ता द्या, हजारो रस्ते आहेत. त्यापैकी एक आम्हाला द्या. मी कुठल्याही परिस्थितीत मोर्चावर ठाम आहे. आमच्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, आरक्षण द्या अंमलबजावणी करा. मी उद्या सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज बरोर घेऊन शांततेत निघणार आहे.”
Koyna Dam: कोयना जलाशयातील लॉच, बार्जच्या दुरुस्ती, इंधनासाठी ७८ लाख वितरित
एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १२ प्रश्न रद्द, दोघांचे पर्याय बदलले; काहींच गुणांनी निकाल जाणाऱ्या…
शेतकऱ्यांची जीवावरची कसरत! पुलाअभावी शेतीसाठी जीवघेणा प्रवास…
नाशिकचा तिढा कायम… भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले, संजय सावकारे बुलढाण्यात
ठाण्यातील शाळेत भर गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना परिक्षेचा जाच
विघ्नहर्ता मूर्ती विक्रेत्यांचे विघ्न दूर करणार ?
सावकारेंची उचलबांगडी का झाली? पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री
सावंतवाडी : सालईवाडा येथील श्रींचे आगमन, लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद; स्वातंत्र्यपूर्व काळापासून उत्सव
वान नदीला पूर; काही गावांचा संपर्क तुटला; हनुमान सागर प्रकल्प ७९ टक्के भरला
श्रीलंकेमुळे भारतीय कांदा उत्पादक अडचणीत…
अहिल्यानगर : मोडकळीस आलेल्या शाळाखोल्या, पोषण आहाराला कीड, वीजपंपांच्या चोऱ्या
“मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा”, मनोज जरांगेंना भाजपा नेत्याचं साकडं
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जरांगे मोर्चाने मुंबईत येत आहेत. अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच त्यांना विनंती आहे.”
उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विनाव्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. ही व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी सगळ्यांचेच सहकार्य गरजेचे आहे, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यासाठी देवेंद्रजींचे सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे. देवेंद्रजीनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्रीगणेशा केला होता. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. उध्दव ठाकरे-शरद पवारांच्या सरकारच्या अपयशाने त्यात विघ्न आले व मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. पण देवेंद्रजी अडचणी दूर करीत मार्ग काढत आहेत. अशावेळी हातात हात घालून, समस्यांचा व अडचणींचा एकत्रितपणे सामना करून सामंजस्याने कोणताही प्रश्न सोडविता यावा यासाठी सरकारसमोर दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा, सहकार्याचा हात समोर केला तर समाजाचे प्रश्नही सुटतीलच पण सामाजिक सौहार्दही वाढीस लागेल.”