Maharashtra Maratha Reservation Protest Live Updates: राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वरुणराजाचीही उपस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांना पावसाने झोडपल्याचे चित्र आहे.

याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली आहे. असे असले तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत प्रवेश केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत एवढे लोक मुंबईत आल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे.

यासह राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Mumbai Breaking News Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर. 

13:06 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Mumbai Morcha Live: अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित मनोज जरांगेंच्या भेटीला

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. यानंतर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील आमदार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. बीडच्या गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांची भेट घेतली होती.

12:58 (IST) 29 Aug 2025

“चंद्रावर जाता येते, पण शाळेत कसे जायचे ?” विद्यार्थी बसले उपोषणाला …

लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बूज येथील टोलीवर जवळपास १३ कुटुंब मागील ७० वर्षापासून वास्तव्यास आहेत. वस्तीतील ८ चिमुकले विद्यार्थी येथीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. …वाचा सविस्तर
12:51 (IST) 29 Aug 2025

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : दिग्रस कबड्डीसोबतच ‘ज्यूडो’ची पंढरी!

प्रा. डॉ. कदम यांनी मागील २५ वर्षात कोणतेही शुल्क न आकारता नागपूर अमरावती विद्यापीठाचे अनेक ज्यूडो ‘कलरकोट होल्डर’ तयार केले. …अधिक वाचा
12:39 (IST) 29 Aug 2025

नोकरीचा शोध घेताय? तर तुमच्यासाठी विदेशात मोठी संधी! पाच हजार पदे, दीड लाखावर पगार; १२ उत्तीर्ण उमेदवारांनाही….

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत वाशीम जिल्ह्यातील युवक-युवतींना परदेशात करिअर घडविण्याची एक ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे. …सविस्तर बातमी
12:32 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Mumbai Morcha Live: “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस… “, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर ठाकरे गटाची भूमिका

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनाच्या प्रतिक्रियेवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही. जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारचं काम आहे हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम आहे. अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असेल तर आपण राज्याच्या मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे कोण आहे, तुमच्या सरकारमधीले आहेत की विरोधी पक्षातील आहेत.”

12:31 (IST) 29 Aug 2025

भूकरमापकाना एक लाखाचा लॅपटॉप खरेदीसाठी ९ कोटींच्या निधीला मान्यता

भूमी अभिलेख विभागात सध्या ऑनलाइन पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या ६ हजार ६६ एवढी आहे. त्यापैकी २ हजार १५४ एवढ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप पुरविण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
12:22 (IST) 29 Aug 2025

ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश; आधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे वाचा…

वसतिगृह आणि आधार या दोन्ही योजनांसाठी १ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. …सविस्तर वाचा
12:18 (IST) 29 Aug 2025

कुंभमेळा प्राधिकरणाव्यतिरिक्त समितीची गरज; आढावा बैठकीत संत, महंत, आखाडा प्रतिनिधी यांची नाराजी

बैठकीत आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. कुंभमेळ्यानिमित्त विविध विकास कामे हाती घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. …सविस्तर बातमी
12:15 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Mumbai Morcha Live: आरक्षणावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा: प्रकाश सोळंके

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. यावेळी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेतली. भेटीनंतर मराठा आरक्षणावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आमदार सोळंके यांनी म्हटले आहे.

12:01 (IST) 29 Aug 2025

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या’ आमदाराचीच गडचिरोलीच्या विकासावर वक्रदृष्टी ?… केवळ एका पत्रामुळे कोटयवधींच्या….

१४ ऑक्टोबर २०२४ ला उत्खननासाठी लागणारी पर्यावरणीय मंजुरी (ईसी) आणि ६ जून २०२५ ला उत्खनन चालू करण्याची पूर्वपरवानगी (सीटीओ) देखील या कंपन्यांना मिळाली आहे. जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून देखील पूर्वपरवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. …अधिक वाचा
11:54 (IST) 29 Aug 2025

खडकवासल्यात भाजपबहुल समाविष्ट गावांनी ‘राष्ट्रवादी’ची कोंडी

भाजपने ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असलेल्या भागाला भाजपबहुल समाविष्ट गावांची हद्द जोडून दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची कोंडी केली आहे. समाविष्ट गावांतील नवमतदारांवर भाजप अवलंबून आहे, तर ‘राष्ट्रवादी’ची गावांमधील पारंपरिक मतदारांवर मदार असणार आहे. …अधिक वाचा
11:43 (IST) 29 Aug 2025

‘शालार्थ’च्या कागदपत्रांसाठी मुदतवाढ… आता कधीपर्यंत सादर करावी लागणार?

नागपूर विभागात बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीबाबत नवी कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. …अधिक वाचा
11:39 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan: पूर्वमुक्त मार्ग आंदोलकांनी अडवला, हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates: मुक्त मार्गावरुन आंदोलक आझाद मैदानात जाणार होते. मात्र पुढे तो मार्ग बंद झाला आहे. यामुळे हजारो संतप्त कार्यकर्ते मुक्त मार्गावर ठिय्या मांडून बसले आहेत. …सविस्तर बातमी
11:33 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Mumbai Morcha Live: विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे आमदारही मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदर संदीप क्षीरसागर त्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.

11:28 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.”

त्यांनी पुढे म्हटले की, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.”

“या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!”, असे रोहित पवार आपल्या पोस्टच्या शेवटी म्हणाले आहेत.

10:47 (IST) 29 Aug 2025

मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून मंत्री, आमदार, खासदार दूरच

शुक्रवारी सकाळी नाशिकमधून कालिका मातेचे दर्शन घेऊन मराठे टेम्पो ट्रॅव्हलर व शेकडो मोटारींमधून मुंबईकडे निघाल्याची माहिती करण गायकर यांनी दिली. …सविस्तर बातमी
10:30 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan Live: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल; समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईत

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईत मोठी गर्दी झाली असून, याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत, दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, असे म्हटले आहे.

10:21 (IST) 29 Aug 2025

मनोज जरांगे पाटील आझाद मैदान परिसरात पोहोचले, मराठा आंदोलकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजी

‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान परिसरात दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला. …सविस्तर वाचा
09:42 (IST) 29 Aug 2025
Manoj Jarange Live Updates: फ्री वे रस्त्याचा वापर टाळा, मुंबईकरांना पोलिसांचे आवाहन; मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम

मनोज जरांगे पाटील आज मराठा आंदोलनासाठी मुंबईत आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे याचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फ्री वे चा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

09:20 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Live Updates: अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत. यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सना मलिक यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, “अतिथी देवो भवः ही माझी भूमिका आहे. ते माझ्या मतदारसंघात येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे.”

09:08 (IST) 29 Aug 2025
Manoj Jarange Live Updates: मुंबईत प्रवेश करताच जरांगे पाटलांचे समर्थकांनी केले स्वागत

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाच्या काही तास आधी मुंबईत प्रवेश करताच समर्थकांनी त्यांचे वाशी येथे स्वागत केले.

08:51 (IST) 29 Aug 2025
Manoj Jarange Live Updates: मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत; सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहतूकही विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.

08:36 (IST) 29 Aug 2025
Manoj Jarange Live Updates: मनोज जरांगे यांना विरोधकांसह सत्ताधारी आमदार-खासदारांचाही पाठिंबा

मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान जरांगे यांच्या या उपोषणाला विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार-खासदारांनीही पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत.