Maharashtra Maratha Reservation Protest Updates: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला त्यंना फक्त २९ ऑगस्ट या एका दिवसासाठीच परवानगी मिळाली होती. पण त्यांना आंदोलनासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाले आहे. दरम्यान जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Potest Live Breaking News Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

15:30 (IST) 30 Aug 2025

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, माजी न्यायमूर्तींसह शिष्टमंडळ आझाद मैदानात दाखल

Former High Court Judge Sandeep Shinde : मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य व काही अधिकारी जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. …सविस्तर बातमी
15:19 (IST) 30 Aug 2025

ठाण्यात पालिका निवडणुक तयारीचा राज ठाकरेंनी केला श्रीगणेशा… पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी ठाण्यातील शहराध्यक्ष ते उपशाखाध्यक्षपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याद्वारे निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. …अधिक वाचा
15:08 (IST) 30 Aug 2025

अंमली पदार्थ विक्रीवर ठाणे पोलीसांची मोठी कारवाई; २.३८ कोटींचा मुद्देमाल जप्त

सुमित राजुराम कुमावत (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. …सविस्तर बातमी
14:59 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan मराठा आंदोलकांचे दुसर्‍या दिवशीही पर्यटन; गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट ताज हॉटेलसमोर गर्दी

राज्याच्या कानाकोपर्यातून त्यातही मराठवाड्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. …अधिक वाचा
14:58 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: नागपूरातील संविधान चौकात ओबीसी कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात ओबीसी कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाला केली सुरुवात केली आहे. भाजपा आमदार व ओबीसी नेते आशिष देशमुख साखळी उपोषणा स्थळी दाखल झाले आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची पिवळी टोपी व मफलरसह ते ‘ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणा देताना दिसत आहेत.

14:52 (IST) 30 Aug 2025

Mumbai Traffic News Live Updates: आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरातून प्रवास टाळा; मुंबई ट्राफिक पोलिसांचे आवाहन

“आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे, मोटारचालकांना सीएसएमटी आणि त्याच्या लगतच्या भागातून प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वाहनचालकांनाही विनंती आहे की, त्यांनी जड वाहतुकीमुळे पूर्वेकडील फ्रीवेचा वापर करू नये. पर्यायी मार्गांचा वापर करा”, अशी पोस्ट मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाने एक्सवर केल आहे.

14:48 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : सरकारने अंत पाहू नये: मनोज जरांगे

आझाद मैदानावर उपोषणास बसलेले मराठी आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, “आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे, सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.”

जरांगे हे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

14:35 (IST) 30 Aug 2025

विरार इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क… धोकादायक इमारती रिक्त करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. …सविस्तर वाचा
14:25 (IST) 30 Aug 2025

डोंबिवलीत गणेशभक्तांच्या मारहाणीने मूर्तीकार पळाला; नोंदणीचे पैसे परत करणार

आपणास काही गणेशभक्तांनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार वाढण्याची भीती विचारात घेऊन आपण कारखान्यातून निघून गेलो, अशी कबुली पळून गेलेले मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांनी विष्णुनगर पोलिसांना दिली आहे. …सविस्तर वाचा
14:10 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest मराठा आंदोलकांची लोकलकडे धाव; लोकलमध्ये तुडुंब गर्दी

लोकलमध्ये मराठा आंदोलकांनी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे शनिवार असूनही मध्य व हार्बर मार्गावरील गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. …वाचा सविस्तर
14:06 (IST) 30 Aug 2025

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”

Raj Thackeray on Maratha Protest : राज ठाकरे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील मागील वेळेस नवी मुंबईत आले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवलं असं सांगितलं जात होतं.” …अधिक वाचा
14:00 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: कोणाच्याही आरक्षणावर गदा न आणता मराठ्यांना आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही : काँग्रेस खासदार नामदेव किरसान

काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांची नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शविला. त्यांनी यावेळी म्हटले की, कोणाच्याही आरक्षणावर गदा न आणता आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही. मात्र जरांगे पाटील ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. परतु धनाढ्य जातीचा समावेश ओबीसीमध्ये झाला तर खरे मागासलेले ओबीसी त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मराठा समजाला आरक्षण द्यावे मात्र दुसऱ्याच्या कोट्यातून देण्यात येऊ नये.

13:46 (IST) 30 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025 : बदलापूरातील मातृत्वाची गाथा सांगणारा देखावा…

Maharashtra Ganesh Utsav 2025 Celebrations : मातृत्वाची गाथा सांगणारा देखावा बदलापूरात साकारण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
13:35 (IST) 30 Aug 2025
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “जरांगे पाटील मुंबईत का आले, याचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मुंबईमध्ये आले आहेत. यावर बोलताना राज ठाकरे यांनी असे म्हटले की, मराठा आरक्षण या संपूर्ण विषयावर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच उत्तर देऊ शकतात. यापूर्वी देखील ते नवी मुंबईला मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठा समाजाला भेटीला गेले होते. तेथे १० टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी दिले होते. तरी सुद्धा हे संपूर्ण आंदोलनकर्ते मुंबईत का आले आहेत, याचे उत्तर फक्त एकनाथ शिंदे देऊ शकतात.

13:31 (IST) 30 Aug 2025

पूर्वमुक्त महामार्गावरील वाहतूक ठप्प, गाड्यांची लांबच लांब रांग

लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई, ठाणे व पनवेलला जोडणाऱ्या पूर्वमुक्त महामार्गावर झाला आहे. …सविस्तर बातमी
13:25 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: आरक्षण देणे हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे त्यांनी आश्वासन दिलंय : आमदार शशिकांत शिंदे

मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांकडून बोललं जातंय. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आरक्षण देणे हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे. आश्वासन त्यांनी दिलं होतं असं शिंदे यांनी म्हटलंय. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही आरक्षण लागू करू असं आश्वासन त्यांनी दिल होतं, आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं असा सवाल त्यांनी केला. सोबतच राज्यात आणि केंद्रात तुमचं बहुमत आहे आरक्षणाच कोठा वाढून देता येतो का? तसेच तुम्ही दिलेला आश्वासनाची पूर्तता करता येते का? हे पहावं असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा असा टोला त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचीच काय तर संपूर्ण राज्याची पहिल्यापासून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका असल्याचे शिंदे यांनी म्हटल आहे.

13:24 (IST) 30 Aug 2025

Ganeshotsav2025 : ठाण्यातील या पाच गणेशोत्सव मंडळांना नक्की भेट द्या..

Maharashtra Ganesh Utsav 2025 Celebrations : गणेशभक्तांसाठी ठाणे शहरात देखील असे काही मंडळे आहेत की जिथे मोठमोठ्या उंचीच्या मूर्ती आणि आणि सुरेख अशा देखाव्यांमुळे या मंडळांचा नावलौकिक आहे. …सविस्तर बातमी
13:14 (IST) 30 Aug 2025

“सरकारला झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही…”, लक्ष्मण हाकेंचा इशारा; लाँगमार्च, संघर्षयात्रा, उपोषणासह वेगवेगळी तयारी

Laxman Hake : लक्ष्मण हाके म्हणाले, बऱ्याचदा भटक्या विमुक्तांना जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहा महिने लागतात आणि इथे सरकारच जातप्रमाणपत्र वाटत आहे. …वाचा सविस्तर
13:05 (IST) 30 Aug 2025

Maharashtra Live News: आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एजंटच्या लगावली कानशिलात, महिला अधिकाऱ्यासह एजंटवरही गुन्हा दाखल

काही आठवड्यांपूर्वी बुलढाणा आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एका एजंटला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या अधिकारी महिलेचा प्रताप समोर आला आहे. महिला अधिकारी त्याच एजंटला कानशिलात लगावत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत यामुळे आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरटीओ एजंट च्या तक्रारीवरून महिला अधिकारी राजश्री चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर राजश्री चौधरी यांनी सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरटीओ एजंट इम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

12:51 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलन दुसरा दिवसातही चिखलात; मिळेल तिथे आसरा…

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलच चिखल झाला होता. त्यामुळे आंदोलकांचा दुसरा दिवसही चिखलातही जाणार आहे. …वाचा सविस्तर
12:44 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : मनोज जरंगे पाटील यांना रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा

“मराठवाडा मराठा मेडिकल असोसिएशनच्या वतीने, मनोज जरंगे पाटील यांना एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी नियमितपणे करणार आहोत”, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली.

12:34 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलनात शहरी, पांढरपेश्यांनी फिरवली पाठ; श्रमिक रस्त्यावर, प्रस्थापित समाजमाध्यमावर

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : श्रमिक रस्त्यावर, पांढऱपेशे समाजमाध्यमावर असे चित्र दिसून येत आहे. …अधिक वाचा
12:32 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: अहंकार बाजूला ठेवून विरोधी पक्षांसह सर्व नेत्यांसह मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घ्यायला हवी: ठाकरे गट

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबाणीचं केली असच म्हणावं लागेल. फडणवीस म्हणतात आंदोलनावर कोणी पोळी भाजू नये पण कोण भाजतंय? आपली राजकीय इच्छा शक्ती असती तर एक दिवसात आरक्षण देऊ शकला असता. आपली राजकीय ईच्छा शक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करायला हवी, सर्वांना एकत्रित घेऊन जरांगे पाटील यांची भेट घायला हवी.”

12:19 (IST) 30 Aug 2025

पुनर्विकासाला विरोध केल्यास रहिवाशाचे सदस्यत्व रद्द? शिफारशीमुळे रहिवाशांमध्ये नाराजी

स्वयंपुनर्विकासाबाबत विविध सूचना करण्यासाठी राज्य शासनाने विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती. या अभ्यास गटाने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. …अधिक वाचा
12:09 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: वाशी खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मुंबईत वाशी खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले असल्यामुळे वाशी पुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याचा सवसामान्यांना फटका बसत आहे. तर वाशी टोलवरून अवजड वाहने नवी मुंबईच्या दिशेने पुन्हा माघार फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

12:05 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange : “फक्त मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तर…”, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांसह बीएमसीच्या आयुक्तांनाही दिला इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे. …वाचा सविस्तर
11:52 (IST) 30 Aug 2025

ठाकरेंचे माजी नगरसेवक शिंदेसेनेत; आगामी पालिका निवडणुकीत फायदा होणार

उबाठा गटाचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांनी औपचारिकरित्या पक्ष प्रवेश केला. …वाचा सविस्तर
11:38 (IST) 30 Aug 2025
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: माझा मराठा समाजाला पाठिंबा: खासदार नागेश पाटील आष्टीकर

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा दिला असून, “मी सुद्धा मराठा समाजाचा व्यक्ती आहे आणि माझा मराठा समाजाला पाठिंबा आहे”, असे खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

11:35 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आंदोलनासाठी सकल मराठा संस्था नवी मुंबईतर्फे रोज अन्न धान्याची सोय

नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटर येथे थांबलेल्या मराठा आंदोलकनासाठी सकल मराठा संस्था नवी मुंबईतर्फे टेम्पो भरून भाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे नवी मुंबईमध्ये थांबलेले आहेत त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून जेवणासाठी लागणाऱ्या भाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

11:20 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक; अडवला रस्ता

नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने पाणी बंद केले, हॉटेल्स बंद ठेवायला लावल्याचे आरोप करत, त्यांनी अडवला रस्ता आहे. जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.