Maharashtra News Updates, 28 October 2025 : “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर मजबूत आहे आणि आमचा पक्ष राज्यात ताकदीने उभा आहे”, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) व्यक्त केलं. यावरून आता विरोधकांनी म्हटलं आहे की “भाजपाला आता कुबड्यांची म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही.” शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “अजित पवार व एकनाथ शिंदेंमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता सरकारमधून बाहेर पडायला हवं.”
दुसऱ्या बाजूला, “कुबड्या म्हणजे मित्र नव्हे”, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
भाजपाचा आता बारामतीकडे मोर्चा : रोहित पवार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीच्या आदेशांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की भाजपाने आता बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. कदाचित हा त्यांचा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे.
जैन बोर्डिंगच्या जमिनीचं प्रकरण : “गोखले बिल्डर्सचे २३० कोटी रुपये गोठवावे”, धंगेकरांची मागणी
दरम्यान, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहाराचं प्रकरण अजूनही चर्चेत आहे. याप्रकरणी गोखले बिल्डरने व्यवहार रद्द केला असला तरी सदर विषय लावून धरणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “सदर व्यवहारात गोखले बिल्डरने केलेल्या करारात म्हटलं आहे की कोणीही माघार घेतल्यास संबंधित रक्कम परत देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली २३० कोटी रुपये ही रक्कम गोठवली जावी. तसेच या जमिनीचा व्यवहार करणाऱ्या बोर्डिंगच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना बरखास्त करावं.”
तसेच या प्रकरणी धंगेकर आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेणार आहेत. या विषयीच्या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. तसे राज्यातील इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Video : आचोळे रुग्णालयाच्या सर्वेक्षणा दरम्यान भाजप – बविआत वाद
Bandi Prakash: नक्षलवादी चळवळीला आणखी एक मोठा हादरा; वरिष्ठ नेता बंडी प्रकाश तेलंगणा पोलिसांना शरण
बच्चू कडू मोर्चा : नागपुरातील मुख्यमंत्री निवासासमोर संचारबंदी सदृश्य स्थिती
“भाजपाचं ऑपरेशन लोटस २.० सुरू, २०२९ पर्यंत…”, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “अजित पवारांचे आमदार…”
भारतामध्ये वाढता अँटिबायोटिक्सचा अतिरेक वापर! ‘एएमआर’ संकटाला खतपाणी…
Nashik Crime : पी.एल.ग्रुपविरुध्द मकोका कारवाई
Eastern Expressway Traffic: मोर्चामुळे महामार्गावर कोंडी
‘आपला दवाखाना’ ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश; डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना मिळणार दोन दिवसांत थकीत वेतन
डोंबिवलीतील ७३ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक करणार महाराष्ट्रात ३,१२५ किलोमीटरचे पदभ्रमण; पदभ्रमणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शिक्षक समितीचा ‘टीईटी’साठी सरकारला ‘अल्टिमेटम’, न्यायालयात याचिका दाखल न झाल्यास…
पेंच व्याघ्रप्रकल्पालगत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
कडोंमपातून दुहेरी आर्थिक लाभ घेणाऱ्या फार्मासिस्ट शिरपूरकरच्या अडचणी वाढल्या; अहवाल वरिष्ठांना सादर, बडतर्फीची आयुक्तांकडे मागणी
अबब.. ठाण्यातील नाल्यात आढळला भलामोठा अजगर
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “स्टेजवर इकडून तिकडे…”
शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) मतचोरीवरून राज्य सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी देखील मोठ्या स्क्रीनवर सादरीकरण करत काही कथित पुरावे सादर करत राज्यात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. राहुल गांधी स्टेजवर इकडून तिकडे येरझऱ्या मारत असतात. अगदी तशाच गोष्टी करायची गरज नाही. मी आदित्य ठाकरे यांना थोडंफार ओळखतो. त्यावरून मी त्यांना सांगेन की तुम्ही पप्पू बनू नका. मी त्यांना पप्पू म्हणत नाहीये. परंतु, त्यांनी पप्पू बनूही नये.”
