Shivsena MLA Disqualification Verdict Live: गेल्या ८ ते १० महिन्यांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाची अवघ्या राज्याला प्रतीक्षा होती. या निकालावरून शिंदे गट व ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या ८ महिन्यांत राजकीय सुंदोपसुंदी पराकोटीला पोहोचली. अखेर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या या सुनावणीचा निकाल राहुल नार्वेकरांनी सविस्तरपणे मांडला असून प्रामुख्याने ६ निर्णयांचा त्यांनी आपल्या निकालात अंतर्भाव केला आहे.

राहुल नार्वेकरांचा अंतिम निकाल…

१. शिंदे गट खरी शिवसेना आहे.

२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.

३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.

४. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.

५. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.

६. शिंदे गटानं दाखल केलेली ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणीही फेटाळली जात आहे.

Live Updates

Shivsena 16 MLA Disqualification Verdict Live Today, 10 January 2024: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला!

12:45 (IST) 10 Jan 2024
जामिनावरील सुनावणीवेळी सुधाकर बडगुजर अनुपस्थित; पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश

नाशिक: भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यात जामीन नियमित करण्यासाठीच्या सुनावणीवेळी संशयित शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य दोघे न्यायालयात उपस्थित नसल्याने सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदविला.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 10 Jan 2024
तोतया सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव; राकेश रोशन यांच्यासह अनेकांची फसवणूक; तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मुंबई: तोतया सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून अभिनेता आणि चित्रपट निर्माता राकेश रोशन यांच्यासह अनेकांची फसवणूक केल्याच्या आरोपात विशेष न्यायालयाने मंगळवारी अपंग आरोपीला दोषी ठरवले.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 10 Jan 2024
दहावी व बारावी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा शिक्षण संस्थांचा इशारा

मुंबई: शाळेमध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसंबंधी जाचक अटी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, २००४ पासून २०१३ पर्यंतचे वेतनेत्तर अनुदानाची थकीत रक्कम मिळणे असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय, शासकीय शाळा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीद्वारे खाजगी उद्योगांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, मागण्या मंजूर न झाल्यास दहावी व बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा या संस्थांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: मुख्यमंत्री दौऱ्यावर रवाना

शिवसेना अधिकृत पक्ष आम्हाला निवडणूक आयोगाने दिला आहे. धनुष्यबाण चिन्हही आम्हाला दिलं आहे. विधानसभेत ६७ टक्के बहुमत आमच्याकडे आहे. लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. म्हणजे त्यांचे आमदार अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते, तेव्हा आम्ही त्यावर काही आक्षेप घेतला का? माझ्याकडे अध्यक्ष दिवसाच्या उजेडात आले. लपून आले नाहीत. तेही आमदार आहेत. त्यांची मतदारसंघातली कामं, इतर विषय यासंदर्भात बोलण्यासाठी अधिकाऱ्यांसह अधिकृत बैठक झाली. आम्ही लपून बैठका करत नाही. त्यांच्या बाजूने निकाल लागला की ती संस्था चांगली असते. त्यांच्याविरोधात निकाल लागला तर त्या संस्थेवर ते टीका करतात. त्यामुळे मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

11:55 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: निकालाच्या बाबतीत दोनच शक्यता – सरोदे

अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर.तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील – असीम सरोदे

11:42 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: संजय राऊतांचं सूचक भाष्य

मॅचफिक्सिंग आहे की नाही हे आज चार वाजता कळेल! पण जनता काय न्याय करणार हे गद्दारांनी उद्धवसाहेबांचं सरकार पाडलं तेव्हाच निश्चित झालंय! उलटी गिनती सुरु आहे.. – संजय राऊत

11:36 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: उज्ज्वल निकम यांचं भाष्य…

आजच्या निकालाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाहीत ज्या कारणासाठी दहावं परिशिष्ट आणण्यात आलं, घोडाबाजार-आमदारांची पळवापळवी आणण्यासाठी ते आणलं गेलं. हा उद्देश आज सफल झालाय का? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निकाल देताना विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला. लोकशाहीत संकेत असतात की आधारस्तंभांनी एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करू नये. या तत्वाचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आजच्या निर्णयातला ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवला जाईल. पूर्ण निकाल यायला वेळ लागेल. पण आज हे स्पष्ट होईल की कोण जिंकलं आणि कोण हरलं. त्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे दहाव्या परिशिष्टाचा अर्थ अध्यक्ष कसा लावतात. कारण दहाव्या परिशिष्टासाठी देण्यात येणाऱ्या अपात्रतेच्या नोटीसमध्ये कोणती कारणं विषद करण्यात येत आहेत आणि व्हिपच्या नोटीसमध्ये तसा उल्लेख आहे का? हेही अध्यक्षांना स्पष्ट करावं लागणार आहे. काही याचिका तांत्रिक कारणामुळेही अध्यक्ष फेटाळू शकतात – उज्ज्वल निकम

11:10 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: …तर आपल्याला नागरीक म्हणून विचार करावा लागेल… – आदित्य ठाकरे

मी पहिल्यांदाच ऐकतोय की अध्यक्ष स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटतायत. त्यांनी कुठली बैठक लावली असती, फोन केले असते .. पण हा न्याय फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, अध्यक्ष कोणते नियम पाळतात, हे दर्शवणारा असेल. निकाल वेगळा आला किंवा संभ्रम निर्माण करणारा आला, तर भाजपाचं संविधान यात दिसून येईल. निकाल जर आमच्याविरोधात केला, तर आपल्याला नागरिक म्हणून या सगळ्याचा विचार करावा लागेल – आदित्य ठाकरे</p>

10:34 (IST) 10 Jan 2024
राज्यातील नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दंत प्राध्यापकांची पदे मंजूर; राज्यसरकारकडून सुधारित आकृतीबंध निश्चित

मुंबई : राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथील नागरिकांनाही उत्तम प्रकारे दंतोपचार मिळू शकणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या जिल्ह्यांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि दंतशल्यचिकित्सक पदे मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि दंतशल्यचिकित्सक पदे मंजूर करण्यासाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

10:19 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: राहुल नार्वेकरांची निकालाआधी सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…

निकाल कायद्याला धरून असेल. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारावर हा निकाल असेल. या निकालातून सगळ्यांना न्याय मिळेल. दहाव्या परिशिष्टाबाबत काही गोष्टींचा परामर्श घेणं आवश्यक होतं. त्या बाबींचाही या निकालात आढावा घेण्यात आला असेल. त्यामुळे हा निकाल म्हणडे नक्कीच बेंचमार्क ठरणारा असेल. यात कोणत्याही त्रुटी असणार नाहीत – राहुल नार्वेकर

10:14 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: “…म्हणून उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली”, निकालाआधीच शिंदे गटाच्या आमदारांचं सूचक विधान!

“निर्णय काहीही लागला तरी हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहे. त्यामुळे…”

वाचा सविस्तर

09:41 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: ठाकरे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

सुनील राऊत

नितीन देशमुख

कैलास पाटील

अजय चौधरी

सुनील प्रभू

रवींद्र वायकर

भास्कर जाधव

राजन साळवी

वैभव नाईक

राहुल पाटील

उदयसिंह राजपूत

रमेश कोरगावकर

संजय पोतनीस

प्रकाश फातर्पेकर

09:41 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: शिंदे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

संदीपान भुमरे

संजय शिरसाट

तानाजी सावंत

यामिनी जाधव

चिमणराव पाटील

भरत गोगावले

लता सोनावणे

प्रकाश सुर्वे

बालाजी किणीकर

अनिल बाबर

महेश शिंदे

संजय रायमुलकर

रमेश बोरनारे

बालाजी कल्याणकर

09:36 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: “…तर आम्ही अपात्र ठरू”, आदित्य ठाकरेंची राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत प्रतिक्रिया; म्हणाले, “दीड वर्षं खेचल्यानंतर…!”

आदित्य ठाकरे म्हणतात, “भारतात लोकशाही टिकणार की नाही? यासाठी सगळ्या जगाचं लक्ष महाराष्ट्रावर आहे. हे स्वत:चं…!”

वाचा सविस्तर

09:32 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: ..तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील – अनिल देशमुख

संकेतांनुसार अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत. निकाल द्यायच्या आधी तुम्ही तिथे जाता, तर काय त्यांच्याकडून सल्ला घ्यायला गेला होतात का? कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला, तर १०० टक्के शिंदे गटातले आमदार अपात्र ठरतील – अनिल देशमुख</p>

09:29 (IST) 10 Jan 2024
Maharashtra News Live: दीपक केसरकरांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया…

राज ठाकरे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रिकेटपटू घडवले. त्यांची आठवण म्हणून शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे. ही संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून मी लवकरच निर्णय घेईन – दीपक केसरकर

09:28 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: निकालाआधी शिंदे गटाच्या मंत्र्यांची सूचक प्रतिक्रिया…

सत्यमेव जयते ही माझी प्रतिक्रिया आहे. आमची बाजू सत्याची आहे. यावर खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे. देशात लोकशाही आहे, तशी पक्षातही लोकशाही असण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षात लोकशाही प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यता मिळत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जी पक्षाची घटना बनवली, त्यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकशाहीपूरक बनवण्यात आली. नंतर त्या घटनेत बदल करण्यात आला. त्यानुसार आपणच लोकांना नियुक्त करायचं आणि त्यांनी आपल्यालाच निवडून आणायचं असं स्वरूप होतं. त्या बदलांना निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यात आली नव्हती. जेव्हा निवडणूक आयोगासमोर ते सादर करण्यात आलं, तेव्हा आयोगानं ते नाकारलं आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीच्या आधारे जे काही निर्णय घेतले, ते अवैध ठरतात अशी भूमिका आम्ही मांडली आहे – दीपक केसरकर

09:14 (IST) 10 Jan 2024
Maharashtra News Live: मुंबईत घडामोडींना वेग…

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची प्रतीक्षा असताना मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

09:10 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: निकालाबाबत मुख्यमंत्री इतकंच म्हणाले की…

एकनाथ शिंदे म्हणतात, “आम्ही कोणत्याही प्रकारे नियम सोडून काम केलेलं नाही. हे सरकार नियमाने स्थापन झालेलं आहे. त्यामुळे…!”

वाचा सविस्तर

08:55 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: निकालाआधी मंत्रिमंडळाची बैठक

राहुल नार्वेकर संध्याकाळी ४ वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देणार असून त्याआधी सकाळी १० च्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

08:52 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: विश्लेषण: ..तरीही घटनात्मक पद भूषविता येते का ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

वाचा सविस्तर

08:51 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: “…तेव्हा मी ठाम होतो”, आमदार अपात्रतेवर नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य; म्हणाले, “मी महाविकास आघाडीत…”

एकनाथ शिंदे अपात्र ठरलेच तर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करून त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

वाचा सविस्तर

08:41 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: ४ वाजता निकालाचं वाचन

शिवसेना आमदा अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं संध्याकाळी ४ वाजता वाचन सुरू होईल, असं सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील.

08:40 (IST) 10 Jan 2024
Shivsena MLA Disqualification Verdict Live: रात्रीच्या घडामोडी, दिवसा काय होणार?

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार असून त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. निकालाच्या एक दिवस आधी राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर निकालाच्या आदल्या दिवशी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप तपशील मिळू शकलेला नाही.

राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. (Loksatta Graphics)

Shivsena 16 MLA Disqualification Verdict Live Today, 10 January 2024: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष!