Raj Thackeray-Uddhav Thackeray Rally Highlights: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.
वरळी येथील सभेचे सर्वकाही अपडेट्स जाणून घ्या, एका क्लिकवर…
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: मराठी म्हणून एकत्र आलात, आता तुम्हाला जातीमध्ये विभागले जाईल – राज ठाकरे
मराठी म्हणून तुम्ही लोक एकत्र आल्यानंतर तुम्हाला जातीमध्ये विभागले जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मीरा रोड येथे मारहाण झाली, तो गुजराती होता, हे कुणालाही माहीत नव्हतं. बाचाबाचीत एका व्यक्तीला मारलं, तो गुजराती होता म्हणून मारलेलं नाही. अजून आम्ही काहीच केलेले नाही.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, लालकृष्ण आडवाणीही इंग्रजी शाळेत शिकले – राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, असा युक्तिवाद सत्ताधारी करत आहेत. त्यांच्या या दाव्याला काही अर्थ नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, पण त्यांच्या मराठी अभिमानाद्दल कुणाला संशय आहे का? तसेच लालकृष्ण आडवाणी मिशनरी हायस्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वाबद्दल कुणाला शंका आहे का? असे राज ठाकरे यांनी म्हटले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी भाषेला हात घातला – राज ठाकरे
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधी भाषेला हात घातला. यांनी चाचपडून पाहिले. पण विरोध झाल्यानंतर मागे हटले. परत मराठी भाषेला हात लावून दाखवा असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: हिंदी बोलणारी राज्य आर्थिक मागास, हिंदी न बोलणारे राज्य प्रगत – राज ठाकरे
हिंदीची सक्ती कशाला करता? असे विचारताना राज ठाकरे म्हणाले की, हिंदी बोलणारे राज्य मागास आहेत आणि हिंदी न बोलणारे राज्य प्रगत आहेत. मग आम्ही हिंदी शिकून असा काय विकास होणार आहे?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: हिंदी कुणासाठी आणि कशासाठी, लहान मुलांवर सक्ती कशाला? – राज ठाकरे
हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: जे बाळासाहेबांना जमलं नाही, देवेंद्र फडणवीसांना जमलं, एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
राज ठाकरे म्हणाले की, आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची जोरदार सुरुवात केली.
“फडणवीसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणतायत”, ‘जय गुजरात’वरून ठाकरे गटाचा मोठा दावा
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: सु्प्रिया सुळे, महादेव जानकर हेही विजयी सभेला उपस्थित
वरळी येथील विजयी सभेला इतर पक्षाचेही काही नेते उपस्थित राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे, रासपचे महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर असे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत.
ठाकरे बंधूंच्या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही नेत्यांना माननारे समर्थक आले आहेत. एका गुजराती व्यक्तीनंही या सभेला हजेरी लावली असून “मी कट्टर हिंदू आहे, मी गुजराती आहे”, असा फलक हातात दाखवत मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागणार, असे म्हटले आहे.
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: वरळीत विजयी मेळाव्यासाठी जय जवान पथक दाखल
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी प्रसिद्ध दहीहंडी पथक ‘जय जवान’ पथक वरळी डोम येथे मानवी मनोरा रचून या विजयी सभेला सलामी देत आहे.
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: १९ वर्ष उशीर झाला, पण आता एकत्र येतोय याचा आनंद; कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना
वरळी डोम येथे ठाकरे बंधूंच्या एकत्रित विजयी सभेसाठी कार्यकर्ते सकाळपासूनच येऊ लागले आहेत. यावेळी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले की, १९ वर्ष लागले पण अखरे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आता त्यांनी भाजपाला धडा शिकवावा, अशाही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: सत्तेसाठी एकनाथ शिंदे शायरी काय मुजराही करतील – संजय राऊत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसाठी शेर ऐकवून दाखवला होता. याबाबत शिवसनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सत्तेसाठी शिंदे शेर-शायरीच काय तर मुजराही करतील.
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच – संदीप देशपांडे
मराठीचा अपमान कुणी करत असेल तर त्याच्या कानाखाली पडेलच, असे विधान संदीप देशपांडे यांनी केले आहे. वरळी येथील सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
“एखादी भाषा येत नाही म्हणून त्रास देणं, धमकावणं…”, मनसे-ठाकरे गटाच्या आंदोलनांवर रामदास आठवलेंचा संताप
एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर पक्षाचं स्पष्टीकरण; म्हणाले, “गुजरात पाकिस्तान आहे का? आम्ही केवळ…”
Raj -Uddhav Thackeray Rally Live Updates: सुशील केडियाच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
व्यावसायिक सुशील केडियानं सोशल मीडियावर पोस्ट करत मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर बातमी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)