Maharashtra Rain News 17 June 2025 : कोचीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर या विमानाचे नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग सकाळी करण्यात आले. नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे एअरपोर्टवर काही वेळ एकच पळापळ आणि गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, गेल्या वीस मिनिटापूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरलं आहे.

दरम्यान . मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 17 June 2025

22:12 (IST) 17 Jun 2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला माऊलींच्या अश्वराजांची अनोखी मानवंदना

अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. …अधिक वाचा
20:22 (IST) 17 Jun 2025

रस्ते कॉंक्रीटीकरणाची ४९ टक्के कामे पूर्ण, सुरुवात केलेल्या कामापैकी निम्मी कामे पूर्ण

रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. …सविस्तर बातमी
19:54 (IST) 17 Jun 2025

मुंबईत जूनच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. …अधिक वाचा
18:30 (IST) 17 Jun 2025

गडचिरोलीतील विमानतळाच्या भूसंपादनाला हायकोर्टात आव्हान, ‘पेसा’ नियमाचे उल्लंघन…

शहरात प्रस्तावित विमानतळाचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला असून याप्रकरणी याचिका दखल करीत पुलखल ग्रामसभेने भूसंपादनाला आव्हान दिले आहे. …सविस्तर बातमी
17:41 (IST) 17 Jun 2025

फेसबुकवर बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक…स्वस्त घराच्या मोहापोटी १ कोटी रुपये गमावले…

या भामट्यांच्या जाळ्यात सापडलेल्या फिर्यादीने तब्बल २५० वेळा ऑनलाईन व्यवहार करून ही रक्कम दिली होती. सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. …सविस्तर वाचा
17:23 (IST) 17 Jun 2025

आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी, ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ उपक्रम नेमका काय आहे?

‘टेकफेस्ट’च्या ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेकफेस्ट आणि स्वतःच्या महाविद्यालयातील एक दुवा म्हणून काम करावे लागणार आहे. …सविस्तर बातमी
17:21 (IST) 17 Jun 2025

‘मेट्रो १’च्या आठ फेऱ्या वाढवल्या, दिवसाला आता ४४४ ऐवजी ४५२ फेऱ्या; घाटकोपर – अंधेरी शटल सेवा मात्र बंद

शटल सेवा सुरू करूनही कार्यालयीन वेळेतील गर्दी कमी होत नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे शटल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती एमएमओपीएलमधील सूत्रांनी दिली. …अधिक वाचा
17:17 (IST) 17 Jun 2025

वारकऱ्यांना पथकरात सूट; आषाढी एकादशीनिमित्त एसटीला पथकर माफी

‘आषाढी एकादशी २०२५’, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत. …सविस्तर बातमी
16:56 (IST) 17 Jun 2025

एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर, एक हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड, अडीच लाख रुपये दंड वसूल

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी पथकातील २८ कर्मचारी, आरपीएफचा एक जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे २ जवान आणि कांदिवली रेल्वे स्थानकातील १७ कर्मचारी अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला होता. …वाचा सविस्तर
15:46 (IST) 17 Jun 2025

सायकलप्रेमींना परिवहन विभागाचा मोठा दिलासा…परिवहन आयुक्तांनी जारी केले परिपत्रक

सायकल कॅरीअरद्वारे सायकली वाहून नेण्यात येत असतील तर त्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. …सविस्तर बातमी
15:22 (IST) 17 Jun 2025

वांद्रे येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत चाळीवर कोसळली; एकाच घरातील दोन तरुणी जखमी

कोमल येवले (२५ वर्षे) आणि प्रणिता येवले (२८ वर्षे) अशी या दोघींची नावे असून त्यापैकी कोमलची प्रकृती गंभीर आहे. …सविस्तर वाचा
15:12 (IST) 17 Jun 2025

नागपूर : शेतकऱ्यांच्या नावावर १४५ कोटींचा कर्ज घोटाळा…

शेतकऱ्यांना कर्ज फेडीसाठी बँकाकडून नोटीस मिळाल्यावर हे प्रकरण पुढे आले. …सविस्तर बातमी
15:06 (IST) 17 Jun 2025

जुहूच्या उच्चभ्रू वस्तीतील हुक्का पार्लरवर छापा, ४५ जणांवर कारवाई

जुहूतील ‘टिल नेक्स्ट टाईम’ हुक्का पार्लरवर रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत तंबाखूजन्य हुक्काचा बेकायदेशीर वापर करत असलेल्या व्यवस्थापक, कर्मचारी आणि ४५ ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. …सविस्तर वाचा
14:34 (IST) 17 Jun 2025

तब्बल २७ वर्षानंतर सत्र न्यायालयाकडून आरोपीला शिक्षा, मात्र २७ दिवसांतच उच्च न्यायालयाकडून स्थगिती…

तारीख ३० ऑक्टोबर, वर्ष १९९८, म्हणजेच २७ वर्षापूर्वी एक गुन्हा घडतो. याबाबत दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९९८ रोजी नागपूर पोलिसांनी तक्रार दाखल होते. …सविस्तर बातमी
14:23 (IST) 17 Jun 2025

Sharad Pawar: “गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा”, शरद पवारांची कार्यकर्त्यांना साद

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आज शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवड मध्ये मेळावा घेतला. …सविस्तर वाचा
14:15 (IST) 17 Jun 2025

विदर्भातील वाघ व जंगल पर्यटनाचे ब्रँडिंग माल्टा देशात… विदेशी शिष्टमंडळ म्हणाले…

असोसिएशन फाॅर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूरतर्फे नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी माल्टाच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. …सविस्तर वाचा
13:56 (IST) 17 Jun 2025

बॉम्ब ठेवल्याचा फोन, नागपूर येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर नागपुरात विमानाचे लँडिंग करवण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता सध्या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:56 (IST) 17 Jun 2025

13:03 (IST) 17 Jun 2025

मालमोटर अडवून साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना अटक

आठ लाखाचे साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना पकडण्यात हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. …वाचा सविस्तर
12:44 (IST) 17 Jun 2025

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू ! छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीतील घटना

छत्रपती संभाजीनगरजवळील चिकलठाणा येथील घटनेतील दोन मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश आहे. …अधिक वाचा
12:33 (IST) 17 Jun 2025

Video : ताडोबातील झायलोचा पाण्यातच मुक्काम, उकाडा सहन होईना…

पावसाळा सुरू झाला तरी विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस नाही. मान्सूनने जवळजवळ राज्य व्यापले असले तरीही पावसाची कृपादृष्टी नाहीच. …सविस्तर बातमी
12:26 (IST) 17 Jun 2025

एसटी कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले चिंताजनक, रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होईल का ?

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, नुकत्याच यवतमाळ, सोलापूर आणि संभाजीनगर येथे घडलेल्या घटनांमुळे वाहक व चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. …सविस्तर वाचा
12:11 (IST) 17 Jun 2025

अकोला : भरपावसाळ्यात पाणीकपात! आता सात दिवसाआड पाणीपुरवठा; नेमकं कारण काय…

अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणी पातळीत घट झाली. त्यामुळे शहरात आता सहाऐवजी सात दिवसाआड पाणीपुरवठा होईल. …वाचा सविस्तर
11:53 (IST) 17 Jun 2025

मागील १५ दिवस दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन; पुढचे काही दिवस राज्यात ‘या’ भागांत मुसळधार

यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर साधारण शनिवारपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला. …सविस्तर बातमी
11:51 (IST) 17 Jun 2025

सोलापुरात शाळा प्रवेशाचा उत्सव; आमदारांपासून ते जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडून स्वागत

सकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूरजवळील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पोहोचले. …सविस्तर बातमी
11:38 (IST) 17 Jun 2025

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहणार? न्यायालयाकडून लवकरच निर्णय…

फडणवीस व इतरांनी याचिकांवर घेतलेले आक्षेप निराधार आहेत. याचिकांवर वेगात कार्यवाही होऊ नये, हा त्यांचा उद्देश आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. …अधिक वाचा
11:34 (IST) 17 Jun 2025

मुक्काम साध्या हॉटेलात… बिले पंचतारांकित हॉटेल्सची… कंपनीच्या व्यवस्थापकाने उकळले लाखो रुपये

देशात आणि परेदशात कंपनीच्या कामानित्ताने विक्रीसाठी जाणे, ऑर्डर मिळवणे अशा प्रकारची कामे कलगुडे करीत होता. दौर्यावर असताना प्रवास भाडे, हॉटेलातील मुक्काम, तसेच जेवणाचे पैसे कंपनीतर्फे दिले जात होते. …सविस्तर बातमी
11:26 (IST) 17 Jun 2025

चंद्रपूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानात तांदूळ तस्करीचे रॅकेट

रहमतनगर बिनबा गेट येथे वाहन क्रमांक (एम.एच. ३४ बी.झेड. २४२८) या वाहनातुन अवैधरीत्या तांदु‌ळाची वाहतुक होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. …अधिक वाचा
11:21 (IST) 17 Jun 2025

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी… धरणसाठ्यात वाढ… पाणीसाठा ९.७८ टक्क्यांवर…

यंदा पाऊस लवकर आला असला तरी धरणक्षेत्रात पावसाने जोर धरला नव्हता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालवतच होता. …अधिक वाचा
11:18 (IST) 17 Jun 2025

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती, मंत्री आणि अधिकारी…

रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली. …सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे