Pune Latest News Today 15 July 2025 : मुंबईत मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली. तर पुण्यातील तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

तेव्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर तसंच मुंबई महानगरातील, पुणे – नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Mumbai Nagpur   News Updates in Marathi

14:29 (IST) 15 Jul 2025

उरण मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली; खाजगी रुग्णालयात अनेकांवर उपचार

उरण मध्ये डेंग्यू आणि व्हायरल तापाची साथ असल्याची माहिती उरणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. …सविस्तर वाचा
14:01 (IST) 15 Jul 2025

कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता…गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा पाच हजार बस धावणार…

गणेशोत्सवासाठी रेल्वे आणि एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासीयांसाठी यावर्षी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा बस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. …सविस्तर वाचा
13:53 (IST) 15 Jul 2025

डोंंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन, एक हजाराहून अधिक रहिवासी सामील

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी मंगळवारी सकाळपासून शासनाने ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुसळधार पावसात धरणे आंदोलन सुरू केले आहे. …वाचा सविस्तर
13:43 (IST) 15 Jul 2025

पुणे शहरात सकाळपासूनच जोर’धार’…ताम्हिणी, लोणावळ्यालाही झोडपले….

सोमवारी रात्रीपासून घाटमाथा परिसरात, शहर आणि अन्य भागांत मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. …सविस्तर बातमी
13:37 (IST) 15 Jul 2025

वनखात्यात पुन्हा महिला कर्मचाऱ्याचा छळ

मनस्थिती खालवली असून नैराश्य आल्याने कर्तव्यादरम्यान तणाव वाढत आहे. …सविस्तर बातमी
13:32 (IST) 15 Jul 2025

मुंबईसह ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन

मध्य प्रदेशवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. …सविस्तर बातमी
13:32 (IST) 15 Jul 2025

पिंपरीची वाटचाल कोंडीमुक्तीकडे! रस्ते, विकास प्रकल्पांच्या जागा भूसंपादनासाठी ‘टास्क फोर्स’

प्राधान्याने रस्त्यांच्या विषयांचा विचार करून आपसात समन्वय ठेऊन सर्व प्रकरणे येत्या ५ सप्टेंबरपर्यंत मार्गी लावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. …अधिक वाचा
13:30 (IST) 15 Jul 2025

अमरावती : खासगी शाळांची विद्यार्थी मिळवण्यासाठी पायपीट! महापालिका शाळांच्या…

एकीकडे शहरातील खासगी अनुदानीत शाळांचे शिक्षक विद्यार्थी मिळावे, यासाठी सतत फिरताना दिसून येत आहेत तर महापालिकेच्‍या काही शाळांमध्‍ये जागा शिल्लक नाही. …अधिक वाचा
13:26 (IST) 15 Jul 2025

ओला, उबर चालकांनी पुकारला संप…वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

दर कपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे. ठाणे शहरातील नाक्यानाक्यांवर हे वाहनचालक एकत्रित जमून आंदोलन करत आहेत. …सविस्तर बातमी
13:15 (IST) 15 Jul 2025

विमानासारखीच प्रणाली आता रेल्वेतही… काय फायदा होणार?

रेल्वे दळणवळणामध्ये सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून ‘व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी’ (व्हीएचएफ) ही यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. …सविस्तर वाचा
13:12 (IST) 15 Jul 2025

विमानतळ परिसरातील बेशिस्तांवर कारवाईची मात्रा; अशी आहे वाहतूक पोलिसांची मोहीम…

१२ जुलैपर्यंत वाहतूक पोलिसांनी १,२८७ वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनचालकांना ९,३६,६५० रुपयांचे ई-चलन पाठविण्यात आले आहे. …अधिक वाचा
13:12 (IST) 15 Jul 2025

गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, पण…

जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने वैध ठरवताना ॲम्फी थिएटर, कॅफेटेरिया वापराबाबत काही अटी घातल्या आहेत. तसेच या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे सरकारला बजावले आहे. …वाचा सविस्तर
13:00 (IST) 15 Jul 2025

बच्चू कडूंच्या भूमिकेने सरकारची कोंडी

राज्यात कोठेही बँक अधिकाऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. …सविस्तर वाचा
12:53 (IST) 15 Jul 2025

संचलन तूट कमी करण्यासाठी पीएमपीचे नियोजन

‘पीएमपी’ प्रशासनाने चार्जिंग आणि सीएनजी स्थानकांचे नियोजन करून १४ मार्गांचा विस्तार केला आहे, तर ६४ बसच्या वेळापत्रकात बदल करून तोट्यातील दोन मार्गांवरील ‘पीएमपी’ची सेवा बंद केली आहे. …सविस्तर वाचा
12:47 (IST) 15 Jul 2025

केशवनगरमधील गायरान जागेत ओढ्यांमध्ये राडारोडा…

पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या केशवनगर येथील गायरान क्षेत्रातील बारा नैसर्गिक जलस्त्रोतात राडारोडा टाकण्यात आल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली दिली. …अधिक वाचा
12:37 (IST) 15 Jul 2025

शहरबात : दडपशाहीनंतरची एकजूट

२००७ च्या सुमारास नरेंद्र मेहता यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत आणि त्यानंतर गीता जैन यांच्या कार्यकाळात, स्थानिक स्वराज्य निर्णय प्रक्रियेत मराठी भाषिकांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचे आरोप करण्यात आले. …अधिक वाचा
12:35 (IST) 15 Jul 2025

पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती

राज्य शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. …वाचा सविस्तर
12:35 (IST) 15 Jul 2025

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांना दिलासा; मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात तीन नव्या गाड्यांची भर, उद्यापासून मेट्रोच्या २१ अतिरिक्त फेऱ्या

या गाड्या बुधवारपासून सेवेत दाखल होणार आहेत. नवीन तीन गाड्या सेवेत दाखल झाल्याने आता मेट्रो गाड्यांच्या २१ फेऱ्या वाढणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या दोन्ही मार्गिकांवर २८४ फेऱ्या होतात, बुधवारपासून फेऱ्यांची संख्या ३०५ वर जाणार आहे. …अधिक वाचा
12:22 (IST) 15 Jul 2025

चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची कामे वादात

नवीन पाणी प्रकल्पाअंतर्गत जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनीच्या व्यवस्थापनाची कामे प्रस्तावित आहेत. त्यानंतरही या प्रकरणाची देयके देण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेचे (ठाकरे) आमदार बाबाजी काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. …वाचा सविस्तर
12:20 (IST) 15 Jul 2025

कोपरखैरणेत मलनिस्सारण कामे अर्धवट अवस्थेत

मलनिस्सारण वाहिन्या अनेक ठिकाणी नादुरुस्त असून काही ठिकाणी पाण्याची वाहिनी त्या जवळ असल्याने आरोग्याचा उद्भवू शकतो, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिल्या. …सविस्तर बातमी
12:08 (IST) 15 Jul 2025

सरकारी, एसआरए इमारतींच्या पुनर्विकासाचे नवे दार खुले; स्वयंपुनर्विकासाचे धोरण महाराष्ट्रभर राबविणार – प्रविण दरेकर

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी, इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासा संदर्भातील विविध मुद्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयंपुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मार्गदर्शन केले. …वाचा सविस्तर
12:03 (IST) 15 Jul 2025

वस्तुस्थिती तपासून इंदापूरसाठी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, अडचणींसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ही माहिती डुडी यांनी दिली …सविस्तर वाचा
11:55 (IST) 15 Jul 2025

मिळकतकर थकविल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्युटवर कारवाई…

मात्र मिळकत शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वर्गखोल्यांऐवजी केवळ कार्यालय जप्त करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. …वाचा सविस्तर
11:44 (IST) 15 Jul 2025

समाविष्ट गावातील मिळकतकराबाबत महापालिकेने उचलले पाऊल !

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेत समविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांतील मिळकतकर वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. …सविस्तर बातमी
11:44 (IST) 15 Jul 2025

नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत गट – क आणि गट – ड यामधील एकूण ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता ८४७७४ अर्ज प्राप्त झालेले आहेत

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
11:44 (IST) 15 Jul 2025

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”

नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 15 Jul 2025

“माफ करा आई- बाबा नाही झेपणार मला…”, हजारो ‘ख्वाहिश’ची एका क्षणात राखरांगोळी…

माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आई- बाबा… पण बस्स… आता नाही होणार माझ्याकडून… बाय…

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 15 Jul 2025

Pimpri : निगडीत टोळक्याकडून कोयत्याने वार, भोसरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचे फिर्यादी महिलेचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांवर कोयत्याने वार केले. …सविस्तर वाचा
11:43 (IST) 15 Jul 2025

राज्य मंडळात पदभरती… किती पदांचा प्रस्ताव सादर?

राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयासह मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक येथे विभागीय मंडळे आहेत. …सविस्तर बातमी
11:43 (IST) 15 Jul 2025

दिल्ली, अहमदाबादप्रमाणे नागपूर विमानतळावर ‘आरव्हीआर’, विमान अपघातानंतर सतर्कता

वाईट हवामानामुळे किंवा कमी दृश्यमानतेमुळे विमानांना अनेक वेळा इतरत्र वळवावे लागते.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज   १५ जुलै २०२५