Maharashtra Breaking News Live Updates, 14 October 2025 : महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. राज्यातील विरोधी नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. दुसऱ्या बाजूला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मनविसेच्या पोस्टरवरून अभाविप व मनविसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या चर्चेदरम्यान आता प्रहार जनशक्ती पार्टीसाठी दिलेली जागा जनता दल (सेक्युलर) या पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारने या निर्णयासह माजी मंत्री बच्चू कडू यांना दणका दिला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांनी जगतापांना समन्स बजावलं असून बीडमधील मोर्चा सोडून मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी भाजपा नेते रामदास तडस यांनी केली आहे. अजित पवार तीन टर्म या संघटनेचे अध्यक्ष असून या काळात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचा आरोपही तडस यांनी केला आहे.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घटनांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.

16:22 (IST) 14 Oct 2025

ठाणे पोलिसांच्या कारवाईत ‘एमडी’चा साठा जप्त; दोन तस्करांना अटक

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते. …अधिक वाचा
16:22 (IST) 14 Oct 2025

बेकायदा बांधकामांविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त राव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत बेकायदा बांधकामांवर कारवाईचा आग्रह धरला. …सविस्तर बातमी
16:08 (IST) 14 Oct 2025

कल्याण एस.टी. आगारात चोरट्यांचा सुळसुळाट; महिला प्रवाशांच्या बांगड्या, मोबाईलवर डल्ला

दररोज बस आगारातील ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या, प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे …वाचा सविस्तर
15:43 (IST) 14 Oct 2025

NEET UG 2025 Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी २ हजार ६५० नव्या जागा, महाराष्ट्रामध्ये १५० जागा वाढल्या

महाराष्ट्रामध्ये १५० नव्या जागांना मान्यता मिळाली आहे. या जागांचा तिसऱ्या फेरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. …अधिक वाचा
15:42 (IST) 14 Oct 2025

कोण आहेत हेल्मेट मॅन ऑफ इंडिया? हेल्मेट वापर, रस्ता सुरक्षा मोहीम त्यांनी का सुरू केली?

दररोज हजारो विद्यार्थी दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. …सविस्तर बातमी
15:36 (IST) 14 Oct 2025

वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार आहे. …सविस्तर वाचा
15:36 (IST) 14 Oct 2025

आरबीआयची पीएम-ई-ड्राईव्ह प्रस्तावाला मंजुरी… पुण्याला एक हजार ई बस मिळणार

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह’ योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. …सविस्तर वाचा
15:32 (IST) 14 Oct 2025

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाची धमकी…नाशिकच्या सेवानिवृत्ताला गंडा

तुमच्या आधार कार्डवरून क्रेडीट कार्ड काढण्यात आले असून त्याव्दारे गैरव्यवहार करण्यात आल्याने तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याचीच धमकी देण्यात आली. …सविस्तर वाचा
15:26 (IST) 14 Oct 2025

Maharashtra Bike Taxi Policy 2025 : रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनेत बाईक टॅक्सी स्वस्त

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले बाइक टॅक्सी धोरण शहरी वाहतूक व्यवस्थेतील सुलभ, सुरक्षित आणि परवडणारे मानले जात आहे. …अधिक वाचा
15:17 (IST) 14 Oct 2025

मुख्यमंत्र्यांचे शहर अश्लिल शेरेबाजीत अव्वल, एनसीआरबीच्या अहवालातले वास्तव

सार्वजनिक स्थळी महिलांना उद्देषून अश्लिल शेरेबाजी करण्यात संत्रानगरीने अव्वल स्थान गाठले आहे. …वाचा सविस्तर
15:10 (IST) 14 Oct 2025

मविआ-मनसेचे ते सहा प्रश्न अन् उत्तरासाठी निवडणूक आयोगाने मागितला वेळ, शिष्टमंडळ उद्या पुन्हा चर्चा करणार

शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “मविआ व मनसेचं शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना भेटलं. यावेळी आमच्यात प्रदीर्घ बैठक झाली. आणचं आणखी एक शिष्टमंडळ निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना भेटलं. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वाघमारे यांची भेट घेतली. चोकलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत आमचे काही मुद्दे अनिर्णित राहिले आहेत. त्यावर उद्या परत चर्चा होईल. तसेच राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे व निवडणूक अधिकारी चोकलिंगम एकत्रित भेटतील आणि आम्ही सगळे मिळून चर्चा करू. उद्याच आपण पत्राकारांना भेटून माहिती देऊ असं आमचं ठरलं आहे. आमच्या प्रश्नांवर माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी, उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. उद्या परत चर्चा होईल.”

15:03 (IST) 14 Oct 2025

सामाजिक दातृत्व, साधेपणा हीच रतन टाटांची खरी श्रीमंती, रतन टाटांचे विश्वासू सहकारी माधव जोशी यांची माहिती

‘रतन टाटा एक माणूस’ या विषयावर माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या सहवासातील अनुभव कथन केले. डोंबिवली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. …सविस्तर वाचा
15:01 (IST) 14 Oct 2025

“ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?” मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय?

Mahavikas Aghadi MNS Delegation : मविआ व मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. …सविस्तर वाचा
14:50 (IST) 14 Oct 2025

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल; ७३ गटांसाठीचे आरक्षण जाहीर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ७३ गटांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. …अधिक वाचा
14:50 (IST) 14 Oct 2025

प्रारूप मतदारयादीवर हरकतींसाठी मुदतवाढ; नगरपरिषदा, नगरपंचायती निवडणुका

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती-सूचना नोंदविण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
14:50 (IST) 14 Oct 2025

पिंपरी चिंचवडमध्ये सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात ‘मॉक ड्रिल’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. …वाचा सविस्तर
13:18 (IST) 14 Oct 2025

दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

निवडणूक आयोग दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळणार

आयोग दुबार मतदारांना ते मतदान कुठे करणार हे विचारणार

13:11 (IST) 14 Oct 2025
राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पाच प्रश्न उपस्थित केले

अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का आहे?

मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे तर निवडणुकीला कसे सामोरे जाता?

काही ठिकाणी आढळलं आहे की वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त, असे घोळ कधी मिटवणार?

मतदार याद्या सक्षम नाहीत मग त्यात दुरुस्त्या करणार का, दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया कशी असेल?

मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत उपलब्ध कराल?

13:06 (IST) 14 Oct 2025
महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, शेकापचे जयंत पाटील, भाकपाचे अजित नवले, मिलिंद नार्वेकर, नितीन सरदेसाई, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, व वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

12:59 (IST) 14 Oct 2025

‘अभाविप’ कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी ‘मनविसे’च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करून कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. …अधिक वाचा
12:58 (IST) 14 Oct 2025

पुणे महापालिकेला मतदार यादी देताना निवडणूक आयोगाने वगळली ‘ या ‘ मतदारांची नावे !

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी मतदानासाठी वापरली जाणार आहे. …सविस्तर बातमी
12:44 (IST) 14 Oct 2025

Police Action in Malegaon: मालेगावात आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई.. ‘यूएपीए’ अंतर्गत तरुणास अटक

आंध्र प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावात मोठी कारवाई केली आहे. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून परराष्ट्रातील दहशतवादी संघटना व व्यक्तींच्या संपर्कात असल्या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
12:44 (IST) 14 Oct 2025

तळोजा गावात तीन वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला;  परिसरात भीतीचे वातावरण

 पनवेल महानगरपालिकेच्या तळोजा गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे रहिवाशांचे हाल सुरूच आहेत. …अधिक वाचा
12:44 (IST) 14 Oct 2025

नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या नावाने सीमकार्डचा वापर

कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. …सविस्तर वाचा
12:15 (IST) 14 Oct 2025

मविआ नेते व राज ठाकरे ‘शिवालय’मध्ये दाखल, थोड्याच वेळात निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्रालयाजवळच्या शिवालय (विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचा बंगला) बंगल्यात दाखल झाले आहेत. विरोधी नेत्यांचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना भेटीसाठी १२.३० ची वेळ दिली आहे.

11:55 (IST) 14 Oct 2025

“शिंदेंच्या आठ योजना फडणवीसांनी बंद केल्या”, विरोधकांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यावर मोठा भार…”

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आठ योजना देवेंद्र फडणवीस सरकारने बंद केल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, तरी देखील आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही.

11:50 (IST) 14 Oct 2025

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ लाख मतांची चोरी : संजय राऊत

शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 लाख मतं वाढली आहेत त्याचा हिशेब द्यायला निवडणूक आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदान झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रासमोर मांडायचे आहेत. तुम्ही मतं चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा?

10:56 (IST) 14 Oct 2025

प्रेयसी हत्या प्रकरण:”मेरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत”; प्रियकराने केली होती गळा कापून हत्या

मेरी मानसिक तणावात होती. यातून हे सर्व घडलं असल्याचा आरोप मेरीच्या कुटुंबीयांनी केला. मेरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. ते थांबवावे अशी विनंती देखील कुटुंबीयांनी केली आहे. …अधिक वाचा
10:42 (IST) 14 Oct 2025

खड्डे व मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई

खड्डे व उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्या व्यक्तीचं कुटुंब नुकसानभरपाईसाठी पात्र आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा व्यक्तींच्या वारसांना दोन महिन्यांत सहा लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

10:14 (IST) 14 Oct 2025

मविआसह मनसेचं शिष्टमंडळ आज मुख्य निडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आज (मंगळवार, १४ ऑक्टोबर) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणे ही महत्त्वाचे मानले जाते.