Maharashtra Political News Highlights, 10 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून राज्यात दोन दिवसांपासून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आपल्या मुलाची बाजू मांडताना पाहायला मिळाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे.
शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, कारण काय?
खासदार शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एमसीए कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
BMC Election Congress : मविआत फूट? काँग्रेसची मोठी घोषणा, मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार
अंमलदारांनी आधुनिक तपास पध्दतीकडे लक्ष द्यावे – प्रवीण पडवळ यांची सूचना
कागलमध्ये मुश्रीफ- घाटगे यांच्यात पुन्हा चुरस
“जेंव्हा सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल, तेव्हा…”, रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका
“देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल. परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत. पुण्यात सरकारी जमिनी, मुंबईत SRA च्या जमिनी, नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीत खाणपट्टे… हे या सरकारचे आवडते खाद्य आहे. सुलतान मिर्झाने ज्या प्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी शहरे आणि विभाग वाटून घेतले आहेत. तिन्ही पक्ष भ्रष्टराचाराने बरबटलेले असून एकमेकांना सांभाळून घेत आहेत… हे सर्व बघता ‘करून वोटचोरी सुरूय महाराष्ट्राची लुटमारी’ असंच म्हणावं लागेल”, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2025
“पाकिस्तानचे झेंडे नाचविणा-यांकडून हिंदुत्वाची शिकवण…”कोणी केली टीका ?
“उठाव केला त्यावेळी मनामध्ये शंका आल्या होत्या…” एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचा
Cyber Crime : सेवानिवृत्त व्यक्तीची डिजिटल अटकेच्या भीतीने फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
“७० हजार कोटींच्या आरोपातील १०० कोटी मला द्या, बाकीचे तुम्ही…”, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य, विरोधकांवर केली टीका
“मला सातत्याने टार्गेट केलं जातंय, आता जी घटना घडायला नको होती ती घडली. मी त्या घटनेवर म्हटलं की माहिती घेऊन सांगतो, तर काहीजण म्हणाले की एवढी मोठी घटना आणि अजित पवारांना माहिती कशी नाही? आरे बाबा मी सकाळी ६ ला कामाला सुरूवात करतो, तर रात्री थेट ११ वाजता घरी जातो. त्यामुळे मला माहिती नव्हती, त्यानंतर मी माहिती घेतली तर काहीच व्यवहार झालेला नाही. एक रुपया कोणाला दिलाही नाही आणि घेतला नाही. मी कोणाच्या पाच पैशाला मिंधा नाही, मागे माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला. आरोप करणाऱ्यांना मी म्हटलं की ७० हजार कोटींच्या आरोपातील १०० कोटीच मला द्या, बाकीचे तुम्ही घेऊन जा. माझ्या १० पिढ्या १०० कोटीत बसून खातील. जनतेचे सेवेक आहोत, तर जनतेची सेवा करत असताना काही आरोप होत असतात”, असं म्हणत अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली.
एकत्र लढलो नाही तर जनता जागा दाखवेल, भरत गोगावले यांचा मित्र पक्षांना इशारा
नगरपालिका निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र रायगड जिल्ह्यात महायुतीचा ताळमेळ अद्याप जमलेला नाही. असे असले तरी, शिवसेना शिंदे गट अजूनही युतीबाबत आशावादी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. महायुती झाली तर त्याचे स्वागत करूच पण स्वबळाची भाषा कोणी करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा सुचक इशारा गोगावले यांनी सहयोगी पक्षांना दिला आहे.
'एकत्र लढलो नाही तर जनता जागा दाखवेल', भरत गोगावले यांचा मित्र पक्षांना इशारा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
