Mumbai Political New Live Updates, 06 November 2025: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुरूवात झाली असून, निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यानंतर टप्प्या-टप्प्याने महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण सध्या तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून, सर्वच पक्षांतील ईच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी धावपळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Maharashtra Mumbai Breaking News Live Updates Today 6th Nov 2025: महाराष्ट्रातील घडामोडींचा लाईव्ह आढावा
“सर्व घोटाळेबाजांवर…”, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर काँग्रेस आमदाराची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने सुमारे २५०० कोटींची सरकारी जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होत आहे. यावरून विरोधक अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. अशात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की, “पार्थ पवार यांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. सर्व घोटाळेबाजांवर त्वरित कारवाई करून विक्रीखत रद्द केले पाहिजे. मूळ मालकांना महार वतनाची जमीन परत केली पाहिजे. पुण्यात जाऊन सर्व जमिनीची माहिती घेऊन आम्ही पुढील भूमिका जाहीर करणार आहोत.”
आमच्या सहशीलतेचा अंत पाहू नका, नागरिक संतप्त,दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेण आजच्या काळाची गरज!
लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील दोन महिलांची दीड कोटीची फसवणूक
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, कागदपत्र दाखवत अजित पवारांवर अंजली दमानियांची आगपाखड; म्हणाल्या, “ही फुकट…”
पिंपळनेर निवडणुक : राजकीय समीकरणे गुंतागुंतीची, मतदार उत्सुकतेच्या शिखरावर
‘स्थानिक’ वर्चस्वासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस, अकोला जिल्ह्यात २.२२ लाख मतदार पाच नगराध्यक्षांसह १४२ सदस्य….
अजित पवारांच्या सुपुत्राला फुकट जमीन? फडणवीसांचा दुहेरी खेळ उघड! – विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुद्दा उपस्थित
Video: पार्थ पवारांच्या जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले पाहा व्हिडीओ
व्हॉट्सॲपवरून पत्रकार राणा अय्यूब यांना जीवघेणी धमकी; कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा दाखल
Video: डोंबिवलीत मोठागाव रेल्वे फाटकावरील चौपदरी रेल्वे उड्डाण पुलाला रेल्वेची मंजुरी; मोठागाव रेल्वे फाटकातील खोळंब्याला पूर्णविराम
गृहप्रकल्पात ‘सुविधा’ पुरविल्याशिवाय संपूर्ण रक्कम भरण्याची सक्ती नको! रेरा कायद्यातील सुधारणेसाठी केंद्राला साकडे
“मी मते मागायला आलेलो नाही, तर…”, मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “मी मत मागायला आलेलो नाही, तर तुम्हाला हिंम्मत द्यायला आलो आहे.”
कुस्तीत थार, बुलेट जिंकणारा सिकंदर शेख असे का करेल ? महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी यांचा प्रश्न
Nashik Politics : धरणाचा पाट अन् प्रशस्त राजकीय वाट….सुहास कांदे यांच्या ‘टाइमिंग’चे महत्त्व का ?
Jalgaon Crime : महिलेने तीन सुवर्ण पेढ्यांना लुटले… अवघ्या दीड तासांत चार लाखांचा ऐवज लंपास !
मालवणच्या राजकोटजवळ ब्रिटिशकालीन स्मारकांची तोडफोड; ऐतिहासिक वारसा असुरक्षित
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा; कौटूंबिक, राजकीय संघर्ष टाळण्यासाठी निर्णय
सावंतवाडीची केशर निर्गुण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत उपविजेती !!
रत्नागिरी शहरातील १ हजार ९०० दुबार मतदारांना पालिकेची नोटीस; मतदान करण्याबाबत हमी पत्र घेणार
Maharashtra Breaking News Live: “महाराष्ट्राची लूटमार करण्याचा प्रकार”, पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने सरकारची राखीव जमीन ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमणात टीका होत आहे. या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “मुरलीधर मोहोळ जैन समाजाचे हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करतात. अजित पवार यांचा मुलगा सरकारी जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या महाराष्ट्राची लूटमार करण्याचा प्रकार सुरू आहे आणि पुण्यात तो सर्वाधिक आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन जी एका उद्देशासाठी राखीव असताना, सरकार एका कंपनीला दोन दिवसांत ती जमीन मंजूर करते. जिल्हाधिकारी ही जमीन आमची असल्याचे सांगत आहेत, पण सरकारने ही जमीन या कंपनीला दिल्याचीही माहिती आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या भागातील या जमिनीची किंमत किमान १८०० कोटी रुपये असून, जास्तीत जास्त २५०० कोटींपर्यंत आहे.”
Maharashtra Mumbai Breaking News Live Updates Today 6th Nov 2025: महाराष्ट्रातील घडामोडींचा लाईव्ह आढावा
