Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी आज नागपूर येथे ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

21:12 (IST) 10 Oct 2025

कोल्हापूरमधील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त; एक कोटीच्या नकली नोटा जप्त

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या बनावट नोटा चलनात आणण्याचा सूत्रधार कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार असल्याचेही त्यांनी सांगितले. …सविस्तर बातमी
21:01 (IST) 10 Oct 2025

मुंबई हातची गेली, की मग हंबरडा फोडा ! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ‘हंबरडा’ शब्दावरून टीका केली. …अधिक वाचा
20:49 (IST) 10 Oct 2025

पंढरपुरातील मंडल अधिकारी लाच घेताना जेरबंद

राजेंद्र वाघमारे हा करकंब महसूल मंडलाचा मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे पंढरपूर मंडलाचा अतिरिक्त पदभार आहे. …वाचा सविस्तर
20:45 (IST) 10 Oct 2025

उद्धव ठाकरे यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ठाकरे गटावर घणाघात केला. …सविस्तर बातमी
20:30 (IST) 10 Oct 2025

पन्हाळ्यात बिबट्याच्या बछड्याचा हल्ल्याचा प्रयत्न; दोघेजण जखमी, वन विभागाकडून ड्रोनद्वारे शोध मोहीम

पन्हाळगडाच्या पायथा परिसरात आठ महिन्यांपासून एक बिबट्या मादीचा दोन बछड्यांसह वावर होता. गुरुवारी सोमवार पेठेच्या भरवस्तीत याच कुटुंबातील एका बछड्याचा मृतदेह आढळला होता. …अधिक वाचा
20:20 (IST) 10 Oct 2025

Pune Accident: हिंजवडीत अवजड वाहनाचा आणखी एक बळी; दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; प्रवेश बंदीचे उल्लंघन

भारती राजेश मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मिक्सर चालक मोहंमद अब्बास अल्ताफ (वय २५, रा. वाघजाई मंदिरासमोर, चांदे) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. …वाचा सविस्तर
20:15 (IST) 10 Oct 2025

पिंपरी : पदपथांवरील हातगाड्यांअगोदर मोटारींवर कारवाई करा; नवनियुक्त आयुक्तांचे निर्देश

‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार शुक्रवारी स्वीकारला. त्यानंतर विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी विविध सूचना दिल्या. …वाचा सविस्तर
20:00 (IST) 10 Oct 2025

महायुती निवडणूका कशा लढणार.. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छेद ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तयारीला वेग देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची भूमिका मांडली होती. …वाचा सविस्तर
19:30 (IST) 10 Oct 2025

याआधी मराठा राजकारणी सर्वांना विश्वासात घेत – छगन भुजबळ यांची नाराजी

ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविषयी सरकार काही करत नसल्याने आम्ही न्यायालयात गेलो, अशी भूमिका मांडत अन्न व ग्राहक सुरक्षा मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. …वाचा सविस्तर
19:18 (IST) 10 Oct 2025

यवतमाळ : आदिवासी आरक्षण बचावासाठी महामोर्चा; अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा व धनगर समाजाला…

आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने आज शुक्रवारी येथील समता मैदानावर हजारो आदिवासी बांधवांनी एकत्र येत अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देवू नये, अशी जोरदार मागणी केली. …सविस्तर वाचा
19:14 (IST) 10 Oct 2025

“मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा; गुन्हेगारांना राजकीय संरक्षण…?”, एकनाथ खडसेंची टीका

वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरूवारी साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवर पाच जण आले होते. …अधिक वाचा
18:51 (IST) 10 Oct 2025

घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

पवार म्हणाले, ‘नीलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कोणाच्या जवळचा किंवा लांबचा कार्यकर्ता आहे, कोणासोबत त्याचे छायाचित्र आहे किंवा नाही हे न पाहता कारवाईची सूचना पोलिसांना केली आहे.’ …अधिक वाचा
18:17 (IST) 10 Oct 2025

Pune Crime News: पिंपरी : आयटीनगरी हिंजवडीतील कंपनीची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीला साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या कंपनीला एका मेलद्वारे बनावट बँक खाते दिले. …सविस्तर वाचा
18:02 (IST) 10 Oct 2025

ठाण्यात भाजी आणणाऱ्यालाही अंगरक्षक; राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका

सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे. …सविस्तर वाचा
17:52 (IST) 10 Oct 2025

कल्याणमधील पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राची पडझड; पडझडीमुळे श्वानांचे हाल

मुसळधार पावसामुळे या निर्बिजीकरण केंद्राच्या बाजुला नाल्या लगतची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून येत असलेले नाल्याचे पाणी थेट निर्बिजीकरण केंद्रात शिरत होते. …सविस्तर बातमी
17:41 (IST) 10 Oct 2025

राजन विचारे संतापले म्हणाले… बोगस नावे टाकणाऱ्या अधिकाऱ्याला आता सोडणार नाही, घराबाहेर जाऊन…

ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. …सविस्तर वाचा
17:31 (IST) 10 Oct 2025

बाळासाहेबांची ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार; अविनाश जाधव यांचा इशारा

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तीन हात नाका येथील टीप टॉप पार पडली. …सविस्तर वाचा
17:28 (IST) 10 Oct 2025
Live : बीडमध्ये १७ ऑक्टोबरला होणार छगन भुजबळांचा ओबीसी महाएल्गार मेळावा! ‘या’ नेत्यांना दिलं निमंत्रण

येत्या १७ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसीचा महा एल्गार मेळावा होणार आहे. यावेळी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रण दिल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक अॅड. सुभाष राऊत यांनी दिली. २ सप्टेंबर रोजी शासनाने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे, तो रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मेळावा होणार असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. दरम्यान, बीड मधील यापूर्वीचा मेळावा रद्द झाला होता. त्यावेळी जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत सुभाष राऊत यांनी मेळावा उधळण्याची भाषा कोणी करू नये अन्यथा तुमचे काय धंदे आहेत ते आम्हाला शोधावे लागतील. राज्यभरात जे बॅनर लावले जातात त्यासाठी पैसा कुठून येतो, कोणत्या एजन्सीवर काय कामे घेतली आहेत हे देखील आम्हाला समोर आणावे लागेल असा इशारा सुभाष राऊत यांनी काळकुटे यांना दिला आहे.

17:14 (IST) 10 Oct 2025

महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या १७ गुन्हेगारांना कल्याण पोलिसांकडून मोक्का; कल्याणमधील खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई

या १७ गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख हा टिटवाळा बनेली येथील रहिवासी आहे. याप्रकरणात पोलीस आणखी चार फरार तस्करांचा शोध घेत आहेत. …वाचा सविस्तर
17:03 (IST) 10 Oct 2025

ठाण्यात अमित ठाकरे आले आणि दुखण्यावर औषध घेऊन गेले….

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंट यांच्यावतीने शुक्रवारी साहित्यवलय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडला. …सविस्तर वाचा
16:55 (IST) 10 Oct 2025

अकोला : ११ गुन्ह्यांतील तब्बल २२६ किलो अंमली पदार्थ नष्ट

अमली पदार्थ नष्ट करण्याच्या समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच नवी दिल्ली येथील सरकारी अफू आणि अल्कलॉइड कारखानाचे मुख्य नियंत्रकांची परवानगी प्राप्त झाली. …वाचा सविस्तर
16:50 (IST) 10 Oct 2025

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अधिकृत युपीआय हँडल; सहकारी बँकिंगच्या डिजिटायझेशनमधील एक महत्वाचा टप्पा पार

Vega, The Payment Switch या Getepay द्वारे विकसित केलेल्या प्रणालीच्या साहाय्याने ही घोषणा ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये डीएनएस बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी आणि Getepay चे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. …सविस्तर बातमी
16:40 (IST) 10 Oct 2025

ठाण्यात शिंदेंना ठाकरे बंधूंचे आव्हान? महापालिकेवर ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित धडक मोर्चा; आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी होण्याची शक्यता

ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, माजी आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. …वाचा सविस्तर
16:38 (IST) 10 Oct 2025

तर, मुंबई, पुणे, ठाणे जाम होणार? वडेट्टीवारांचा इशारा, ओबीसी मोर्चात फडणवीसांवर टीका

मोर्चाचा समारोप संविधान चौकात झाला. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनात राज्यभरातून हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला. आता पुढील दिशा राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. …वाचा सविस्तर
16:17 (IST) 10 Oct 2025

‘वनतारा’तून ‘ओरांगुटान’च्या सुटकेचा मार्ग मोकळा, लवकरच इंडोनेशियात परतणार

माधुरी हत्तीच्या प्रकरणानंतर वनतारा अधिक चर्चेत हाेते. वनतारा येथे बेकायदेशीररित्या प्राणी आणले जात असल्याचे प्रकरण देखील न्यायालयात होते. …सविस्तर वाचा
16:05 (IST) 10 Oct 2025

कल्याणमध्ये नागरिकांचे चोरी झालेले मोबाईल पोलिसांकडून परत

खडकपाडा पोलिसांनी गुन्हे अहवाल तांत्रिक संकेतस्थळाच्या माध्यमातून या सर्व चोरीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते सर्व मोबाईल २५ मोबाईल मालकांना परत केले. सुमारे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे हे मोबाईल होते. …अधिक वाचा
16:03 (IST) 10 Oct 2025

ममता की प्रणयाराधन! वाघीण पेचात. तर ५ वाघ आणि गावकरी संकटात म्हणून एनएनटीआर दाखल

शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो. …अधिक वाचा
15:57 (IST) 10 Oct 2025

महिला पोलिसाची आत्महत्या नव्हे, ‘हत्या’ ? मोबाईल संभाषण उघड झाल्यानंतर लिव्ह-इन सहकाऱ्याला अटक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय महिला पोलिसाने राहत्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली होती. …सविस्तर बातमी
15:55 (IST) 10 Oct 2025

“अनिल परब साहेब, रवींद्र धंगेकर , सुषमाताई अंधारे यांना पोलीस संरक्षण द्या’, रोहित पवारांची मागणी

“राज्यभरात चर्चेस असलेली गुंडांची प्रकरणं अतिशय गंभीर असून या प्रकरणात भूमिका मांडणारे अनिल परब साहेब, रवींद्र धंगेकर , सुषमाताई अंधारे यांना सरकारने तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे. यापैकी कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार जबाबदार असेल. म्होरके जरी अंडरग्राउंड असले तरी त्यांच्या गँग इतर सदस्यांच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात आणि विशेष म्हणजे काही गँगला तर मोठ्या व्यक्तींचे वरदहस्त आहेत, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी डोळेझाक करू नये. नेपाळसारख्या बॉर्डर तर देशाबाहेर पळून गेलेल्या गुन्हेगारांसाठी ‘आवो जावो घर तुम्हारा’ असल्यासारख्या झाल्या असून पोलिसांनी अशा बॉर्डर्सवर विशेष लक्ष ठेवायला हवे” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.,

15:47 (IST) 10 Oct 2025

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी शनिवारी सोडत… दीड लाखांहून अधिक अर्जदार सोडतीत सहभागी होणार

कोकण मंडळाने ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीसाठी जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. …सविस्तर बातमी

Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व

महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…