Maharashtra Live News Updates, 23 October 2025: राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेसचे काही नेते ठाकरेंशिवाय निवडणुकीत उतरण्याची भाषा करू लागले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी महायुती स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Live Updates
Maharashtra Marathi News Live Updates 23 Oct 2025
Pune Rain News: ऐन दिवाळीत पावसाच्या सरी, पुढील काही दिवसही पाऊस?
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेला चांगला विकसित कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची, तसेच पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. …वाचा सविस्तर
वन्यप्राण्यांची तस्करी : ॲनाकोंडा, सरडे, कासवासह १५४ प्राणी ताब्यात; सीमाशुल्क विभागाची कारवाई
सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ठाणे येथील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. …सविस्तर बातमी
पालघरमध्ये १० वर्षीय मुलीची सक्तीच्या मजुरीतून सुटका
१० वर्षीय आदिवासी मुलीला घरकामासाठी सक्तीने मजुरी करायला लावल्याप्रकरणी भायंदर येथील एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. …अधिक वाचा
मिरारोड-भाईंदर द्विस्तरीय पूल : पुलावरील खड्ड्यांवर केवळ मलमपट्टी, खड्डे पुन्हा उखडले; गुन्हा दाखल करण्याची मागणी
अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून खड्डे बुजविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. …सविस्तर बातमी
गंभीर वाटणारे अजित दादा गमतीशीर, तर हसरे मुख्यमंत्री गंभीर कसे झाले?, खुद्द फडणवीसांनींच सांगितले…
पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वेगळी झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यापासून ते भाजपमधील अंतर्गत संघर्षांसह अनेक राजकीय आव्हानांवर मात केली. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनाही हाताशी घेत उपमुख्यमंत्री केले. …वाचा सविस्तर
वरिष्ठ नक्षल नेता भूपती, रुपेशसह २७० जणांच्या आत्मसमर्पणामागील ‘इनसाईड स्टोरी’
मागील आठवड्यात, १५ ऑक्टोबर रोजी, वरिष्ठ नक्षल नेता भूपती (सोनू) याने आपल्या ६० सशस्त्र सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. …वाचा सविस्तर
कर्करोग उपचारावर मोठी बातमी… प्रत्येक जिल्ह्यात उपचार… मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
कर्करोगावर परिणामकारक नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर उपचार केंद्रांची उभारणी केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा, निदान, डे केअर, रेडिओथेरपी व केमोथेरपी युनिटची उभारणी केली जाईल. …सविस्तर वाचा
सणासुदीच्या काळातही लोकल सेवा विलंबानेच; ऑक्टोबर हिटमध्ये प्रवासी घामाघुम, बाहेरगावी जाणारे प्रवासी चिंतेत
आता सण उत्सवांच्या अर्थात सुट्ट्यांच्या काळातही लोकल सेवा विलंबानेच सुरू असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. …वाचा सविस्तर
…तर देशातील लोकशाही धोक्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस का म्हणाले?, सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या बाजूने निर्णय दिल्यास…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत, संविधानिक संस्थांवरील हल्ले सुरू राहिले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल, असा इशारा दिला. …अधिक वाचा
अपात्र व्यक्तींद्वारे त्वचा रोगावर उपचार… नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने…
विदर्भ डर्मेटोलॉजिकल सोसायटीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे राज्यभरात अपात्र आणि अपंजीकृत व्यक्तींमार्फत त्वचारोग व सौंदर्यविषयक उपचार वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. …सविस्तर वाचा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २० लाखांचा ऐवज लंपास; नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरातील घटना
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेत मांडलेले दागिने, रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. …सविस्तर बातमी
सणासुदीत रोज एक लाख वाहनांची विक्री… देशभरात जीएसटी कमी केल्यावर…
केंद्र सरकारने दुचाकी व कमी क्षमतेच्या चारचाकी वाहनांवरील जीएसटी कमी केल्याने वाहनांच्या किंमती सुमारे १० टक्यांनी कमी झाल्या आहे. त्याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या सणासुदीत वाहन विक्रीवर होऊन ऑटोमोबाईल क्षेत्राला सुगीचे दिवस आलेले दिसत आहे. …सविस्तर बातमी
स्वच्छता सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …वाचा सविस्तर
गड किल्ल्यावर मराठी सुरक्षारक्षक नेमा…मराठी एकीकरण समिती आक्रमक l
महाराष्ट्रात राहून वारंवार मराठी भाषेची गळचेपी होत आहे. महापुरुषांचा सुद्धा आदर केला जात नाही असे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. …सविस्तर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात घड्याळ का घालत नाहीत..? , धागा मात्र कायम त्यांच्या हातात असतो..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नागपूरकर देवेंद्र फडणवीस घड्याळ कधीच घालत नाही, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगितली. ते हातात घड्याळ घालत नसेल तरी वेळेच्या बाबतीत ते अगदी चोख आहेत, अशी कबुलीही त्यांनी दिली. …वाचा सविस्तर
थेट ‘एआय’च्या विरोधातच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, आता लवकरच….
एआयच्या अनियंत्रित वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; डीपफेक आणि गोपनीयता भंग रोखण्यासाठी नियमनाची मागणी. …वाचा सविस्तर
पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीची,एक माणुस वाट लावत आहे : रविंद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांचा टोला
वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.हे लक्षात घेता,राजकीय नैराश्यामधून टीका केली जात आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार,अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांचा टोला
…अधिक वाचा
भटक्या श्वानांच्या विषयावरून डोंबिवलीत केबल व्यावसायिकाला दोघांची मारहाण
बालाजी गार्डन गृहसंकुलात भटक्या श्वानांच्या विषयावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. …सविस्तर वाचा
उबाठाचे माजी आमदार सुभाष भोईर भाजपच्या वाटेवर ? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
शिवसेनेतील फुटीनंतरही अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली होती. मात्र, माजी आमदार भोईर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. …वाचा सविस्तर
१६ वर्षीय मुलाचा कर्करोगाशी लढा; १२ वर्षीय चिमुकल्या भावाने ‘स्टेम सेल्स’ दानातून दिले जीवदान; दिवाळीत भाऊबीजेच्या पर्वावर…
अकोल्यातील एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जीव वाचवण्याचे प्रेरणादायी कार्य केले. जीवन (नाव बदलले आहे) हा १६ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि १२ वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. …सविस्तर वाचा
विश्लेषण : मुंबईतील पूर्व उपनगरांसाठी लवकरच पहिली मेट्रो… काय आहेत मेट्रो २ ब ची वैशिष्ट्ये?
डायमंड गार्डन – मंडाले असा मेट्रो प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन यादरम्यान मेट्रो प्रवास करता येणार आहे. …सविस्तर वाचा
कम्मालच झाली…डोंबिवलीत महसूल मंत्र्यांच्या सहीने विवादित जमिनीचा बनावट आदेश काढला; अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल
डोंबिवली पश्चिमेतील महसुली हद्द मौज आयरे कोपर रस्त्यावरील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील सर्वे क्र. ३४-५, ३९-११, ४०-१ई, ८६-२ या जमिनीचा हा वाद आहे. …सविस्तर बातमी
बदलत्या वातावरणासह प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
दिवसा कडक ऊन तर संध्याकाळी पडणारा पाऊस या बदलत्या हवामानामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढले असून, या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. …सविस्तर वाचा
विविध बँकांमध्ये ४५२ कोटी ३९ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी!
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने “तुमची संपत्ती तुमचाअधिकार” या नावाने मोहीम राबविण्यात येत आहे. …अधिक वाचा
ठाण्यात आगीचे सत्र सुरूच… दिवाळी पाडव्याच्या दिवशी सहा ठिकाणी लागली आग
दिवाळीच्या काळात शहरात आग लग्नाचे सत्र सुरूच असून बुधवारी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात आठ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. …सविस्तर बातमी
कचऱ्यात गेलेला सोन्याचा हार अखेर परत! कल्याणच्या कचरा संकलन केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
दिवाळीनिमित्त परिधान करण्यासाठी तिजोरीतून बाहेर काढलेला सोन्याचा सुमारे पाच ते सहा लाख रूपये किमतीचा कल्याण पूर्वेतील एका महिलेचा हार बुधवारी दारात कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या स्वच्छता कामगाराच्या कचऱ्याच्या डब्यात महिलेच्या नजरचुकीने गेला. …अधिक वाचा
‘समृद्धी’वर उत्तर प्रदेशचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; देशी कट्ट्यासह चार जीवंत काडतुस जप्त
सदर आरोपीची अधिक चौकशी व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करण्यात आली असता नमूद आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यात दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, लूटपाट, गैंग कायदा कलम, तसेच शस्त्र कायदा विस्फोटक पदार्थ बाळगण्याचे ७ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. …अधिक वाचा
सावधान! चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे बंद करणार, गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी…
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे. धरणाची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. …वाचा सविस्तर