Marathi News Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात काय कारवाई होणार? याबाबत विरोधक सरकारला सवाल विचारत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केल्याचंही पाहायला मिळत आहे.
याच अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचा बुधवारी नाशिकमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या बूथ संघटन बांधणीचंही कौतुक केलं. त्यामुळे यावरही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. त्याचबरोबर मुंबईत मराठी भाषेच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सरु आहेत. याबरोबरच राज्यातील राजकीय व इतर सर्वच बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
Mumbai-Maharashtra News Live Today, 17 April 2025 : राज्यातील सर्वच बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
कोल्हापुरात शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी रथोत्सव
“राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो”, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2025
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही…
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणीचा गुंता सुटेना
अहिल्यानगर जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.८७ मीटरने घट, पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता
मराठी शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यास मनसेचा विरोध; आंदोलन करण्याचा इशारा
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ तयार केला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. दक्षिणेतील राज्य हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
कर्जमाफीच्या मुद्यावर कृषीमंत्र्यांशी काय चर्चा झाली? बच्चू कडू म्हणाले, “आमचे दोन मुद्दे…”
“दिव्यांगाची मानधन वाढ असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी हे दोन मुद्दे आमचे होते. पण आमचं समाधान झालेलं नाही. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याचा काहीही संबंध नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आज बच्चू कडू यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. पण या भेटीत समाधान कारक चर्चा झाली नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांचा शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेरचा दौरा रद्द
“मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प.डॉ.नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमा मागतो”, असं धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राची नाडी कळली नाही’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
“भारतीय जनता पक्षाची सदस्य संख्या दीड कोटी झाली आहे. खरं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची नाडी कळली नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी विचार केला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द हे ते एआयच्या माध्यमातून दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. खरं तर त्यांनी समोरासमोर यावं, मग आम्ही त्यांना ५० गोष्टी सांगू शकतो. त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून कसे दूर गेले हे आम्ही त्यांना सांगू”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो ७ अ वरील बोगद्याची पाहणी केली
मुंबईतील मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुंबईतील मेट्रो ७ अ वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो ७ अ वरील बोगद्याची पाहणी केली आहे.
Sanjay Raut : “अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली”, संजय राऊत यांचा दावा; म्हणाले, “अन्यथा सरकारमधून…”
“मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा…”, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
गिरीश महाजन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, “गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ का बिघडलंय? हे आपल्याला माहिती आहे. अनेक खटलेबाजीत ते अडकले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती नाही. शिवजयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. फक्त महाराष्ट्रात नाही. मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी का केली? अमित शाह हे रायगडावर आले होते आणि त्यांनी जे काही प्रवचन दिलं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की तुम्ही खरंच शिवभक्त असाल तर शात शिवजयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा”, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
“…तरीही सरकार कारवाई का करत नाही?”, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत रवींद्र धंगेकर यांचा सवाल
पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप झाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारने वेळोवेळी मदत केलेली आहे. मंगेशकर रुग्णालयाची जी ध्येय धोरणे होती ती सध्याच्या प्रशासनाकडून राबवण्यात येत नसल्याचं दिसत आहे. रुग्णालयाने महापालिकेचे टॅक्स देखील भरलेले नाहीत. रुग्णालयावर राजकारण्याचा वरदहस्त आहे हे लपून राहिलेलं नाही. सरकारच्या सवलती हे रुग्णालय राबवताना दिसत नाही, तरीही सरकार रुग्णालयावर कारवाई का करत नाही? ही चिंतेची बाब आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांची भाजपावर टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)