Mumbai Maharashtra News Today : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचे कळते. शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता येथील उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे. तसेच अद्याप नाशिक, यवतमाळ आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे मतदारसंघ भाजपाकडे जाणार की शिंदे गट याठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून इतरांना उमेदवारी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अकोला येथून काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आंबेडकर काय भूमिका घेणार, हेही पाहावे लागेल.
Maharashtra News Live Updates 02 April 2024
जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तसेच पुणे शहर प्रभारी माधव भांडारी यांच्या मातोश्रींचे मंगळवारी (दि. २ एप्रिल) सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दुपारी २.३- वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई सीवूड्स येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे. परंतु पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून प्रशासकीय संस्थांवर पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून चाणक्य तलावाजवळ नव्याने कांदळवनावर घाला घातला आहे. त्यात अनेक कांदळवने तोडून टाकण्यात आले आहेत.
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. महायुतीच्या उमेदवार रखडपट्टीची खुमासदार चर्चा आता विरोधकांमध्येही रंगली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मिंधे गटाचे नेते गद्दार आहेत, ते कुणाचेच होऊ शकत नाहीत. लोकसभा मतदानाची तारीख जवळ येऊनही अद्याप जागावाटप जाहीर करण्यात आलेले नाही, याचे कारणच असे की, मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
अकोला : एप्रिल महिन्यातील ताप्त्या उन्हात सूर्यास्तानंतर अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल राहणार आहे. याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
महायुतीकडून बारणे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरीही बारणे यांना मावळ लोकसभा सोपी जाणार नाही.
पनवेल ः घरफोड्यांचे प्रमाण वाढले असताना चोरट्यांनी धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यास सूरुवात केली आहे. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत पनवेल शहरातील ओरीयन मॉलच्या मागील संत फ्रॅन्सीस झेवियर चर्चमधील दानपेटी फोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांची चोरी झाली. संत फ्रॅन्सीस झेवीयर चर्चचे फादर मेलरोय फर्नांडीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल शहर पोलीसांनी या चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.
फादर मेलरोय यांनी तक्रार दिल्यावर पहाटेच पोलीस चर्चमध्ये पोहचले. घटनास्थळाची पाहणी करुन त्यांनी नाकाबंदी केली. यापूर्वी सूकापूर येथील मंदीरात खांदेश्वर येथील शंकर मंदीरात सुद्धा चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या आहेत.
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदी काळात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची रोडावलेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय म्हणजेच आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबई : दिल्लीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. या तस्कराच्या मोटारीतून आणि घरातून विदेशी मद्याच्या तब्बल २०५ बाटल्या हस्तगत करण्यात पथकाला यश आले.
नंदुरबार – धुळ्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाची नाराजी उफाळून आली असून पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी खासदार डाॅ. हिना गावित यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. आम्हाला विश्वासात घेऊन भाजपचा स्थानिक उमेदवार काम करेल, याची हमी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक यांनी नाराजी नाट्यावर मात करीत सर्वसमावेशक प्रचाराला सुरुवात केली असताना तिकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्यावर मित्रपक्षांच्या नेत्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.
मुंबई : माहिमच्या रहेजा उड्डाणपुलावर हेरॉइन विकण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ५४ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
ट्रॅक्टर मधील ऊस तोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य या अपघातानंतर सर्वत्र विखुरले गेले होते.
नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण स्पष्ट नाही.
बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या नव्वदीच्या दशकापासूनचा इतिहास लक्षात घेतला तर बहुतेक लढतीत मतविभागणी व ‘अँटी इन्कबन्सी’ अर्थात सत्ताविरोधी लाट हे दोन घटक निकालात निर्णायक ठरले आहे. यंदाही ते महत्त्वाचे ठरणार असून कोणाला तारक, कोणाला मारक ठरतात, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूर : समान धोरणाच्या नावावर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, बार्टी, सारथी, महाज्योतीच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, अधिछात्रवृत्ती योजनांना आधीच कात्री लावण्यात आली असताना, आता पुन्हा या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी आयुक्त ‘टीआरटीआय’ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून संस्थांची स्वायत्तता धोक्यात आणल्याचा आरोप होत आहे.
या बेकायदा चाळी निवास, काही चाळी भंगार गोदामांसाठी भूमाफियांनी सरकारी, खासगी जमिनींवर बांधल्या होत्या.
पत्नी सुरेखा ही मद्य सेवन करून मोबाईलवर अन्य कोणाशी तरी सतत बोलत असते याचा राग पती राजू यांच्या मनात होता.
नवी मुंबईतील पावणे कोपरखैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Maharashtra: Major fire at chemical company Navbharat Industrial in Navi Mumbai's Khairane MIDC pic.twitter.com/RNCdE5b6Xn
— Bharat Ghandat (@GhandatMangal) April 2, 2024
मुंबई : धुळे येथून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी झाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुल उर्फ अब्दुर रेहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच करवसुली व करसंकलन विभागाच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल करण्यात आली.
वसई : विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयाला लागेलल्या आगीचा गोपनीय अहवाल ३ वर्षांनी खुला झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी तयार केलेल्या या अहवालात रुग्णालय व्यवस्थापनाबरोबर पालिकेच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या अधिकार्यांवर कारवाईचे निर्देश देऊनही कुणावरही कारवाई झालेली नव्हती हे विशेष.
मुंबई : यश बिल्डर्सचे विकासक पारस सुंदरजी देढिया यांना सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
वसई : बोगस अस्थिरोगतज्ञ म्हणून वावरणार्या तोतया डॉक्टर हेमंत पाटील याने केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे वसईतील सामाजिक कार्यकर्त्या माया केनिया (६०) यांचे निधन झाले आहे. या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना अपंगत्व आले होते तसेच शरीरात अनेक व्याधी निर्माण झाल्या होत्या.
पिंपरी : उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनामुळे शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. आजमितीला धरणात ४४.७२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे.
पुण्याच्या सामाजिक-राजकीय जीवनातील एक आद्य संस्था म्हणून जिची इतिहासात नोंद आहे, अशा पुणे सार्वजनिक सभेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या इतिहासाचे डिजिटायझेशन करण्याचे संस्थेने ठरवले आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर कोयता आणि चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी मतिमंद आहे. आरोपी पवारने मतिमंद मुलीला धमकावून तिच्याशी अश्लील कृत्य केले.
अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उतरवले आहे.