Lok Sabha Election 2024 Updates : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ४ एप्रिल रोजी संपल्यानंतर आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी जागावाटपाची चर्चा संपून जनतेच्या प्रश्नावर राजकीय पक्ष बोलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ९ एप्रिल रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यादिवशी राज ठाकरे मनसेची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाने दोन खासदारांचा पत्ता कापल्यानंतर आता नाशिक, मुंबई उत्तर पश्चिम आणि कल्याण लोकसभेसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Maharashtra News Updates 05 April 2024

14:34 (IST) 5 Apr 2024
नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी, कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

14:33 (IST) 5 Apr 2024
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

काही विषयांवर विद्युतवेगाने निर्णय घेणारे राज्य सरकार देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेताना मात्र हात आखडते घेते. हे स्वीकारार्ह नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 5 Apr 2024
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत, असेच हे सर्व पाहून वाटत असल्याचे सांगून त्यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 5 Apr 2024
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

मुंबई : व्हीआयपीस् ग्रुप – ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्याशी संबंधित २४ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालयानाय (ईडी), मुंबईने टाच आणली आहे. त्यात ५८ बँक खात्यांमधील २१ कोटी २७ लाख रुपये व तीन कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 5 Apr 2024
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

पुणे : आयआयटी-मुंबईचे ३६ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही काहीसे तसेच चित्र आहे. २०२२ मध्ये झालेल्या सर्वाधिक कॅम्पस प्लेसमेंटनंतर गेल्या दोन वर्षांत प्लेसमेंटला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३० ते ४० टक्के घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 5 Apr 2024
उन्हाळ्यातील संभाव्य रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

मुंबई : एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना असणाऱ्या सुट्ट्या आणि सुट्टीनिमित्त बरेच रक्तदाते बाहेरगावी जातात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या नियोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पुढील दोन महिन्यांतील संभाव्य रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना केल्या आहेत.

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा असता. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यांमध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवा वर्गाची संख्या मोठी आहे. एकंदर बहुतांश रक्तदाते बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण घटते. दरवर्षी एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यातच यंदा असलेल्या निवडणुकांमुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून रक्त संकलनाचे नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभरात ८४७ रक्तदान शिबिरांमार्फत ७८ हजार २२१ युनिट रक्त संकलित झाले. राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रक्तदान कमी झाल्यास रक्ताचा संभाव्य तुटवडा होण्याची शक्यता आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, धार्मिक संस्थांना संपर्क साधून स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने केल्या आहेत.

13:27 (IST) 5 Apr 2024
कपिल पाटलांनी हस्तक्षेप करुन खोटे गुन्हे दाखल केले – सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 5 Apr 2024
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

पुणे : विमाननगर भागातील एका माॅलमधून महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास तरुणीचा खून करण्याची धमकी अपहरणकर्त्याने दिल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 5 Apr 2024
“एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अधूनमधून कायमच रंगत असते.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 5 Apr 2024
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य पादचारी, प्रवाशांना या गुन्हेगारीचे सर्वाधिक चटके बसत आहेत.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 5 Apr 2024
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

मुंबई : मुंबईत मानवी जीवनाची किंमत काय आहे, अर्थसंकल्पीय मर्यादा हे नागरी कामांदरम्यान किमान सुरक्षा उपलब्ध करण्यातील अपयशाचे कारण असू शकते का, असा प्रश्न वडाळा येथे पाण्याच्या टाकीत पडून दोन अल्पवयीन भावांच्या झालेल्या मृत्यूची स्वत:हून दखल घेताना गुरुवारी महापालिकेला केला. तसेच, महापालिकेला नोटीसही बजावली.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 5 Apr 2024
“भाजपानं असंच रडत राहावं..”, बाळ्यामामा म्हात्रेंवरील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा’कडून भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळताच बाळ्यामामा म्हात्रे यांच्या गोदामांवर केलेली कारवाई ही पराभवाच्या भीतीतून महाशक्तीने खेळलेला रडीचा डाव आहे. पण भाजपने असंच रडत रहावं, आम्ही मात्र दडपशाहीच्या विरोधात लढत राहू, अशी आक्रमक भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1776141257515094058

12:36 (IST) 5 Apr 2024
बोरिवलीतील उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, पोयसर जिमखाना संस्थेला महानगरपालिकेची नोटीस

बोरिवलीतील मुंबई पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात उद्यानाच्या दर्शनी भागात गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:27 (IST) 5 Apr 2024
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल

स्वदेशी बनावटीच्या दहा मोनोगाड्यापैकी पहिल्या मोनोरेल गाडीचे तीन डबे मुंबईत दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 5 Apr 2024
गडचिरोली : निवडणुकीतून आदिवासी, ओबीसींचे प्रश्नच बाद ? समाजात नाराजीचा सूर

गडचिरोली : २००८ नंतर झालेल्या पुनर्रचनेनंतर देशात अनुसूचित जमातीसाठी ४७ लोकसभा क्षेत्र आरक्षित करण्यात आले. त्यात गडचिरोली-चिमूरचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान येथील आदिवासींचे आणि ओबीसींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन राजकीय पक्षांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडणे अपेक्षित होते.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 5 Apr 2024
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा..

11:45 (IST) 5 Apr 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती

काही जाणत्या प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. परंतु, खासदारांचा रोष नको म्हणून रेल्वे अधिकारी त्याकडे काणाडोळा करत होते.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 5 Apr 2024
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसमधील इच्छुकांनी बंडाची तयारी सुरू केल्याचे समजते.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 5 Apr 2024
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

चंद्रपूर: उन्हाळ्याला सुरूवात होताच जिल्ह्याची तहान भागविणारे जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जलसंकट कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये ८ धरणामध्ये केवळ २६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरण ५७.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा….

11:33 (IST) 5 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 5 Apr 2024
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला चैत्र महिन्यातील १४ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या यात्रेचा कालावधी एक महिन्याचा असल्याने माता महाकालीच्या दर्शनासाठी यात्रेत मराठवाडा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या आंध्रपदेशातील भाविकांच्या रांगा लागणार आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 5 Apr 2024
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

नागपूर : मेडिकलशी संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील ऋतुजा बागडे (१९, रा. भंडारा) या बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थी घाबरले. सुमारे ९० टक्के विद्यार्थिनी वसतिगृहातून स्वत:चे घर गाठल्याने शेवटी महाविद्यालयाकडून उन्हाळी सुट्टी जाहीर केली गेली.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 5 Apr 2024
खासदार भावना गवळींच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष, तब्बल पंचवीस वर्षानंतर…

वाशीम : सलग पाच वेळा खासदार, दिग्गज नेत्यांचा पराभव म्हणून ओळख असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारून पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देत अनेकांना धक्काच दिला.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 5 Apr 2024
शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून, हात पाय बांधले; बांधकाम व्यावसायिकाच्या येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील येऊर गावातील एका शेतघरात (फार्म हाऊस) सात जणांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 5 Apr 2024
कल्याण डोंबिवली पालिकेची एमआयडीसीकडील पाणी देयकाची ६५३ कोटींची थकबाकी माफ

नियमितची पाणी देयकाची रक्कम पालिकेने टप्प्याने एमआयडीसीकडे भरणा करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 5 Apr 2024
“प्रफुल्ल पटेल यांना आता मिर्ची देखील गोड लागू लागली, कारण…”, रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

भाजपासोबत गेल्यानंतर प्रफुल्ल पटेलांना अहंकार आलेला आहे त्याला कारण ही आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 5 Apr 2024
निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

पुणे : निवडणूक रोखे हा देशातीलच नाही, तर जगातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. मी त्याला मोदीगेट घोटाळा म्हणतो, असा थेट आरोप ज्येष्ठ राजकीय अर्थतज्ज्ञ डॉ. परकला प्रभाकर यांनी केला.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 5 Apr 2024
‘मनसेबद्दल चर्चा घडवल्या जात आहेत’, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात मेळावा आयोजित करण्यात येत असतो. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाच वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतात. यंदा ९ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. पाहा त्याची झलक

सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाटय़, अनेक मतदारसंघांत बंडखोरी