Maharashtra Political New Live Updates, 18 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. काही ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी फुटली आहे तर काही ठिकाणी कट्टर शत्रू एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच नाशिक-मालेगावमध्ये भाजपाने शिवसेनेला (उबाठा) धक्का दिला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे (उबाठा) उपनेते अद्वैत हिरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

दुसऱ्या बाजूला पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपयांच्या नोटिशीवर कंपनीने १४ दिवसांची मुदत मागितली होती.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सीएनजीचा पुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. काही सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सीएनजी पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईच्या दुरुस्तीचं काम आजही चालू राहणार आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

13:31 (IST) 18 Nov 2025

‘सात’ अंकासाठी ७’७७’७७७ रुपये मोजणारा हौशी कोण ?… चर्चेला उधाण

वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांचा कल कायम असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी केलेल्या लिलावात एका वाहनधारकाने ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची बोली लावून पसंतीचा सात क्रमांक मिळविला. …सविस्तर बातमी
13:28 (IST) 18 Nov 2025

ठाण्यात आधीच पाणी टंचाई, त्यात अधिकाऱ्यांच्या कृपेने पाणीचोरी ; शरद पवार गटाच्या आरोपाने खळबळ

या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणीचोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. …वाचा सविस्तर
13:15 (IST) 18 Nov 2025

आधी खड्ड्यांवरुन फटकारे, मग सत्कारासाठी हार तुरे…व्हायरल चित्रफितीमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मिरा भाईंदर शहरात सर्वात चचेर्चा विषय ठरलेली चित्रफित म्हणजे महापालिका आयुक्तांना एकनाथ शिंदे यांनी फटकारले होते.त्यांचाच ते सत्कार करताना दिसले. त्यामुळे शिंदेंची नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. …सविस्तर बातमी
13:13 (IST) 18 Nov 2025

पुणे शहरातील कोणता भाग सर्वांत थंड? तापमान कधीपासून वाढणार?

गेल्या काही दिवसांत सातत्याने किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातही किमान तापमानात घट होत आहे. …वाचा सविस्तर
13:05 (IST) 18 Nov 2025

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त… माहिती अधिकारातून स्थिती उघडकीस…

पुणे महापालिकेच्या अखत्यारितील ३१३ शाळांमध्ये शिक्षकांची ३२० पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. …अधिक वाचा
13:00 (IST) 18 Nov 2025

६ नगरपालिका, २ नगरपंचायतीसाठी तब्बल १ हजार ६७८ जणांची उमेदवारी

जिल्ह्यात होत असलेल्या सहा नगरपालिका व दोन नगरपंचायतीसाठी तब्बल १ हजार ६७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मंडळींची कसोटी लागली आहे. …वाचा सविस्तर
12:50 (IST) 18 Nov 2025

गुंठेवारीतील घरे नियमितीकरणाला अल्प प्रतिसाद; मुदतवाढीनंतरही अवघे दोनशे प्रस्ताव

राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियम २००१ मध्ये अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार पीएमआरडीएने ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार असल्याचे स्पष्ट केले होते. …वाचा सविस्तर
12:42 (IST) 18 Nov 2025

एसटीने नाशिकहून मुंबई आता अवघ्या साडेतीन तासात…कोणता मार्ग फायदेशीर ?

समृध्दी महामार्गावरुन एसटीच्या ई बसेसना टोल माफी करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता प्रवासाचा वेळ एक तासाने घटणार असून अवघ्या ३.५ तासांमध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर पार करता येणार आहे. …अधिक वाचा
12:35 (IST) 18 Nov 2025

शिवसेना-मनसेत जागावाटपाचा कळीचा मुद्दा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी दोन्ही बंधू यांची पुन्हा एकदा भेट झाली. मागील तीन महिन्यांत या भेटीगाठी वाढ झाली असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांनी घेतलेल्या भूमिकांना पाठिंबा दिला जात आहे. …सविस्तर बातमी
12:19 (IST) 18 Nov 2025

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यातील सहा कोटी द्यावे… ‘बार्टी’ला पत्र

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्यांना कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी ‘पीएमपी’ची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. …सविस्तर बातमी
12:12 (IST) 18 Nov 2025

समरजित घाटगेंनी राष्ट्रवादीची घोर फसवणूक केली; जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा आरोप

कागल, मुरगुड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी हात मिळवणी केली आहे. …सविस्तर वाचा
11:57 (IST) 18 Nov 2025

रायगडमध्ये पुन्हा एकदा सोयीस्कर आघाड्या

दहा नगरपालिकांच्या निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यात युती आघाडीचे नवनविन समिकरणे रायगड जिल्ह्यात पहायला मिळत आहे. …वाचा सविस्तर
11:54 (IST) 18 Nov 2025

राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली; भावनिक पोस्ट करत म्हणाले, “नेतृत्व सोडत आहे”

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने (शिंदे) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे (उबाठा) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) गेलेले माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी हे प्रभाग क्रमांक १५ मधून निवगपरिषदेची निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवींना मोठा धक्का बसला आहे. अशात. अथर्व साळवी यांनी एक भावनिक पत्र लिहून समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे.

अथर्व साळवी यांनी म्हटलं आहे की “मी अथर्व राजन साळवी रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग १५ मधून आपल्यासाठी लढण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु महायुतीच्या निर्णयामुळे मला या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे… आणि हे सांगताना मन खरंच जड झालं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या पाठीशी उभं राहिलेल्या सर्व ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, खांद्यावरची थाप देणं – हे सगळं विसरणं माझ्यासाठी शक्यच नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास… हे माझं खरं बळ आहे.”

“नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही… पण जबाबदारी तशीच आहे, आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास – ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो… माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो – २४ तास, दिवस असो वा रात्र… कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे. राजकारण बदलू शकतं… पदं येतात-जातात… पण नातं ? ते मात्र कायम राहतं – तुमचं आणि माझं.”

11:54 (IST) 18 Nov 2025

डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांचा पहिला मोहरा भाजपाच्या गळाला……

या प्रवेशामुळे मागील २७ वर्ष वामन म्हात्रे यांनी शिवसेनेचा प्रभाग म्हणून भक्कमपणे बांधून ठेवलेल्या महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी प्रभागात उभी फूट पडली आहे. …सविस्तर वाचा
11:46 (IST) 18 Nov 2025

नक्षलवाद्यांचा सर्वोच्च कमांडर माडवी हिडमा पत्नीसह चकमकीत ठार; सुरक्षा दलांना मोठे यश

आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली. …सविस्तर वाचा
11:46 (IST) 18 Nov 2025

सांगलीतही बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये धास्ती

कोल्हापूर, नाशिकनंतर सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाकडून केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. …सविस्तर वाचा
11:38 (IST) 18 Nov 2025

दिल्लीतील स्फोटावरून स्वामी गोविंददेव गिरी यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला…

‘सिंघल फाउंडेशन’च्या वतीने ‘भारतात्मा वेद पुरस्कार’ दादासाहेब दरोडे सभागृहात आचार्य प्रद्युन्म महाराज यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. …सविस्तर बातमी
11:38 (IST) 18 Nov 2025

वरळी येथील हिट अँड रन प्रकरण: आरोपी मिहीर शहाच्या जामीन अर्जावरील निर्णय राखीव

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी मिहीर याच्या पुरावे नष्ट करण्याच्या शक्यतेवर एकलपीठाने बोट ठेवले होते. …वाचा सविस्तर
11:32 (IST) 18 Nov 2025

भाजप, शिवसेनेच्या कुरघोडीने अजित पवार एकाकी

अजित पवार यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट येण्यास महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष कारणीभूत ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. …वाचा सविस्तर
11:21 (IST) 18 Nov 2025

पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट, आघाडीत बिघाडी… जाणून घ्या प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या लढती

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली. …सविस्तर बातमी
11:19 (IST) 18 Nov 2025

नगराध्यक्षपदासाठी “मामुली” मतांवर भिस्त; गणिताची आकडेमोड सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि प्रमुख पक्ष जातीय समीकरण आणि सामाजिक अभिसरणाचा (सोशल इंजिनिअरिंग) विचार करत आहेत. …वाचा सविस्तर
11:17 (IST) 18 Nov 2025

विक्रोळी – माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

विक्रोळी – कांजूरमार्गदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मंगळवारी सकाळी ७.३२ च्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. …सविस्तर वाचा
11:13 (IST) 18 Nov 2025

ओबीसी मधून निवडणूक लढण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते विकास गवळी असे का म्हणतात?

  Maharashtra local body elections : याआधीही वाशीम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि नागपूर जिल्ह्यांतील तब्बल २८९ ओबीसी सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. …सविस्तर बातमी
11:08 (IST) 18 Nov 2025

महाराजांचा पुतळा पुन्हा बंदिस्त; ‘गनिमिकाव्याने स्मारक खुले करू’ – मनसेचा इशारा

नेरूळ सेक्टर–१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याभोवती नवी मुंबई महापालिकेने रविवारी मध्यरात्री लोखंडी जाळी उभी करून संपूर्ण परिसर बंदिस्त केल्यानंतर नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे …सविस्तर वाचा
10:57 (IST) 18 Nov 2025

उमेदवारी नाकारल्याने मानसिक धक्का, शिंदेसेनेच्या महिला प्रमुख बेपत्ता…

इतकी वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहूनही पक्षाने संधी न दिल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. याच विवंचनेतून त्या घरातून निघून गेल्या. असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे. …सविस्तर वाचा
10:49 (IST) 18 Nov 2025

Thane CNG Shortage : सीएनजी तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी हाल, बसगाड्यांच्या थांबावर रांगा, अनेकांची पायपीट

Mumbai CNG Shortage : ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर प्रवाशांच्या बसगाड्यांसाठी रांगा लागल्या होत्या. अनेक नोकरदारांनी पायपीट करत तीन हात नाका गाठला. …वाचा सविस्तर
10:47 (IST) 18 Nov 2025

नागपूर ‘आरटीओ’त चाललंय तरी काय? अधिकाऱ्याला अडकवण्यासाठी कटकारस्थान; परिवहन अधिकाऱ्यांची नीतिमत्ता रसातळाला….

Nagpur RTO : आपल्याच खात्यात सहकारी असलेल्या अधिकाऱ्याला पदोन्नती पासून डावलण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून अधिकारी किती खालच्या स्तराला जाऊन कट रचू शकतात, याचाही उलगडा यातून झाला. …अधिक वाचा
10:26 (IST) 18 Nov 2025

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून २० ते २५ मिनिटे उशिराने गाड्या धावत आहेत.

10:09 (IST) 18 Nov 2025
नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला, अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, “एकच सांगतो…”

अमित ठाकरे म्हणाले, “एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. कारण महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. महाराजांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी जे काही सहन करावं लागेल, ते सगळं आम्ही आनंदाने सहन करू.”