Raj Thackeray-Uddhav Thackeray Rally Highlights: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.
वरळी येथील सभेचे सर्वकाही अपडेट्स जाणून घ्या, एका क्लिकवर…
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: ‘चौथ्या फोटोतील राजकीय मनोमिलन किती दिवस टिकणार?’, शिंदेंच्या शिवसेनेची खोचक टीका
माजी खासदार आणि शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय निरुपम यांनी एक्सवर एक फोटो शेअर करत ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्न निर्माण केले आहे. यासाठी त्यांनी लालू यादव – नितीश कुमार, अखिलेश यादव – मायावती आणि राहूल गांधी – केजरीवाल यांच्या युतीच्या वेळेसचा फोटो दाखवला आहे. या युत्या फार काळ टिकू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी चौथा फोटो राज आणि उद्धव ठाकरेंचा दाखवून हे राजकीय मनोमिलन किती दिवस टिकणार? असा प्रश्न उपस्थित केला.
सोशल मीडिया पर ये तस्वीरें दिख गईं तो सोचा आपको भी दिखा दूँ।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 5, 2025
राजनीतिक प्रतिद्वंद्वियों के मनोमिलन का हश्र क्या हुआ है, तीन तस्वीरें ज़ोर-जोर से कुछ कह रही हैं।
चौथी तस्वीर के हश्र का इंतज़ार कीजिए।#जयमहाराष्ट्र pic.twitter.com/Fwh6x4uUtS
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: ‘योग्य वेळेला ठाकरे बंधूंनी योग्य निर्णय घेतला’, माजी खासदारांची प्रतिक्रिया
ठाकरे बंधू २००५ ला एकमेकांपासून वेगळे झाले होते. १८ वर्षांनंतर त्यांना समजले आहे की, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत आहे. आपल्याला सत्तेत येऊन मराठी माणसाचे हित साधायचे असेल तर आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे त्यांना वाटले असेल. भाजपा असो किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असो यांना या युतीचा नक्कीच फटका बसेल, अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षाचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
ठाकरेंचा मुखवटा, हातात चाबुक आणि महाराष्ट्रद्रोही यमाला फटके…
मनसे कार्यकर्ते ताब्यात; सुशील केडिया यांच्या कार्यालयावर हल्ल्याप्रकरणी पाच संशयीत ताब्यात
या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु, जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे, मनसे प्रवक्ता गजानन काळेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: विजयी सभा पार पडताच शिवसेना, मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा पार पडल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर ठाकरे ब्रँड आणि मराठी आवाज आणि महाराष्ट्राची ताकद अशा आशयाच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत.
ठाकरे ब्रँड! pic.twitter.com/XKgBCo6Obg
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 5, 2025
‘मनसे संपलेला पक्ष’ ते ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनोमिलन झालं पण जुन्या जखमांचं काय?
Old Comments Thackery vs Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालं आहे. एकत्र आलो आहोत, एकत्र राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनीही मराठीसाठी एकत्र आल्याचे म्हटले. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केली होती. त्यातील लक्षवेधी ठरलेली विधानं वाचा
Video : ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे मराठी कलाकारांची पाठ? अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, “मदत लागते तेव्हा शिवतीर्थ…”
शिंदेंना डिवचणारे बॅनर शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात; ‘जय गुजरात’च्या नाऱ्यावरून बॅनरबाजी
शिंदेकडून एका भावावर स्तुती सुमने; दुसऱ्यावर जहरी टीका
गणपत्ती बाप्पा मोरया…मनसेचे अविनाश जाधव यांची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: “एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा”, शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका
ठाकरे बंधूंच्या विजयी सभेनंतर आता शिवसेनेच्या (शिंदे) सोशल मीडियावरून या सभेवर टीका होत आहे. मात्र एका बाजूला राज ठाकरेंचं कौतुक आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याचं दिसत आहे. सर्व प्रवक्तेही फक्त उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य करताना दिसत आहेत.
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा,
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय खिसा
एकाचा स्वतंत्र सवतासुभा
दुसरा नुसताच आयतोबा!
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 5, 2025
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा…
Uddhav Thackeray : “पुष्पा म्हणतो झुकेगा नहीं साला, हे म्हणतात उठेगा नहीं साला”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’वर टोला!
राज ठाकरेंसमोरच उद्धव ठाकरेंनी दिले युतीचे संकेत; म्हणाले, “आम्ही एकत्र आलोय…”
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: मराठीवरून राज ठाकरेंना सुनावणाऱ्या सुशील केडियानं अखेर मागितली माफी
मराठी कधीही बोलणार नाही, अशी भूमिका घेऊन वाद निर्माण करणाऱ्या व्यावसायिक सुशील केडियानं अखेर माफी मागितली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज केडियाचे ऑफिस फोडल्यानंतर सुशील केडियाने एक्सवर पोस्ट करत माफी मागितली. राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी इंग्रजीमधून प्रतिक्रिया दिली आणि मराठी भाषेबद्दल जे बोललो ते शब्द मागे घेतो, असे केडिया म्हणाले.
I request @RajThackeray Ji to consider my humble submission. pic.twitter.com/i8zGszgNtW
— Sushil Kedia (@sushilkedia) July 5, 2025
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेला सन्मान हे पुतनामावशीचं प्रेम – प्रवीण दरेकर
उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकेरंना सन्माननीय म्हटले. पण जेव्हा राज ठाकरेंना खरा सन्मान करण्याची गरज होती, तेव्हा तो त्यांनी केला नाही. आज केवळ सत्ता मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्यास तयार झाले आहेत, त्यांचा हा सन्मान पुतनामावशीचे प्रेम आहे, अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: आम्ही ५० वर्ष गुंडागर्दी केली, म्हणून फडणवीस मुख्यमंत्री – संजय राऊत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडागर्दी करणाऱ्यांना धडा शिकवू असे म्हटले होते. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही ५० वर्ष गुंडागर्दी केली म्हणूनच फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: भाजपाने कितीही ठरवले तरी त्यांना मुबंई गिळंकृत करता येणार नाही – संजय राऊत
भाजपाला कधीही मुंबई गिळंकृत करता येणार नाही, असे विधान संजय राऊत यांनी म्हटले. अदाणी, शाहा असे कितीही लोक एकत्र आले तरी त्यांना मुंबई मिळणार नाही. आज ठाकरे पॉवर एकत्र आली आहे, त्यांनी मुंबईचा नाद सोडावा, असेही ते म्हणाले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: संयुक्त महाराष्ट्रासारखी एकजूट आता करावी, उद्धव ठाकरेंचे आवाहन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या प्रकारे मराठी माणसाची एकजूट झाली होती, त्याप्रकारची एकजूट आता मराठी माणसांनी करावी. अगदी भाजपामधील मराठी माणसानेही एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर, मराठा-मराठेतर, घाटी-कोकणी हा सर्व वाद बाजूला ठेवून एकत्र या, असे आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. तेच आज पुन्हा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: एक गद्दार काल जय गुजरात बोलला – उद्धव ठाकरे
एक गद्दार काल जय गुजरात बोलला. त्या पुष्पा चित्रपटातला दाढीवाला झुकेगा नही साला म्हणाला. पण हा दाढीवाला उठेगा नही साला म्हणतो. काहीही झालं तरी उठेगा नही, असं म्हणतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: आम्ही एकत्र आलो की, आता काड्या घालण्याचे उद्योग होतील – उद्धव ठाकरे
कुणाच्याही लग्नात भाजपावाल्यांना बोलावू नका. येतील जेवण करतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील. नाहीतर नवरीला पळवून नेतील. भाजपाचे हेच उद्योग आहेत. भाजपाचे स्वतःचे काहीही नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: फक्त पालखीचे भोई होणार की मायमराठीला पालखीत बसवणार – उद्धव ठाकरे
भाजपाकडून फोडा आणि राज्य करा, अशी निती वापरली जाते. महाराष्ट्रातही बटेंगे तो कटेंगी ही नीती वापरून समाजा-समाजाला वेगळे केले. मराठी माणूस एकमेकांमध्ये भांडत राहिला. आपण त्यांच्या पालख्या वाहिल्या. आपण फक्त पालखीचे भोई होणार की मायमराठीला पालखीत बसवणार? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: संकट गेल्यानंतर आपण एकमेकांत भांडतो, हा नतद्रष्ट आता करायचा नाही – उद्धव ठाकरे
संकट आल्यानंतर मराठी माणूस एकत्र येतो. पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांत भांडतो. आता हा नतद्रष्टपणा आपण करायाचा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: ‘हिंदी, हिंदू, हिंदूस्तान’ मधील हिंदी आम्हाला मान्य नाही’ – उद्धव ठाकरे
भाजपाकडून एक विधान, एक प्रधान.. असे सांगितले जायचे. नंतर एक देश, एक इलेक्शन ही टूम काढली. आता त्यांच्याकडून ‘हिंदी, हिंदू, हिंदूस्तान’ अशी घोषणा दिली जात आहे. हिंदू, हिंदूस्तान आम्हाला मान्य आहे. पण हिंदी आम्ही माननार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही, आम्ही मराठी बोलणारे हिंदुत्व आहोत – उद्धव ठाकरे
आम्ही हिंदुत्व सोडलं, अशी टीका केली जाते. पण आम्ही मराठी बोलणारे हिंदू आहोत. आमच्याएवढा धर्माभिमानी, कडवट हिंदू दुसरा कुणी नाही. १९९२ च्या दंगलीत हा कडवटपणा आम्ही दाखवून दिला होता.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला – उद्धव ठाकरे
आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतानी दूर केला, असे विधान उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला केले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: मराठीसाठी एकजूट कायम राहावी, बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारले जावे – राज ठाकरे
पुढे काय होईल, ते होईल. मराठीसाठी झालेली ही एकजूट अशीच राहावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: यापुढे कुणाला माराल तर व्हिडीओ काढू नका, उठसूठ कुणाला मारू नका – राज ठाकरे
जो चूक करेल, त्याला कानाखाली वाजवाच. पण उठसूठ कुणालाही मारण्याची गरज नाही. जर कुणाला मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका, असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)